Showing posts with label ‘संगीत रामायण’. Show all posts
Showing posts with label ‘संगीत रामायण’. Show all posts

Wednesday, 28 August 2019

‘संगीत रामायण’ लोकार्पण सोहळा संपन्न

हिंदी गीतरामायण प्रकाशन समितीच्या सौजन्याने गीतरामायणावर आधारित सुनील सुधाकर देशपांडे रचित ‘संगीत रामायण’ या भावानुवाद पुस्तकाचा लोकार्पण सोहळा नुकताच प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर, शीतलाप्रसाद दुबे, सूर्यप्रकाश दीक्षित, गदिमा यांचे सुपुत्र आनंद माडगुळकर, माणिक मुंडे, धनंजय बेनुवार या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनाचे वैभव असलेल्या गीतरामायणाचा हिंदी अनुवाद केल्याबद्दल सुनील सुधाकर देशपांडे यांचे अभिनंदन करत आज या भावानुवादाचे लोकार्पण करताना आम्हाला आनंद होत असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
सुप्रसिद्ध गायिका संगीतकार आशा खाडिलकर यांच्या संगीत संयोजनांतर्गत ‘संगीत रामायणातील’ काही निवडक गाणी यावेळी सादर करण्यात आली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन समीरा गुजर यांनी केले.
‘संगीत रामायण‘ लोकार्पण समारोह सम्पन्न
हिंदी गीतरामायण प्रकाशन समिति के सौजन्य से रामायणपर आधारित संगीत रामायण यह गीतशृंखलका लोकार्पण समारोह प्रसिद्ध गायिका श्रीमती आशा खाडिलकरजी, डॉ.श्री शीतला प्रसाद दुबेजी, सूर्यप्रकाश दीक्षितजी, आनंद माडगूलकरजी, माणिक मुंडेजी,  धनंजय बेनुवारजी इन गणमान्य व्यक्तियोंकी उपस्थिती में सम्पन्न हुआ।
गीतरामायण का हिंदी अनुवाद करने के लिए सुनील देशपांडेजी को बधाई देते हुए संतोष व्यक्त किया l इस कार्यक्रम के दौरान गायिका तथा संगीतकार श्रीमती आशा खाडिलकर जी के निर्देशनमे संगीत रामायण में से चुनिंदा गीतोंका गायन प्रस्तुत हुआ । इस कार्यक्रम का सूत्रसंचालन समीरा गुजर ने किया।  

Monday, 12 August 2019

‘संगीत रामायण’ लोकार्पण सोहळा


‘गीतरामायणा’ ची हिंदी सांगीतिक मैफिल रंगणार 
शब्दप्रभू ‘गदिमा’ आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके या दोन दिग्गजांच्या प्रतिभेचा सर्वांगसुंदर अविष्कार म्हणजे अथक परिश्रमातून निर्माण झालेले ‘गीतरामायण’. आजवर देश-परदेशात गीतरामायणाचे अनेक कार्यक्रम झाले व या कार्यक्रमांना रसिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनाचे वैभव असलेल्या गीतरामायणाच्या हिंदी रूपातील सांगीतिक मैफिलीचा आनंद घेण्याची संधी लवकरच रसिकांना उपलब्ध होणार आहे.
हिंदी गीतरामायण प्रकाशन समितीच्या सौजन्याने गीतरामायणावर आधारित सुनील सुधाकर देशपांडे रचित ‘संगीत रामायण’ या भावानुवादाचा लोकार्पण सोहळा रविवार २५ ऑगस्टला सायं. ५.३० वा. प्राचार्य बी.एन वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय येथे रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. आचार्य श्री.सूर्यप्रकाशजी दीक्षित (पूर्व हिंदी विभागप्रमुख, लखनऊ विश्वविद्यालय), श्री.आनंदजी माडगूळकर (कार्यकारी विश्वस्त, ग.दि.माडगूळकर प्रतिष्ठान), श्री.शीतला प्रसादजी दुबे, (अध्यक्ष हिंदी साहित्य अकादमी, मुंबई विभाग), श्री.सुंदरचंदजी ठाकूर (संपादक नवभारत टाइम्स) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानंतर सुप्रसिद्ध गायिका संगीतकार आशा खाडिलकर यांच्या संगीतसंयोजनांतर्गत ‘संगीत रामायणातील’ काही निवडक गाणी सादर केली जातील.
‘‘रसिकांना अभिमान वाटावा अशा मराठी भाषेतील वाङ्मयीन व सांगितिक अशा ज्या निवडक कलाकृती आहेत, त्यात गीतरामायणाचे स्थान अग्रस्थानी आहे. या गीतांचा सुश्राव्य आनंद हिंदी भाषेमध्ये ही अनुभवायला  मिळावा या उद्देशाने आम्ही ‘संगीत रामायण’ या कार्यक्रमाची संकल्पना साकारली’’ असल्याचे रचनाकार सुनील देशपांडे सांगतात. जीवनमूल्यांची ओळख करून देणारा गीतरामायणाचा हा ठेवा इतर भाषिक लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न रसिकांना वेगळी अनुभूती देणारा असेल हे नक्की.