Monday, 29 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ - दिवस ६५ ! अभिजीत बिचुकले घरामध्ये परतणार "महाराष्ट्रातलया रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार" - अभिजीत बिचुकले


मुंबई २९ जुलै, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल माधव देवचके बाहेर पडला... त्याला दिलेल्या विशेष अधिकाराने त्याने नेहाला पुढीलआठवड्यासाठी सेफ केले... माधवच्या जाण्याने नेहा आणि शिवानीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जाण्याने आता नेहा आणि शिवानीची काययोजना असेल ? हे बघणे रंजक असणार आहे... या आठवड्यामध्ये सदस्यांवर बिग बॉस कोण कोणते टास्क सोपवणार ? कोण घराचा नवा कॅप्टन बनणार? कोण  कोणाला नॉमिनेट करणार ? हे बघणे रंजक असणार आहे...
ज्या क्षणाची प्रेक्षक वाट बघत होते तो क्षण आला असून आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत बिचुकलेंची एंट्री होणार आहे... अभिजीतबिचुकलेंच्या एंट्रीने घरातील समीकरणं नक्कीच बदलणार ... घरामध्ये आता नवीन ग्रुप तयार झाले असून, नवी नाती तयार झाली आहेत. यासगळ्यामध्ये बिचुकलेंची योजना काय असेल ते कोणत्या ग्रुपमध्ये जातील ? कि ते त्यांचाच स्वतंत्र ग्रुप तयार करतील ? कि वैयक्तिक खेळतील हेकळेलच... पण त्यांच्या येण्याने खेळाला नवी रंगत येणार हे निश्चित. 
“अगर मैने एकबार कमिटमेंट करली तो मै खुदा किभी नाही सुनता" या शब्दांत अभिजीत बिचूकलेंनी घरामध्ये एंट्री घेतली... तेंव्हा नक्की बघा बिग बॉसमराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment