Showing posts with label स्मिता तांबे. Show all posts
Showing posts with label स्मिता तांबे. Show all posts

Wednesday, 6 May 2020

अभिनेत्री स्मिता तांबेने शेअर केल्या तिच्या पहिल्या फोटोशूटच्या आठवणी

पहिलं वहिलं फोटोशूट अभिनेत्रींसाठी खासच असतं. पण हे फोटोशूट आपल्या लहानपणचं असेल तर ते जास्त खास असतं. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री स्मिता तांबे घरीच असल्याने तिला आपल्या आठवणींची शिदोरी उघडून पाहण्याची संधी मिळाली आहे. जून्या फोटो अल्बममध्ये स्मिताला तिचा लहानपणीचा पहिल्या फोटोशूटचा फोटो मिळाला. जो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अभिनेत्री स्मिता तांबे तिच्या पहिल्या फोटोशूटविषयी सांगते, " माझ्या आई बाबांनी फार हौसेने लहानपणी माझं पहिलं वहिलं फोटोशूट केलं होतं. खरं तर त्यांनी माझ्यासाठी खास ड्रेस शिवून घेतला होता. ड्रेस तयार झाल्यानंतर त्यांची खूप इच्छा होती की माझं फोटोशूट स्टुडिओतच करायचं. पाठीमागे काश्मीरचं बॅकग्राऊंड होतं. मला लहानपणी वाटायचं आपण खरंच काश्मीरला गेलो होतो. पण तो फोटो स्टुडिओत काढला होता. तो फोटो माझा आवडता फोटो आहे."
पुढे ती तिच्या आई-वडिलांविषयी सांगते, "आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. त्याक्षणी आपले आई-वडीलचं आपल्या सोबत असतात. ते आपल्याला सांभाळतात. ह्या क्वारंटाईनमध्ये आपल्याकडे फार वेळं आहे तर हा वेळ आपण स्वत:साठी देऊया आणि आपण ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो. त्यांची आठवणं काढूयात."

Thursday, 7 November 2019

अभिनेत्री स्मिता तांबेची चौथी फिल्म इफीमध्ये, 50 व्या इफीमध्ये पोहोचली ‘गढूळ’

सध्या सिनेरसिंकांना लवकरच गोव्यामध्ये सुरू होणा-या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफी)चे वेध लागलेत. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जगभरातल्या निवडक उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना पाहायला मिळणार आहेत. इफीमधल्या ‘इंडियन पॅनोरमा’ सेक्शनमधल्या ‘नॉन फिचर फिल्म’ विभागात अभिनेत्री स्मिता तांबेच्या ‘गढुळ’ चित्रपटाची निवड झाली आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी स्मिता तांबेचा ऋणानुबंध तसा जुना आहे. स्मिताची ही चौथी कलाकृती आहे, जी इफीमध्ये दाखवली जाणार आहे. ह्याअगोदर धुसर, रूख, पांगिरा ह्या सिनेमांचीही इफीमध्ये वर्णी लागली होती.
इफीविषयी स्मिता तांबे सांगते, “पहिल्यांदा मी इफीमध्ये जेव्हा सहभागी झाले होते. तेव्हा ह्या चित्रपट महोत्सवाच्या भव्यतेविषयी मला कल्पना नव्हती. पण लवकरच मला हा महोत्सव म्हणजे सिनेरसिकांची पंढरी असल्याचे जाणवले. जगभरातल्या फिल्ममेकर्स आणि कलावंताना भेटण्याची संधी ह्या चित्रपट महोत्सवातून मिळते. भारतातल्या नामांकित सिनेमहोत्सवांमध्ये प्रतिष्ठेचे मानले जाणारे इफी असल्याने ह्या चित्रपट महोत्सवात आपल्या सिनेमाचे सिलेक्शन होणे, ही एक कौतुकाची थाप असते. त्यामुळे ‘गढुळ’चे सिलेक्शन होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
गढुळ सिनेमाविषयी स्मिता सांगते, “जेव्हा नातेसंबंधांमध्ये गोष्टी गढुळ होतात, तेव्हा तुमच्या अचार- विचारातली पारदर्शकता हरवत जाते, ही ह्या कथानकामागची कल्पना मला आवडली. गणेश शेलार ह्या नवोदित दिग्दर्शकामध्ये फिल्ममेकिंगची योग्य जाण असल्याने ह्या फिल्मवर काम करतानाचा अनुभव अविस्मरणीय होता.”

Wednesday, 26 June 2019

अभिनेत्री स्मिता तांबेने पहिल्यांदाच केले ग्लॅमरस फोटोशुट

चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबेने नुकतंच स्टनिंग फोटोशुट केलंय. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या प्रकारच्या  स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त अभिनेत्री स्मिता तांबेला पहिल्यांदाच ग्लॅमरस रूपात ह्या फोटोशूटमूळे पाहायला मिळतंय. 
ह्या  फोटोशूटवेळी स्मिता तांबे म्हणाली, "मी गेल्या दहा-बारा वर्षात अशा पध्दतीने स्वत:चे  फोटोसेशन केले नाही. ज्या-ज्या भूमिका रंगवत गेले त्या-त्यावेळी सिनेमातल्या भूमिकेनूसार, पोस्टरसाठीच केवळ फोटो काढले आहेत.. हयाशिवाय मी कधी ग्लॅमरस भूमिका न रंगवल्याने माझे कधी ग्लॅमरस फोटोशूट माझ्या चाहत्यांसमोर आले नव्हते."
स्मिता तांबेच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात  2019 मध्ये अनेक नव्या गोष्टी घडतायत. त्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, "हो, यंदा वर्षाच्या सुरूवातीला माझं लग्न झाले. आणि त्यानंतर आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडले. मी व्यावसायिक रंगभूमीवर खूप वर्षांनी इडियट्स नाटकाव्दारे परतले. सावट सिनेमाव्दारे निर्मितीक्षेत्रात पाउल ठेवले. डिजीटल विश्वातही पदार्पण झाले. आणि आता माझ्या एका मागोमाग एक तीन वेबसीरीज येतायत. त्यात बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतही खूप चांगले प्रोजक्ट्स करतेय, ज्यांची लवकरच अनाउन्समेंटही होईल."