Friday, 28 June 2019

बाळूमामाच्या नावनं चांगभलं मालिकेमध्ये संपन्न होणार बाळूमामा आणि सत्यवाचा विवाहसोहळा !

मुंबई २८ जून, २०१९ : कलर्स मराठीवर सुरु असलेली बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिका आता एका महत्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन पोहचली आहे.मालिकेमध्ये अखेर  बाळूमामा आणि सत्यवा यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे... पहिल्यापासून बाळूमामांचा सत्यवाबरोबर लग्न करण्यास नकार होता.. अनेक प्रयत्न करूनही बाळूमामा लग्नाला होकार देत नव्हते. मात्र सुंदराच्या सांगण्यावरून हलसिद्धनाथांचा कौल घेण्यास बाळू तयार होतो.. अखेर बाळूमामानी लग्नास होकार द्यावा यासाठी हलसिद्धनाथ बाळूमामांना कौल देतात त्यानुसार बाळूमामांसमोर सत्यावाशी लग्न करण्यावाचून पर्याय उरत नाही...कौल विरोधात गेल्यानंतरही बाळूमामा लग्न टाळण्यासाठी प्रयत्न करतात पण ते असफल होतात...अखेर बाळूमामा सत्यवाशी लग्न करण्यास तयार होतात... यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण...अनेक विरोधातून घडणार हे लग्न बाळूमामा आणि सत्यवाचा आयुष्यात अनेक नाट्यमय वळण घेऊन येणार आहे. बाळूमामा आणि सत्यवचा हा संसार कसा फुलणार हे बघणं रंजक ठरणार आहे. याचसोबत मालिकेत बाळूमामांच्या प्रपंच्याचात्यांच्या अपार प्रेमाचागोरगरिबांच्या  हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार प्रेक्षकांना घडणार आहे. प्रपंचाला सुरुवात तर झालीपण बाळूमामा आणि सत्यवाचे नाते कसे होते त्यांनी बाळूमामांना कशी साथ दिली कोणत्या अडचणी आल्या, आलेल्या संकंटाना ते कसे सामोरे गेले हा सगळा प्रवास प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तेंव्हा नक्की बघा “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” सोम ते शनि संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर
सगळे मंगलमय सुरु असताना अजूनही अरिष्ट टळलेले नसूनविवाहाच्या शुभ प्रसंगी बाळूमामांनी सत्यवाच्या वडिलांना दिलेल्या  शापामुळे त्यांचा मृत्यू होतो.... आणि दु:खाच सावट सगळ्याच कुटुंबावर पसरते... आता पुढे काय होईल सत्यवा आणि सुंदरा बाळूमामांना माफ करू शकतील बाळूमामा सुंदराला शापामागचे कारण काय होते हे सांगू शकतील ? सत्यवा आणि बाळूमामांच्या संसारामध्ये आलेले हे अरिष्ट कस दूर होईल ?
हे जाणून घेण्यासाठी बघा “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” सोम ते शनि संध्या. ७.३० वा. आपल्या लाडक्या  कलर्स मराठीवर !!!

1 comment: