Showing posts with label ‘Once मोअर’. Show all posts
Showing posts with label ‘Once मोअर’. Show all posts

Saturday, 13 July 2019

बल्लवाचार्य विष्णू मनोहर यांची नवी इनिंग ‘Once मोअर’ चित्रपटासाठी निर्मिती व अभिनयाचा डबल धमाका

खाद्यक्षेत्रात मुशाफिरी करत महाराष्ट्रातील पारंपरिक पाककृतींना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारे ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर हे नाव आज घराघरांत सर्वपरिचित आहे. आपल्या हातच्या चवीने सगळ्यांची मनं तृप्त करत स्वयंपाकाला ग्लॅमर मिळवून देणारे विष्णू मनोहर आता चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत आपली कमाल दाखवायला सज्ज झाले आहेत. ‘Once मोअर या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करताहेत. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही त्यांनी सांभाळली आहे. येत्या १ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
आपल्या या इनिंगबद्दल बोलताना विष्णू मनोहर सांगतात की‘मी खाद्यप्रांतात रमलो असलो तरी मला   अभिनयाच्या क्षेत्रातच करिअर करण्याची इच्छा होती.इच्छा दांडगी असेल तर ती पूर्ण होतेच. माझी अभिनयाची ओढ आता ‘Once मोअर चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. या चित्रपटात मी एका राजाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेसाठी राजाच्या देहबोलीचा अभ्यास मी केला, त्यासोबत दिग्दर्शक नरेश बिडकर व सहकलाकार यांचं खास मार्गदर्शन मला या भूमिकेसाठी मिळालं. प्रत्येक सहकलाकाराने मला सांभाळून घेतलं. माझ्या प्रत्येक सीननंतर मी सेटवर बसून चित्रीकरण बघायचो. त्यातील बारकावे जाणून घेतले. या चित्रपटाचे ‘व्हीएफएक्स’ ही कमाल झाले आहेत. दिग्दर्शक नरेश बिडकर आणि मी एकमेकांना आधीपासून ओळखत होतो. आमचं खास असं ‘नागपूरी कनेक्शन’ आहे. हे क्षेत्र मला जरी नवखं नसलं तरी अभिनय करणे हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. ‘Once मोअर चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा अनुभव मी घेतला. या चित्रपटाची निर्मितीही मी करतोय, त्यामुळे माझ्यासाठी हा डबल धमाकाच आहे.
या चित्रपटात विष्णू मनोहर यांच्यासोबत रोहिणी हट्टंगडीपूर्णिमा तळवलकरभारत गणेशपुरेनरेश बीडकर आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटीलसुहास जहागीरदारनिलेश लवंदे, विष्णू मनोहर आणि डॉ. विनित बांदिवडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूरसुदिप नाईकसंपदा नाईक आणि व्ही.टी एच.एटंरटेन्मेंट सहनिर्माते आहेत.

Saturday, 6 July 2019

‘Once मोअर’ चित्रपटाचे संगीत अनावरण

‘Once मोअर ही गोष्ट आहे आपल्या सगळ्यांची.... नात्यातला गुंता अलगद सोडून आयुष्यात गंमत आणायची.
‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’.... एका नवरा बायकोच्या नात्यांतील अशाच रहस्याचा उलगडा करणाऱ्या आगामी ‘Once मोअर या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर व ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी चित्रपटाच्या टीझरची झलक प्रकाशित करण्यात आली. येत्या १ ऑगस्टला ‘Once मोअर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक नरेश बिडकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. हा चित्रपट प्रत्येकाला जगण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देईल, असा विश्वास दिग्दर्शक नरेश बिडकर आणि चित्रपटाच्या लेखिका श्वेता बिडकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
वेगवेगळ्या पठडीतली 3 गाणी या चित्रपटात आहेत. श्वेता बिडकर लिखित या गीतांना शैलेंद्र बर्वे यांनी संगीत दिले आहे. सौरभ भालेराव यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे. स्वप्नील बांदोडकरनकाश अजिजहमसिका अय्यर या गायकांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.
रोहिणी हट्टंगडीपूर्णिमा तळवलकरभारत गणेशपुरेविष्णू मनोहरनरेश बीडकर आदि सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकारांसोबत आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी हे दोन नवे चेहरे चित्रपटात दिसणार आहेत. वंशिका क्रिएशनदेवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांच्या माध्यमातून भेटीला आलेले दिग्दर्शक-अभिनेता नरेश बीडकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘Once मोअर हा पहिला चित्रपट आहे.
या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटीलसुहास जहागीरदारनिलेश लवंदे विष्णू मनोहर आणि डॉ. विनित बांदिवडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूरसुदिप नाईकसंपदा नाईक आणि व्ही.टी एच.एटंरटेन्मेंट सहनिर्माते आहेत. छायांकनाची संजय सिंग तर संकलनाची जबाबदारी निलेश गावंड यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन देवदास भंडारे यांचे असून नृत्यदिग्दर्शन चिन्नी प्रकाशसंदेश चव्हाणश्वेता-तेजस यांचे आहे. चैत्राली डोंगरे वेशभूषा तर रंगभूषा श्रीनिवास मेनगु यांची आहे. प्रोस्थेटिक मेकअप रमेश मोहंतीकमलेश गोथिडे यांनी केला आहे. साहस दृश्याची जबाबदारी प्रशांत नाईक यांनी सांभाळली आहे.
१ ऑगस्टला ‘Once मोअर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Thursday, 27 June 2019

आपण यांना ओळखलंत का? सेलीब्रेटींना सगळेच ओळखतात ...पण तरीही यांना तुम्ही ओळखलं नसेल !!

