Tuesday, 30 July 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ६५ ! घरामध्ये रंगणार “तहानलेला कावळा” हे कॅप्टनसी कार्य !


 
मुंबई ३० जुलै, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर एक कार्य सोपवले ज्यानुसार त्यांना टॉप २ आणि बॉटम २ सदस्यांची नावे द्यायची होती ज्यांना कॅप्टनसीची उमेदवारी मिळणार होती ... सदस्यांनी टॉप २ मधील फक्त एकाच सदस्याचे नाव दिले ते म्हणजे अभिजीत केळकर दुसरे नाव बिग बॉस यांनीच सांगितले जे सदस्यांनीच चर्चेमध्ये घेतले होते आरोह वेलणकर... आता अभिजीत आणि आरोहमध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे... आता बघूया या टास्क मध्ये कोणता ग्रुप शक्ति पेक्षा युक्ति वापरुन हा टास्क त्यांच्या उमेदवारासाठी जिंकेल. आरोहच्या टीममध्ये शिवानी, अभिजीत बिचुकले, वीणा आणि नेहा असणार आहेत तर अभिजीत केळकरच्या टीममध्ये किशोरी, रूपाली, शिव आणि हीना असणार आहेत... तेंव्हा नक्की बघा कोण बनणार या आठवड्यात घराचा नवा कॅप्टन आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
रांझणातील तळाला गेलेले पाणी वरती यावे यासाठी शक्तीऐवजी युक्ती वापरून कावळ्याने खडे टाकून पाणी प्यायले होते. कॅप्टन्सीची संधी आज तळाला गेलेल्या पाण्यासारखी आहे... जी सदस्यांना खडे टाकून  मिळवायची आहे. यासाठी  बिग बॉस सदस्यांवर “तहानलेले कावळा” हे कॅप्टन्सी कार्य सोपवणार आहेत... प्रत्येक टीमने आपआपल्या जबाबदार्‍या वाटून घेतल्या आहेत...  बघूया पुढे होणार ?

No comments:

Post a Comment