Showing posts with label बिग बॉस मराठी सिझन २. Show all posts
Showing posts with label बिग बॉस मराठी सिझन २. Show all posts

Monday, 29 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ - माधवच्या घराबाहेर जाण्याने नेहा आणि शिवानीला अश्रू अनावर ! “मी एका दिवसात दोन माणसं नाही गमावू शकतं”- नेहा

मुंबई २९ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल माधव देवचके घराबाहेर पडलाज्यामुळे शिवानी आणि नेहा आता घरामध्ये एकट्या पडल्याआहेतआज नेहा शिवानीकडे तिचे मन मोकळं करताना दिसणार आहे... या दरम्यान दोघींना अश्रू अनावर झालेनेहाने शिवानीला सांगितले "माझ्यामनामध्ये कधीच तुमच्याबद्दल वाईट विचार आले नाही". यावर शिवानीने नेहाला सांगितले "आता आपण एकत्र राहायचे आहेअजिबात भांडायचे नाहीये".शिवानीने नेहाची माफी देखील मागितली आणि तिला सांगितलं किमी जर बोलले नसते तर माझ्या मनामध्ये राहिले असते... त्यावर नेहाचे म्हणणे आहेमला त्या गोष्टीचा राग आला नाहीयेपण मला वाईट वाटलेकारण माणूस म्हणून मी खरंच इतकी वाईट नाहीयेमी गेम वैगरे नाही खेळणारतुमच्यासोबतशिवनीचे म्हणणे पडलेमी काहीतरी कारणास्तव सांगत होते कि असं वागणं बंद करा.  त्यामागे काहीतरी भक्कम कारण होतंतो त्याच्यापण कारणामुळे गेला असावा बाहेर पणकाय होत एखादा माणूस चुकीचा दिसायला लागतोतो मूर्ख होता बोलायचो.नेहाने शिवानीला सांगितले, "मी एकादिवसात दोन माणसं नाही गमावू शकतं".
आता बघूया पुढे घरामध्ये काय होईल ? शिवानी आणि नेहाची मैत्री अशीच टिकून राहील का घरामध्ये ? कि अजून गैरसमज होऊन भांडण होतील ... तेंव्हाबघायला विसरू बिग बॉस मराठी सिझन  आज रात्री .३० वाआपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी सिझन २ - दिवस ६५ ! अभिजीत बिचुकले घरामध्ये परतणार "महाराष्ट्रातलया रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार" - अभिजीत बिचुकले


मुंबई २९ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल माधव देवचके बाहेर पडला... त्याला दिलेल्या विशेष अधिकाराने त्याने नेहाला पुढीलआठवड्यासाठी सेफ केले... माधवच्या जाण्याने नेहा आणि शिवानीला मोठा धक्का बसला आहेत्याच्या जाण्याने आता नेहा आणि शिवानीची काययोजना असेल ? हे बघणे रंजक असणार आहे... या आठवड्यामध्ये सदस्यांवर बिग बॉस कोण कोणते टास्क सोपवणार ? कोण घराचा नवा कॅप्टन बनणारकोण  कोणाला नॉमिनेट करणार ? हे बघणे रंजक असणार आहे...
ज्या क्षणाची प्रेक्षक वाट बघत होते तो क्षण आला असून आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत बिचुकलेंची एंट्री होणार आहे... अभिजीतबिचुकलेंच्या एंट्रीने घरातील समीकरणं नक्कीच बदलणार ... घरामध्ये आता नवीन ग्रुप तयार झाले असूननवी नाती तयार झाली आहेतयासगळ्यामध्ये बिचुकलेंची योजना काय असेल ते कोणत्या ग्रुपमध्ये जातील ? कि ते त्यांचाच स्वतंत्र ग्रुप तयार करतील ? कि वैयक्तिक खेळतील हेकळेलच... पण त्यांच्या येण्याने खेळाला नवी रंगत येणार हे निश्चित
“अगर मैने एकबार कमिटमेंट करली तो मै खुदा किभी नाही सुनताया शब्दांत अभिजीत बिचूकलेंनी घरामध्ये एंट्री घेतली... तेंव्हा नक्की बघा बिग बॉसमराठी सिझन  आज रात्री .३० वाआपल्या कलर्स मराठीवर.

Sunday, 28 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ - बिग बॉस मराठीच्या घरामधून माधव देवचके घराबाहेर ...

