Sunday, 16 June 2019

‘Once मोअर’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘९०% नवरा बायको हे मागच्या जन्मीचे शत्रू असतात’ या टॅगलाईनने प्रदर्शित झालेलं ‘Once मोअर या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. पोस्टरवरच्या विविध व्यक्तिरेखेतील नामवंत कलाकार आणि त्यांचे ऐतिहासिक पेहराव यामुळे चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी असणारा हा चित्रपट नेमका कशावर आहेयाविषयीचे तर्क-वितर्क लढवले जातायेत. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणाऱ्या ‘Once मोअर या चित्रपटाच्या पोस्टरमधून भेटीला आलेली ही सगळी पात्र लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटामधून नेमका कोणत्या गोष्टीचा रहस्यभेद होणार याचा उलगडा १ ऑगस्टला होईल.
वंशिका क्रिएशनदेवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांच्या माध्यमातून भेटीला आलेले दिग्दर्शक-अभिनेता नरेश बीडकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘Once मोअर हा पहिला चित्रपट आहे.
रोहिणी हट्टंगडीपूर्णिमा तळवलकरभारत गणेशपुरेविष्णू मनोहरनरेश बीडकर आदि सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकारांसोबत आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी हे दोन नवे चेहरे चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटीलसुहास जहागीरदार, निलेश लवंदे आणि विष्णू मनोहर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूर, सुदिप नाईक, संपदा नाईक आणि व्ही. टी एच. एटंरटेन्मेंट सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतायेत. संगीत शैलेंद्र बर्वे यांचे आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संजय सिंग यांनी सांभाळली आहे.
‘Once मोअर १ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment