Wednesday 31 July 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – सदस्यांना का झाले हसू अनावर ?

मुंबई ३१ जुलै, २०१९ : बिग बॉस मराठीमध्ये अभिजीत बिचुकले परतल्याने घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण असते... प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचे काहीतरी म्हणणे असते, प्रत्येक गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असते... अभिजीत बिचुकले स्वत:ला reality किंग समजतात... यांचे नेहेमीच म्हणण असतात One And Only अभिजीत बिचुकले... बिचुकलेंची घरामध्ये सुरू असलेली धम्माल मस्ती बघण्याजोगी असते... आज घरामध्ये सुरू असलेल्या कार्यात देखील बिचुकले यांनी गंमत आणली आहे... या कार्यानुसार बिग बॉस कधीही कोणत्याही सदस्याला statue आणि रिलीझची सूचना देऊ शकतात... आणि यामुळेच बिचुकले जरा अवघड परिस्थितीत अडकले आहेत...
नेहा, शिवानी, बिचुकले, रूपाली आणि आरोह बसले असताना बिचुकले बिग बॉसना विनंती करताना दिसणार आहेत... बिग बॉस कधीही statue सांगू शकतात त्यामुळे बिचुकले त्यांना सांगत आहेत “मी बाथरूम”ला जाणार आहे कृपया मला जाऊ द्या... त्यावर नेहाचे म्हणणे आहे त्याबद्द्ल प्रस्तावना न देता जाऊन या... पण,बिग बॉस यांनी मात्र बिचुकलेना टी शर्ट बदलताना statue केले...  हे बघून घरामध्ये एकच कल्ला झाला... आणि सगळ्याना हसू फुटले... घरातील सदस्यांचे म्हणणे पडले तुम्ही दरवेळा हेच करता म्हणून तुम्हाला statue केले... बाथरूममध्ये जाऊन बदलायचे कपडे ... हे बोलतानाच सदस्यांना हसू अनावर झाले...

No comments:

Post a Comment