मुंबई २८ जुलै२०१९बिग बॉस मराठीच्या WEEKNED चा डावमध्ये या आठवड्यामध्ये माधव आणि शिवानीची चांगलीच शाळा घेतली. नेहा, शिवानी आणि माधवमध्ये सुरु असलेल्या वाद, भांडण आणि खटके याबद्दल नेहाला महेश मांजरेकर यांनी सल्ला दिला. रुपाली सध्या घरामध्ये शिवानी म्हणेल तेच करते आणि ती म्हणेल तीच पूर्व दिशा असं सुरु आहे, रुपालीने शिवानीचे वकीलपत्र घेतले आहे असे वाटते... त्यावर रुपालीचे म्हणणे होते तसे नाहीये, महेश मांजरेकर यांनी सांगितले तुझ्या कृतीतून दाखव तेंव्हा विश्वास बसेल. तर शिवानीने हीनाच्या आईची माफी मागितली. घरात एक टास्क रंगला ज्यामध्ये घरात कोण कसे चुकत आहे, त्या सद्स्याबाबत काय वाटते याबद्दल सदस्यांना कानउघडणी करायची होती. ज्यामध्ये आरोहने शिवची, हीनाने शिवानीची, नेहाने माधवची, किशोरी यांनी रुपालीची तर शिवानीने वीणाची कानउघडणी केली. प्रत्येक आठवड्यामध्ये एका सदस्याला घराबाहेर जाणे अनिवार्य आहे. या आठवड्यामध्ये माधव, हीना, वीणा, नेहा, किशोरी हे सदस्य नॉमिनेट होते... माधव आणि किशोरी डेंजर झोनमध्ये आले आणि माधवला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडावे लागले. शिवानी,हीना आणि नेहाच्या खूप जवळचा मित्र घरामधून बाहेर पडला आणि त्यामुळे या तिघींना अश्रू अनावर झाले... माधवच्या बाहेर जाण्याने नेहा आणि शिवानीला खूप मोठा धक्का बसला. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन बनेल सदस्यांना कोणते टास्क मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.      
बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर माधवला आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर AV दाखविण्यात आली... "माणूस म्हणून या घरामध्ये खूप छान होतास" तर माधव कधीच डर्टी गेम खेळाला नाही, कधी जास्त दुसऱ्या सदस्यांबाबत बोलला नाही असे महेश मांजरेकर यांनी सांगितले.  माधवला एक विशेष अधिकार माधवला दिला, त्याला कोणत्याही एका सदस्याला सेफ करायचे होते आणि त्याने नेहाला सेफ केले.
WEEKNED चा डावमध्ये घरामध्ये एक टास्क खेळण्यात आला ज्यामध्ये सदस्यांनी एकमेकांसोबत डान्स सादर केला. अभिजीत केळकर आणि किशोरी शहाणे यांनी मेंदीच्या पानावर या गाण्यावर डान्स केला... आ देखे जरा या गाण्यावर शिवानी आणि वीणा, शिव आणि हीनाने तुझ्या प्रीतीचा या गाण्यावर डान्स केला. ज्यामुळे घरामध्ये जरा हलकंफुलकं वातावरण तयार झाले. ज्योती सूर्यवंशी यांनी शिवानीला वूट आरोपी म्हणून घोषित केले. त्यांनी शिवानीला आगळीवेगळी सजा दिली, तिला हिब्रू भाषेमध्ये गाणे म्हणायला सांगितले... पण शिवानीने हीनाच्या मदतीने गुजराती भाषेमध्ये गाणे म्हंटले. तर चुगली बूथमध्ये शिवानीला चाहत्याने माधवबद्दल चुगली केली... तर या टास्कमध्ये वीणावर महेश मांजरेकर खूप चिडले... मला अटीट्युड आवडत नाही असे त्यांनी वीणाला खडसावले. 
बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल आणि कोण घराबाहेर जाईल हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.  

Friday, 26 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – शिवानीने मागितली किशोरी शहाणेंची माफी ... घरात कोणासाठी बनतोय बासुंदी आणि लॉंग ड्राईव्हचा बेत...


 
मुंबई २६ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी आणि किशोरीताईचे कडाक्याचे झालेले भांडण अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे... पण त्यानंतर आता सगळ सुरळीत सुरु आहे... आज घरामध्ये अस काय घडलं ज्यामुळे किशोरी शहाणे यांना अश्रू अनावर झाले आणि शिवानीने किशोरीताईची माफी मागितली... शिवानीचे म्हणणे होते, तुम्ही म्हणाल्या चला आता तर मला वाटले कि तुम्ही बऱ्या आहात... तर किशोरी त्यावर म्हणाल्या “तू सारख विचारत होतीस म्हणून मी बोले”. शिवानीने सांगितली मी मज्जा करत होतेनको करू का मी तुमच्यासोबत मज्जा मी नाही करणार ... किशोरीताई म्हणाल्या दिसायला खूप वाईट दिसले कारण पोट दुखत आहे... पण त्यावर शिवानीचे म्हणणे होते तुम्ही नसत म्हंटल तर मी नसत बोलेमी इतकी इनह्युमन नाहीये”...
किशोरीताईचा मूड चांगला करण्यासाठी शिवानी आज घरामध्ये बासुंदीचा बेत करणार आहे... ईतकेच नसून ती किशोरीताईना ड्राईव्हला पण ती घेऊन जाणार आहे ते पण जुहू ते मरीन ड्राईव्ह ... असे तिने नेहाला सांगितले.

बिग बॉस मराठी सिझन २ – शिवानीने मागितली किशोरी शहाणेंची माफी ... घरात कोणासाठी बनतोय बासुंदी आणि लॉंग ड्राईव्हचा बेत...


 
मुंबई २६ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी आणि किशोरीताईचे कडाक्याचे झालेले भांडण अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे... पण त्यानंतर आता सगळ सुरळीत सुरु आहे... आज घरामध्ये अस काय घडलं ज्यामुळे किशोरी शहाणे यांना अश्रू अनावर झाले आणि शिवानीने किशोरीताईची माफी मागितली... शिवानीचे म्हणणे होते, तुम्ही म्हणाल्या चला आता तर मला वाटले कि तुम्ही बऱ्या आहात... तर किशोरी त्यावर म्हणाल्या “तू सारख विचारत होतीस म्हणून मी बोले”. शिवानीने सांगितली मी मज्जा करत होतेनको करू का मी तुमच्यासोबत मज्जा मी नाही करणार ... किशोरीताई म्हणाल्या दिसायला खूप वाईट दिसले कारण पोट दुखत आहे... पण त्यावर शिवानीचे म्हणणे होते तुम्ही नसत म्हंटल तर मी नसत बोलेमी इतकी इनह्युमन नाहीये”...
किशोरीताईचा मूड चांगला करण्यासाठी शिवानी आज घरामध्ये बासुंदीचा बेत करणार आहे... ईतकेच नसून ती किशोरीताईना ड्राईव्हला पण ती घेऊन जाणार आहे ते पण जुहू ते मरीन ड्राईव्ह ... असे तिने नेहाला सांगितले.

