मुंबई 30 जुलै, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज “तहानलेला कावळा” हे कॅप्टनसी कार्य रंगणार आहे... ज्यामध्ये बिग बॉस यांनी कार्यासंबंधातले काही नियम आखून दिले आहेत... ज्यांचे उल्लंघन टास्क दरम्यान कोणीच करू शकत नाही... बिग बॉसचे नियम सगळ्या सदस्याना पाळणे बंधनकारक असते... पण शिव आणि विणाकडून महत्वाच्या नियमाचे उल्लंघन या कार्यादरम्यान होणार आहे.
बिग बॉस सगळ्या सदस्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत की, कार्या दरम्यान दिलेल्या सामुग्रीचा फक्त कार्यातच वापर करायचा आहे. पण, कार्या दरम्यान शिव आणि विणा यांनी कार्यासाठी दिलेल्या खड्यांचा वैयक्तिक भावना प्रदर्शित करण्यासाठी वापर केला. त्यामुळे शिक्षा म्हणून शिव आणि विणा यांनी रांझणातील खडया व्यतिरिक्त गार्डन, जीम आणि स्वीमिंग पूल मध्ये पडलेले सर्व खडे दोन्ही टीम्सच्या टोपलीत जसे होते तसे समान पातळीवर जमा करायचे आहेत...
आता टास्क मध्ये पुढे काय काय होईल ? सदस्य अजून कोणत्या चुका करतील ? कोणत्या नियमांचे उल्लंघन करतील ? हे बघूया बिग बॉस मराठी सिझन २ च्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment