मुंबई २१ जुलै, २०१९ : काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आरोह वेलणकरची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे... त्याच्या येण्याने घरातील समीकरण कशी बदलतील ? तो कोणच्या बाजूने खेळेल ? कि एकटाच खेळेल ? हे बघणे रंजक असणार आहे... बिग बॉस मराठी सिझन २ च्या weekend चा डावच्या कालच्या भागामध्ये नेहा आणि माधवची महेश मांजरेकरांनी चांगलीच शाळा घेतली... महेश मांजरेकरांनी नेहा आणि माधवला चांगलेच खडसावले. अगदी छोट्या छोट्या मुद्यांवरून हीनाला घरात टार्गेट केले जाते आहे... ज्याप्रकारे किशोरीला केले गेलं त्याहून वाईट प्रकारे हीनाला टार्गेट करत आहात असे त्यांनी नेहा आणि माधवला सांगितले... नेहाला जाब देखील विचारला थोबाड फोडीन म्हणजे काय ? तर हीनाला देखील ती कुठे चुकते आहे हे सांगितले. शिवानीला या आठवड्यातील गुडperformer तर विणा प्रामाणिक खेळली (Fair performer), वाईट किशोरी शहाणे... तर हीना, वैशाली, माधव – नेहा हे देखील या आठवड्यामध्ये अगदीच वाईट खेळले असे महेश मांजरेकरांनी सदस्यांना सांगितले...
आजच्या भागामध्ये, महेश मांजरेकरांनी शिवला विचारले तुला विणा बाहेर जाऊ नये अशी इच्छा आहे ? त्यावर शिव हो म्हणाला... त्यावर त्यांनी शिवला पर्याय दिला, विणा जाणार नाही... तू येतो का बाहेर ? आता बघूया शिवचे यावर काय उत्तर असेल ? तर घरामध्ये एक गेमरंगला ज्यामध्ये सदस्यांनी इमोजीवरून गाणी तयार करायची आहेत... माधवने सुन सायबा सुन हे गाणे तयार केले ज्यावर महेश मांजरेकरांच्या सांगण्यावरून त्याने हीनासोबत डान्स केला... तर टीप टीप बरसा पानीवर हीना, रुपाली यांनी डान्स सादर केला.पण विणाने सांगितले मी डान्स शेवटी करणार... बघूया तिने कसा डान्स केला ?
आज वूट चुगली बूथमध्ये किशोरी शहाणे यांच्या चाहत्याने रुपालीविषयी चुगली केली आहे... ज्यामध्ये रुपालीने किशोरी शहाणे यांना बिंडोक म्हंटले आहे... त्यावर रुपालीचे म्हणणे आहे मी असे कधीच नाही म्हंटले... त्यावर किशोरीताई म्हणाल्या सगळ्यांनीच मर्डर मिस्ट्री टास्क मध्ये पाहिले कोण कस खेळले... तर महेश मांजरेकरांनी नेहाला विचारले तुला वाटत का रुपाली अस म्हणाली असेल, त्यावर नेहा हो म्हणाली.
No comments:
Post a Comment