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ६१ ! घरात रंगणार लक्झरी बजेट कार्य ! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वधू वर सूचक मंडळ


मुंबई २६ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात सात बारा हे साप्ताहिक कार्य रंगत आहे... आज घरामध्ये बिग बॉस सदस्यांवर लक्झरी बजेट कार्य सोपवणार आहेत... या कार्याचे स्वरूप ऐकताच सदस्यांना खूप गंमत वाटली... बिग बॉस मराठीच्या घरातील दोन सदस्य वीणा आणि शिव यांच्यातील मैत्री सुंदर आणि प्रेरणादायी आहे... दोन्ही सदस्य एकमेकांची काळजी घेतात आणि प्रेमाने एकमेकांशी बोलतात... पण यांच्यात खटके देखील उडतात आणि मग मैत्रीत अडथळा येतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कार्यामध्ये नेमून दिलेली दोन कुटुंबे वधू - वर सूचक मंडळात जाणार आहेत... आता या वधू – वर सूचक मंडळात काय घडणार ?कोणाची बाजू वरचढ ठरणार कोण जिंकणार ? हे बघणे रंजक असणार आहे... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
कालच्या भागामध्ये नेहा आणि टीम B मधील सदस्यांमध्ये बराच वाद झाला... नेहा आणि शिवानीने केलेल्या युक्तीची प्रशंसा देखील बिग बॉस यांनी केली... किशोरी आणि नेहा मध्ये फुलं मोजण्यावरून आणि मार्क्स देण्यावरून वाद झाला. शिवानीला सुरु टास्कमध्ये रडू कोसळले, कारण ज्याप्रकारे सदस्य टास्क खेळत होते त्याची भीती वाटणे सहाजिक होते... तर शिवचा हीना आणि आरोह बरोबर वाद झाला... आज या टास्कमध्ये काय होणार कोणती टीम बाजी मारणार हे कळेलच.

Thursday, 25 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – शिव आणि आरोहमध्ये कशावरून झाला वाद ? “तुला त्या भाषेत उत्तर देईन मी” – शिव


 
मुंबई २५ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये वाद होण्यासाठी काही मोठ कारण लागतच असे नाही... अगदी छोट्या कारणावरूनही हे वाद घरामध्ये झाले आहेत आणि होतात... सध्या घरामध्ये सात बारा हे साप्ताहिक कार्य सुरु आहे... ज्यामध्ये सदस्यांचे खटके उडायला सुरुवात झाली आहे... काल अभिजीत आरोहला म्हणाला तुला हळूहळू कळेल कोण कस खेळत ते... तर आज देखील आरोह आणि नेहामध्ये वाद होणार आहे... आरोहचे नेहाला म्हणणे आहे चीटिंग करू नकोस... पण टास्कमध्ये आरोह शिवला अस काय म्हणाला ज्याचा राग शिवला आला आणि त्याने आरोहला जाब विचारला... इतकेच नसून हीनाबरोबर देखील शिवची बाचाबाची होताना दिसणार आहे...
आरोहने शिवबद्दल रोडीज कार्यक्रमाला धरून एक वक्तव्य केले ज्याचा राग शिवला आला. आणि तो आरोह म्हणालाजर आता रोडीज जर दाखवला ना तुला तर तू उभा पण नाही रहाणार इथे. मी प्रेमाने घेतो आहेटास्क संपला कि गोष्ट संपली... मी काही वैयक्तिक बोलतो का तुझ्याशी मी टास्कनंतर सगळ मिटवतो... जर तुला रोडीज काढायचं असेल तर मी तशी उत्तर देऊ का आरोह त्यावर म्हणालातुला जशी उत्तर द्यायची तशी दे ... शिवचे म्हणणे पडले तुला हे मिटवायचे आहे कि वाढवायचे आहे मी त्या भाषेमध्ये बोलू शकतो. तुला जर रोडीज काढायचे आहे तर मी दाखवू का तुला त्यावर आरोह म्हणाला, “काय दाखवणार आहेस तू ” ?आणि वाद वाढला... बघूया पुढे काय होईल ...
शिव आणि हीनामध्ये देखील आज टास्कवरून वाद होणार आहे... “तुम्हांला खेळायला नाही येत तर गप बसंतू मला नको सांगूस”. हीनाचा शिवला सल्ला... शिवचा आवाज चढला हीनाला त्याने विचारले “तू शिकवशील का आता मला”त्यावर हीनाचे म्हणणे होते, “तुम्हांला हीच भाषा समजते”. शिवचे म्हणणे आहे, “तू उत्तर देऊन दाखव, त्या भाषेत मी उत्तर देईन.
भांडण, वाद – विवाद, आरोप – प्रत्यारोप, चिडीचा डावमेहेनत घेऊन टास्क करण हे सगळ करून बघूया आज कोण बाजी मारणार... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ६० ! आरोह, किशोरीचा नेहासोबत वाद चिडायचं नाही नेहा – आरोह


 
मुंबई २५ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सात बारा हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे... आज या टास्क दुसरा दिवस असून टीम B मधील सदस्य शेतकरी आणि टीम A मधील सदस्य कीटक बनतील. टीम A ने काबीज केलेल्या शेतजमिनी व्यतिरिक्त उर्वरित जमीन टीम B ला आजच्या कार्याच्या सुरुवातीला शेती करण्यासाठी मिळणार आहे. या कार्यामध्ये दोन्ही टीमने आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आता बघूया या टास्कमध्ये कोण बाजी मारेल कोणचे कोणाशी कोणाचे वाद होतील ? नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आरोह वेलणकर वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आला... आणि आता त्याचा घरातला हा पहिलाच टास्क असून या टास्कमध्ये आज त्याचा वाद नेहाशी होणार आहे... किशोरी आणि नेहा आपापल्या टीमच्या मुकादम आहेत... बझर वाजल्यानंतर विरोधी टीमने लावलेली फुलं मोजून त्यांची संख्या बोर्डवर लिहायची आहे... आणि याचवेळेस नेहाचे म्हणणे आहे ज्या फुलांच्या कंड्या तुटल्या आहेत ती फुलं मी नाही मोजणारकारण इतकी लहान काडी आमची देखील काल मोजली नव्हती... त्यावर आरोह म्हणाला काहीच संबंध नाहीये... नेहा चिडायचे नाही आणि चीटिंग नाही करायची... त्यावर शिवानीचे म्हणणे होते बरोबर आहे संचालिकेचा नियम आहे. किशोरीचे म्हणणे आहे मी आजू फुलं मोजली नाही आहे थांब... हीनाने देखील सांगितले तिला हात लावायला देऊ नकातू काल करत असताना कोणीच काही बोले नाही नेहा”.
या सगळ्या वादावर नेहाने “मी मोजणारच नाहीआणि अप्रूव्ह पण नाही करणार”. असे सांगितले ... आरोहचा पारा हा म्हणण्यावर चढला आणि तो म्हणाला त्याचा संबंधच नाहीये नेहा. तुझ्यावर काही नाहीये. नेहाचे म्हणणे होते, मी विरुध्द टीमचा मुकादम आहे मी जे ठरवणार ते फाईनल. आणि वाद वाढतच गेला. 
बघुया आजच्या भागामध्ये पुढे टास्कमध्ये काय होते ? 

Wednesday, 24 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – अभिजीतचा हीनाला सल्ला !

मुंबई २४ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या एकला चलो रे या नॉमिनेशन टास्कमध्ये पहिली नॉमिनेट झालेली सदस्य हीना पांचाळ होती आणि त्याचबाबतीत काल अभिजीत केळकर हीना सल्ला देताना दिसला... कालच्या टास्क मध्ये हीनाची चूक झाली... जर ती नीट खेळली असती तर नॉमिनेट नसती झाली असे अभिजीतचे म्हणणे होते... या सगळ्यावर अभिजीत काल हीनाशी बोलताना दिसला... अभिजीतचे म्हणणे होतेतू फोकस करायला हवा जर तू ते केलसं नातू चांगली खेळाडू आहेस विश्वास ठेव माझ्यावर... नॉमिनेशन टास्कमध्ये तू सगळ्यांशी तू एकाच वेळेला पंगा घेतला त्यामुळे प्रोब्लेम झाला सगळेच तुझ्या विरोधात झाले... तुझं जे खेळण होत ना ते सगळ्यात वेगळ होत कोणा सारखच नव्हततू मजा आणलीस खेळात. पण प्रत्येक फेरीचं तू टार्गेट ठरवलं असतस ना तर चांगल झाल असततू राहली असतीस. विणाने पण तुझ पाणी फेकलं ते पण भीतीने कि तू तीच पाडशील... तिथे चुकलीस तू हीना... आता बघूया अभिजीतच्या सांगण्यानंतर तरी हीना फोकस रहाते का ?
काल विणाची हीनावर चिडचिड झाली,आणि याबद्दल तिने शिवला देखील सांगितले. विणाचे म्हणणे पडले ती क्रेडीट घ्यायला बघते. तिचे म्हणणे होते प्रत्येक गोष्टीचे क्रेडीट आणि ब्लेम्स घ्यायची तिला काहीच गरज नव्हती... शिव, हीना, अभिजीत आणि विणा मध्ये देखील चर्चा रंगली असताना विणाने हीनाला सांगितले तू आलीस तेंव्हा खूप strong होतीस पण त्यानंतर आतापर्यंत तू त्यातून बाहेर पडत नाहीयेस... आता बाहेर पड... आता मी चुकू नाही शकत... मी आता स्वत:वर लक्ष देणार आहे असे तिने अभिजीतला संगितले... 

बिग बॉस मराठी सिझन २ – शिवानी आणि नेहामध्ये अबोला… “नेहा आणि माझी मैत्री या घराच्या बाहेर” – शिवानी


 
मुंबई २४ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही नाती नक्की कशी आहेतती कधी बदलतील हे सांगता येत नाही. जस रुपाली आणि विणाच नात... त्यांच्या मैत्रीमध्ये काही गैरसमज आणि छोट्या छोट्या कारणामुळे आता दुरावा आला आहे... पण परत जुळू देखील शकेलहि शक्यता नाकारता येत नाही.. शिवानीच्या घरामधून जाण्याने नेहा खूप दुखावली होती पण तिच्या परत येण्याने ती तितकीच आनंदी देखील झाली होती... तिच्यासोबत माधवला देखील आनंद झाला होता... शिवानीच्या परत येण्याने जणू माधव आणि नेहाला त्यांची ताकद परत मिळाली असे वाटत होते. पण आता मात्र त्या मैत्रीमध्ये कुठेतरी दुरावा आला आहे असे दिसू लागले आहे... घरामध्ये राहताना एक दुसऱ्याला समजून घेणे खूप महत्वाचे असते... आणि या घरामध्ये प्रत्येक वळणावर नात्याची कसोटी लागते...
शिवानी आज माधवला सांगताना दिसणार आहेआता मी नेहाशी बोलणार नाही... कारण तिला मस्ती कळत नाही, तिने केलेली मस्ती आपण सहन करायची आणि आपण केलेली मस्ती तिला सहन होत नाही... यावर माधवने देखील दुजोरा दिला. तिने पुढे असे देखील सांगितले, नेहा आणि माझी मैत्री या घराच्या बाहेर ... तिची माझी मैत्री टिकायची असेल तर या घराबाहेर टिकेल पण आता मला तिच्याशी अजिबात बोलायचे नाही. एकही वाक्य मी तिच्याशी यापुढे बोलणार नाहीये. माधवचे म्हणणे आहे, नाही बोलणार असे का करायचेमैत्री नको करूसओव्हर फ्रेंडली नको होऊस... रुपाली करते तस कर...
बघूया आता हा दुरावा कधी मिटेल शिवानी आणि नेहा एकमेकींना समजून घेतील का तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ५९ ! घरामध्ये रंगणार “सात बारा” हे साप्ताहिक कार्य का थांबवावे लागले बिग बॉसना साप्ताहिक कार्य ?


 
मुंबई २४ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन कार्य रंगले... ज्यामध्ये पहिल्याच फेरीमध्ये हीना नॉमिनेट झाली... आणि मग, विणा जगताप,नियमांचे उल्लंघन केल्याने किशोरी शहाणे आणि माधव देवचके आणि नेहा शितोळे... वाईल्ड कार्ड एन्ट्री असल्याने आरोह वेलणकर आणि घराची कॅप्टन असल्याने शिवानी सुर्वे या नॉमिनेशन कार्यापासून सुरक्षित होते... कार्या दरम्यान नेहा आणि शिवानीमध्ये बरीच बाचाबाची झाली... आज घरामध्ये “सात बारा” हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे...टीम A आणि टीम B अशा दोन टीम्स मध्ये हे कार्य पार पडेल... अभिजीतविणा, हीना, आरोह आणि किशोरी एका टीममध्ये तर शिवानी, नेहा,रुपाली, शिव आणि माधव दुसऱ्या टीम मध्ये असणार आहेत... आता बघूया या कार्यामध्ये कोण बाजी मारणार आणि कोणती टीम हरणार पण टास्कमध्ये असे काय झाले कि बिग बॉस यांनी घोषणा केली, हे कार्य याच ठिकाणी थांबवण्यात येत आहे”. जे नाणून घेण्यासाठी नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
कार्या दरम्यान प्रत्येक टीम आपापली योजना आखताना दिसणार आहे... ज्यामध्ये माधवचे म्हणणे आहे, “मला आवडेल... पण मुकादमच्या अजून काय काय गोष्टी आहेत त्या मला सांगा नाहीतर अस नको व्हायला मी तिकडे जास्तच काही केले”. अभिजीतचे त्याच्या टीमला म्हणणे आहे, “जे कीटक आहेत आता कसे हि जा आपण आधी पलीकडे जायचे आणि तिथून सुरु करायचे... विणाचे म्हणणे आहे ते काढा आणि फेका मुकादम पकडेल ते”. नेहाचे तिच्या टीमला म्हणणे आहेसगळे मधले बांबू आधी हातामध्ये घ्या, त्यांना बांबू मिळू देऊ नका”.
टास्क सुरु झाल्यावर किशोरीताईना खारूताई असे सदस्य म्हणू लागले... तरहीना आणि शिवमध्ये पुन्हाएकदा वाद विवाद सुरु झाला... हीना शिवच्या अंगावर येत होती... आणि हीनचे म्हणणे होते बळाचा वापर करू नकोस... त्यावर शिव म्हणाला “तू अंगावर येते आहेस माझ्यामला डोक्याने हलका समजतेस का शिवानीचे म्हणणे होते ती मुद्दाम येते आहे. अभिजीत माधवला ढकलतो आहेत्यावर अभिजीतचे म्हणणे होते ढकलणारच ना... शिवानीचे यावर म्हणणे होते दादा काय बोलला ऐकलस का शिव ढकल तू पण... त्यावर अभिजीत म्हणाला ती मुद्दाम बोलते आहे शिव... शिवचे यावर सगळ्यांनाच म्हणणे होते “मला गेम समजतो सगळे शांत बसा”.  बघूया आता कार्यामध्ये पुढे काय काय होईल ?

Tuesday, 23 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ५८ ! घरामध्ये रंगणार “एकला चलो रे” हे नॉमिनेशन कार्य ! विणा आणि हीनाला अडगळीच्या खोलीची शिक्षा ...


 
मुंबई २३ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल हल्ला बोल हे कॅप्टनसी कार्य अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वे मध्ये रंगले ज्यामध्ये शिवानीने बाजी मारून घराची नवी कॅप्टन होण्याचा मान पटकावला... टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरेच वादआरोप – प्रत्यारोप झालेओढाताणी झाली... पण या सगळ्यावर मात करून शिवानी हा टास्क जिंकली... टास्कमध्ये माधव ज्याप्रकारे खेळला त्याला अभिजीतच्या टीमने विरोध केला. टास्कच्या आधी नेहा आणि शिवानी तर टास्क दरम्यान हीना - आणि शिवानीमध्ये वाद रंगला. शिवानी हीनाला तिच्या आईवरून जे काही बोली ते तिला अजिबात आवडले नाही... तर रुपालीने देखील शिवानी ज्याप्रकारे तिला टास्क मध्ये चांगली खेळली याबद्दल बोलली ते आवडले नाही आणि तिने हि गोष्ट विणाला सांगितली. आज घरामध्ये “एकला चलो रे” हे नॉमिनेशन कार्य रंगणार आहे... तेंव्हा कोण या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट होणार कोण सेफ होणार हे बघणे रंजक असणार आहे... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
या कार्या दरम्यान विणा आणि हीनाला घरामध्ये कुजबुज करण्यास सक्त मनाई आहे अशी घोषणा बिग बॉसनी केली... आणि शिवानीने या दोघींना अडगळीच्या खोलीमध्ये डांबले, आणि या खोलीमध्ये बोलण्यास मनाई असल्याचे तिने सांगितले... त्यावर विणा आणि हीना म्हणाल्या आत आलो आहे ना आतमध्ये मग का नाही बोलायचे त्यावर शिवानी म्हणाली मी कॅप्टन आहे माझे पण काही नियम असूच शकतात.

Monday, 22 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – विणा आणि शिवमध्ये कशावर चर्चा सुरु आहे ? “तुझ्याशी नाही बोलो तर मी कमजोर पडेन” – शिव

मुंबई २२ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य बराच काळ एकत्र असल्याने त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते तयार होते... जे बऱ्याचदा घराबाहेर पडल्यावर देखील तसेच रहाते... असेच नाते विणा आणि शिवमध्ये देखील तयार झाले आहे. त्यांच्यातील मैत्री घरातील सदस्य आणि प्रेक्षकांपासून काही लपलेली नाही... शिव विणासाठी कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतो... मर्डर मिस्ट्री हा टास्क करण्यास नकार दिला कारण, त्यामध्ये विणाचा टॉप नष्ट करायचा होता... पण त्यावरूनWEEKEND चा डावमध्ये महेश मांजरेकरांनी त्याला खडे बोल सुनावले... तर अभिजीत केळकरने देखील त्याला समजवण्याचा प्रयत्न केला...कधी कधी विणाला मदत करण्याच्या प्रयत्नात विणाचेच नुकसान होईल असे देखील सांगितले... कारण असे झाल्यास ती शिववर अवलंबून आहे असे दिसते... तर शिवचे खेळण्यावर लक्ष कमी झाले आहे असे प्रेक्षकांना देखील दिसत आहे असे म्हणणे पडले. शिवने महेश मांजरेकरांना शब्द दिला कि, या आठवड्यापासून त्याच्यामध्ये बदल नक्कीच दिसेल... आता बघूया शिव आणि विणा त्यांच्यामध्ये काय बदल करतील ?
याच विषयावरून शिव आणि विणामध्ये आज चर्चा रंगणार आहे. शिवचे म्हणणे आहेमहेश मांजरेकरांना असे वाटते आहे कि, आपण एकमेकांच्या मध्ये येतो आहे आणि आपण त्या गोष्टीवर आता लक्ष देऊ. पण त्याचा अर्थ असा नाही कि आपण बोलायचं नाही... एक तर आपण जसे बोलतो आहे तसेच बोलू फक्त लक्ष देऊ कुठे काय करायचे आहे. पण जस होत तसच ठेऊ आणि तस नाहीतर पूर्ण बंद याच्यासाठी जर मी तुझ्याकडे आलो आणि खोट हसलो तर ते नाटकी बोलण होईलते मी नाही करू शकत. तुझ्याशी नाही बोलो तर मी कमजोर पडेन असे मला वाटते... सरांनी जे सांगितलं ते आपण सकारात्मक पद्धतीने घेऊयाचुका बरोबर करु, टास्क मध्ये लक्ष देऊआणि आपण टास्कच्या वेळेस एकमेकांच्या मध्ये नाही येणार याची काळजी घेऊ. 
आता शिवच्या या म्हणण्यावर विणाचे काय म्हणणे आहे कळेलच तेंव्हा नक्की बघा  बिग बॉस मराठी सिझन २ च्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ५७ ! घरात रंगणार कॅप्टनसी टास्क शिव शिवानीसमोर मांडणार त्याचे मत


  
मुंबई २२ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीध्ये कालच्या भागामध्ये वैशाली म्हाडे घराच्या बाहेर पडल्याने अभिजीतशिवविणा यांना वाईट वाटले आहे... आज घरामध्ये “हल्ला बोल” हे कॅप्टनसी टास्क रंगणार आहे....हे कार्य अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वे मध्ये रंगणार आहे. आता या आठवड्यामध्ये शिवानी कि अभिजीत कोणाला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन होण्याचा मान मिळणार हे बघणे रंजक असणार आहे...तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर...
आज शिवानी आणि शिवमध्ये विणा आणि शिवच्या नात्याबद्दल चर्चा रंगणार आहे... त्यामध्ये शिवानी शिवला सल्ला देताना दिसणार आहे. शिवानीचे म्हणणे आहे,तुझा टॅटू खूपच छान आहेघराबाहेर गेल्यावर मी देखील अजिंक्यच्या नावाचा टॅटू करणार आहे... शिवचे म्हणणे आहे टॅटू म्हणजे खूप मोठी गोष्ट असते ना ?शिवानीने सांगितले अजिंक्यने माझ्या नावाचा टॅटू केला आहे... शिवचे म्हणणे आहेखूप मोठी गोष्ट आहे आयुष्यभर आपल्या शरीरावर रहणार, टॅटूला बघितल्यावर राग नाही आला पाहिजे ... शिवानीने त्याला विचारले आता दोघांकडून देखील सारखी भावना आहे असे समजू शकतेआता बाहेर जाईपर्यंत आणि गेल्यावर देखील असचं राहू दे... त्यावर शिव म्हणाला “बघू” तर शिवानीला जरा धक्का बसला आणि त्यावर ती म्हणाली “बघू?” त्यावर शिवने सांगितलेबघू म्हणजे माझी देखील तीच इच्छा आहेपण आपण कोणावर जबरदस्ती नाही ना करू शकत. मी इथे जसा दिसत आहे तसा शंभर टक्के खरा आहे आणि ती देखील खरीच आहे. त्यामुळे बाहेर जाऊन देखील असचं राहिलं नाही बदलणार”. 

Sunday, 21 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ - बिग बॉस मराठीच्या घरामधून वैशाली म्हाडे बाहेर...

मुंबई २१ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये रंगलेल्या मर्डर मिस्ट्री कार्यामध्ये सदस्यांनी ज्या चुका केल्या त्याबद्दल त्यांची महेश मांजरेकरांनी चांगलीच कानउघडणी केली... वूट आरोपी कोण यामध्ये एका प्रेक्षकाला भागामध्ये त्यांच्या नजरेमधील आरोपी सदस्याला शिक्षा देण्याची संधी मिळते. शिवने नियमांचे उल्लंघन केले यासाठी तेजश्रीने शिवला आरोपी ठरवले, आणि शिवने प्रेक्षकांची माफी मागावी ती पण मराठीमध्ये... हि सगळी गंमत होत असताना आठवड्यामध्ये सगळ्यात कठीण कार्य म्हणजे घराबाहेर कोण जाणार हे सांगणे ... प्रत्येक आठवड्यामध्ये घरामधून एक सदस्य बाहेर जातो तसेच या आठवड्यामध्ये देखील शिव ठाकरे, किशोरी शहाणे, माधव देवचके, हीना पांचाळविणा जगताप, वैशाली म्हाडे, नेहा शितोळे नॉमिनेटेड होते. किशोरी शहाणे आणि वैशाली म्हाडे डेंजर झोनमध्ये आले आणि वैशाली म्हाडेला या आठवड्यामध्ये घरातून बाहेर जावे लागले असे महेश मांजरेकर सांगितले... वैशालीच्या बाहेर जाण्याने अभिजीत, शिव आणि विणाला खुप दु:ख झाले... वैशाली, अभिजीत आणि शिव यांचे नाते पहिल्यापासूनच खूप खास होतेते एकमेकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते... त्यामुळे त्यांना वाईट वाटणे अगदीच सहाजिकच होते. वैशालीने अभिजीतला सांगितले मला तुझ्या हातात ट्रॉफी बघायची आहे आणि शिवला सांगितले दादाला म्हणजेच अभिजीतला नाही सोडायचे...  आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोण घराचा नवा कॅप्टन बनेल सदस्यांना कोणते टास्क मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.   
महेश मांजरेकर यांनी त्यांच्या घरातील दोन आवडत्या सदस्या डेंजर झोनमध्ये आल्या आहेत  असे सांगितले...पण हा गेमच असा आहे कि कोणाला तरी जावे लागतेच...वैशाली बाहेर पडताना महेश मांजरेकरांनी सांगितले तुझा सेन्स ऑफ ह्युमर, स्पष्टवक्तेपणा, गाणी खूप एन्जोय केले... बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर तिला आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर AV दाखविण्यात आली... वैशालीने तिचे मत मांडले, या घरामध्ये मला खूप चांगली माणसे मिळाली, खूप काही या घराने मला दिले, आठवणी दिल्या, मी खूप मस्ती केलीबिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्याचा माझा निर्णय बरोबर होता असे ती म्हणाली... या घरातून जाताना तिने एक शेवटचे गाणे ऐकवले “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या” आणि सगळ्यांनाच रडवले.
आरोहला महेश मांजरेकर यांनी प्रत्येक सदस्याबद्दल त्याचे मत दोन शब्दांमध्ये विचारले आणि Top ५ मध्ये कोण दिसते हे विचारले त्याने अभिजीत, नेहा, शिवानी, विणा आणि हीना यांची नावे सांगितली... तर महेश मांजरेकर म्हणाले माझ्या Top ५ मध्ये अजूनही शिव आहे... आता बघूया कोण असेल top ५ मध्ये. आजच्या भागामध्ये इमोजी ओळखून त्यावर डान्स करण्याचा खेळण्याचा गेम चांगलाच रंगला... किशोरीताईंनी शिवसोबत काटे नही कटते या गाण्यावर डान्स केला आणि हे गाणे वैशालीने म्हंटले. तर चुगली बूथमध्ये रुपालीला चाहत्याने चुगली केली कि, वैशालीने विणा आणि अभिजीतला सांगितल कि रडण हि रुपालीची स्ट्रॅटेजि आहे... रुपालीने आणि वैशालीमध्ये यावरून बराच वाद झाला. तर किशोरी शहाणे यांना देखील चाहत्याने चुगली केली कि रुपालीने त्यांना बिंडोक म्हंटलं... 
बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल आणि कोण घराबाहेर जाईल हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.  

बिग बॉस मराठी सिझन २ WEEKEND चा डाव महेश मांजरेकरांसोबत ! कोणी म्हंटले किशोरी शहाणे यांना बिंडोक ? शिव ठाकरे कोणासाठी घराबाहेर पडण्यास आहे तयार ?

मुंबई २१ जुलै२०१९ : काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आरोह वेलणकरची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे... त्याच्या येण्याने घरातील समीकरण कशी बदलतील तो कोणच्या बाजूने खेळेल कि एकटाच खेळेल हे बघणे रंजक असणार आहे... बिग बॉस मराठी सिझन २ च्या weekend चा डावच्या कालच्या भागामध्ये नेहा आणि माधवची महेश मांजरेकरांनी चांगलीच शाळा घेतली... महेश मांजरेकरांनी नेहा आणि माधवला चांगलेच खडसावले. अगदी छोट्या छोट्या मुद्यांवरून हीनाला घरात टार्गेट केले जाते आहे... ज्याप्रकारे किशोरीला केले गेलं त्याहून वाईट प्रकारे हीनाला टार्गेट करत आहात असे त्यांनी नेहा आणि माधवला सांगितले... नेहाला जाब देखील विचारला थोबाड फोडीन म्हणजे काय तर हीनाला देखील ती कुठे चुकते आहे हे सांगितले. शिवानीला या आठवड्यातील गुडperformer तर विणा प्रामाणिक खेळली (Fair performer)वाईट किशोरी शहाणे... तर हीना, वैशाली, माधव – नेहा हे देखील या आठवड्यामध्ये अगदीच वाईट खेळले असे महेश मांजरेकरांनी सदस्यांना सांगितले...
आजच्या भागामध्येमहेश मांजरेकरांनी शिवला विचारले तुला विणा बाहेर जाऊ नये अशी इच्छा आहे त्यावर शिव हो म्हणाला... त्यावर त्यांनी शिवला पर्याय दिलाविणा जाणार नाही... तू येतो का बाहेर आता बघूया शिवचे यावर काय उत्तर असेल तर घरामध्ये एक गेमरंगला ज्यामध्ये सदस्यांनी इमोजीवरून गाणी तयार करायची आहेत... माधवने सुन सायबा सुन हे गाणे तयार केले ज्यावर महेश मांजरेकरांच्या सांगण्यावरून त्याने हीनासोबत डान्स केला... तर टीप टीप बरसा पानीवर हीना, रुपाली यांनी डान्स सादर केला.पण विणाने सांगितले मी डान्स शेवटी करणार... बघूया तिने कसा डान्स केला ?
आज वूट चुगली बूथमध्ये किशोरी शहाणे यांच्या चाहत्याने रुपालीविषयी चुगली केली आहे... ज्यामध्ये रुपालीने किशोरी शहाणे यांना बिंडोक म्हंटले आहे... त्यावर रुपालीचे म्हणणे आहे मी असे कधीच नाही म्हंटले... त्यावर किशोरीताई म्हणाल्या सगळ्यांनीच मर्डर मिस्ट्री टास्क मध्ये पाहिले कोण कस खेळले... तर महेश मांजरेकरांनी नेहाला विचारले तुला वाटत का रुपाली अस म्हणाली असेलत्यावर नेहा हो म्हणाली.

Friday, 19 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – शिवानीने ओतले हीनाच्या अंगावर पाणी... “जे परागबरोबर केलसं तेच माझ्यासोबत केलसं” – हीना


 
मुंबई १९ जुलै२०१९ :बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणाचं नातं कोणाशी कधी बदलेल याचा नेम नाही... आज एका सदस्याबरोबर चांगल असेलल नात कोणत्या करणाने आणि कसे दुसऱ्या दिवशी बदलेल हे सांगता येत नाही... हीना आणि नेहा शिवानी येण्याआधी खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या होत्या... पण अचानक शिवानीच्या येण्याने हे नात बदललं... हीनाने  नेहाला नॉमिनेट करणे, हीना आणि नेहामध्ये भांडण होणे या सगळ्या गोष्टी घडत गेल्या ... पणया घरामध्ये कोणी तुमच्यासोबत असो वा नसो तुम्हांला खंबीर बनून उत्तर द्यावच लावत... काल हीनाने नेहाला तिच्या नवऱ्याने दिलेले पत्र लपवले... ते का लपवले आणि ती कधी परत देणार हे तीच तिलाच माहिती... आज घरामध्ये हीना आणि शिवानी मध्ये भांडण होणार आहे...
शिवानीने अचानक बाथरूम मध्ये जाऊन हीनाच्या अंगावर पाणी ओतले... यावरून तुम्हांला काही तरी आठवल असेलचं. असेच शिवानीने परागच्या बाबतीत देखील केले होते... आणि हीनाने देखील तिला हेच म्हंटले, “जे परागबरोबर केलसं तेच केलसं माझ्यासोबत”
आता बघूया पुढे काय होते ... शिवानी असं का वागली हीना शिवानी आणि नेहाला काही बोली का हे आजच्या भागामध्ये कळेलच...
तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.