सेलीब्रेटींना सगळेच ओळखतात ...पण तरीही यांना तुम्ही ओळखलं नसेल !!
Once मोअर चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक नरेश बिडकरांचाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता... एक विचित्र स्वप्न साकार होत होतं. या चित्रपटात एक विचित्र कॅरेक्टर आहे. एका स्त्रीला पुरुष साकारायचा होता पण ते पडद्यावरचं नाटक नव्हतं तर ती व्यक्तिरेखाच पुरुषाची होती. हे आव्हान होतं.. आणि ते साकारण्यासाठी कसदार अभिनेत्री हवी होती.. आणि मग  ‘Once मोअर च्या टीमकडून एक मुखाने नाव निघालं रोहिणी हट्टंगडी.! हो.. ह्या फोटोत दिसणारे आजोबा म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आहेत !!
१ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘Once मोअर या आगामी मराठी चित्रपटासाठी रोहिणीताईंनी हे आजोबांचं पुरुषी रूप धारण केलं आहे. या भूमिकेसाठी रोहिणीताईंनी किती मेहनत घेतली असेल याचा अंदाज फोटोतील गेटअपवरून सहज येतो. ‘Once मोअर चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून एकाचवेळी स्त्री व पुरुष अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या सशक्त कलावंताची आवश्यकता होती. या भूमिकेला रोहिणीताई न्याय देऊ शकतील हा विचार करून दिग्दर्शक नरेश बीडकर यांनी रोहिणीताईंना या भूमिकेची आवश्यकता समजावून सांगितली. भूमिकेचं आव्हान व त्यातील वेगळेपणा लक्षात घेत रोहिणीताईंनी या भूमिकेला होकार दिला.
कमल हसन यांना बऱ्याच सिनेमांमध्ये गेटअप करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट रमेश मोहंती, कमलेश आणि श्रीनिवास मेनगु यांनी ‘Once मोअर या चित्रपटासाठी रोहिणीताईंना मेकअप केला आहे. रमेश आणि कमलेश यांनी प्रॉस्थेटिक मेकअपच्या सहाय्याने रोहिणी यांना आजोबांचं रूप दिलं आहे. या मेकअपसाठी रमेश आणि कमलेश यांच्या जोडीने रोहिणीताईंनीही खूप मेहनत घेतली आहे. चित्रीकरणाच्या पाच तास आधी रोहिणीताईंना मेकअप करण्याची प्रक्रिया सुरू व्हायची. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर दोन तास मेकअप काढण्यासाठी लागायचा. या काळात त्या काहीही खाऊ शकत नव्हत्या.
आजोबांच्या गेटअपमध्ये रोहिणीताईंना केवळ अभिनय, संवादफेक करायची नव्हती, तर त्यात धावण्यापासून अॅक्शन सीन्सपर्यंत बऱ्याच गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे या वयात रोहिणीताईंनी स्वीकारलेलं आजोबांच्या भूमिकेचं आव्हान आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. दिग्दर्शकावर दाखविलेला विश्वासही त्यांच्या भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेत असल्याचं मत चित्रपटाचे दिग्दर्शक नरेश बिडकर व्यक्त करतात. आजवरच्या करियरमधील ही नावीन्यपूर्ण आणि आव्हानात्मक  भूमिका साकारण्याची संधी ‘Once मोअर या सिनेमामुळे मिळाल्याचं सांगत रोहिणीताई म्हणतात की, मला नेहमीच आव्हानं स्वीकारायला आवडतात. हे आव्हान मी स्वीकारणं धाडसाचं होतं पण यातही एक आनंद होता. त्यामुळेच पाच तासांची मेकअप प्रोसेस आणि गेटअपमध्ये अॅक्शन करणं हे देखील मी एन्जॅाय केलं. प्रेक्षकांनाही माझं हे रूप नक्कीच आवडेल’ अशी अपेक्षा रोहिणीताईंनी व्यक्त केली.

Sunday, 16 June 2019

‘Once मोअर’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘९०% नवरा बायको हे मागच्या जन्मीचे शत्रू असतात’ या टॅगलाईनने प्रदर्शित झालेलं ‘Once मोअर या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. पोस्टरवरच्या विविध व्यक्तिरेखेतील नामवंत कलाकार आणि त्यांचे ऐतिहासिक पेहराव यामुळे चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी असणारा हा चित्रपट नेमका कशावर आहेयाविषयीचे तर्क-वितर्क लढवले जातायेत. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणाऱ्या ‘Once मोअर या चित्रपटाच्या पोस्टरमधून भेटीला आलेली ही सगळी पात्र लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटामधून नेमका कोणत्या गोष्टीचा रहस्यभेद होणार याचा उलगडा १ ऑगस्टला होईल.
वंशिका क्रिएशनदेवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांच्या माध्यमातून भेटीला आलेले दिग्दर्शक-अभिनेता नरेश बीडकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘Once मोअर हा पहिला चित्रपट आहे.
रोहिणी हट्टंगडीपूर्णिमा तळवलकरभारत गणेशपुरेविष्णू मनोहरनरेश बीडकर आदि सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकारांसोबत आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी हे दोन नवे चेहरे चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटीलसुहास जहागीरदार, निलेश लवंदे आणि विष्णू मनोहर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूर, सुदिप नाईक, संपदा नाईक आणि व्ही. टी एच. एटंरटेन्मेंट सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतायेत. संगीत शैलेंद्र बर्वे यांचे आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संजय सिंग यांनी सांभाळली आहे.
‘Once मोअर १ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.