Thursday, 27 June 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – या सदस्याच्या वाढदिवसाचे घरामध्ये झाले जंगी सेलिब्रेशन !


मुंबई २७ जून, २०१९ :बिग बॉस मराठी सिझन २ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांची मने जिंकत आहेत... या सिझनचा विजेता कोण असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे... बिग बॉस घरातील सदस्यांना वेगवेगळे टास्क आणि सूचना देतातच पण ते सदस्यांना ससरप्राईझ देखील देतात...काल घरातील सदस्याला असेच एक सरप्राईझ मिळाले...बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एका सदस्याच्या वाढदिवसाचे काल जंगी सेलिब्रेशन करण्यात आले... नेहा शितोळेचा वाढदिवस असल्याने शिव, हीना, अभिजित केळकर, वैशाली आणि सुरेखा ताई यांनी मिळून तिला सुंदरसे सरप्राईझ दिले... घरामध्ये केक आणू शकत नसल्याने त्यांनी कलिंगडलाच केक बनवले आणि HBD असा मेसेज लिहून रात्री तिला सरप्राईज दिले... नेहाला बिग बॉसकच्या घरामध्ये देखील छानसा बुके, केक पाठविण्यात आला... नेहा हे सरप्राईज बघून खूपच भावूक झाली... याचबरोबर वैशालीने सुंदर गाणे देखील म्हंटले...

No comments:

Post a comment