मुंबई २९ जुलै, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल माधव देवचके घराबाहेर पडला, ज्यामुळे शिवानी आणि नेहा आता घरामध्ये एकट्या पडल्याआहेत. आज नेहा शिवानीकडे तिचे मन मोकळं करताना दिसणार आहे... या दरम्यान दोघींना अश्रू अनावर झाले. नेहाने शिवानीला सांगितले "माझ्यामनामध्ये कधीच तुमच्याबद्दल वाईट विचार आले नाही". यावर शिवानीने नेहाला सांगितले "आता आपण एकत्र राहायचे आहे, अजिबात भांडायचे नाहीये".शिवानीने नेहाची माफी देखील मागितली आणि तिला सांगितलं कि, मी जर बोलले नसते तर माझ्या मनामध्ये राहिले असते... त्यावर नेहाचे म्हणणे आहे, मला त्या गोष्टीचा राग आला नाहीये, पण मला वाईट वाटले, कारण माणूस म्हणून मी खरंच इतकी वाईट नाहीये, मी गेम वैगरे नाही खेळणारतुमच्यासोबत. शिवनीचे म्हणणे पडले, मी काहीतरी कारणास्तव सांगत होते कि असं वागणं बंद करा. त्यामागे काहीतरी भक्कम कारण होतं. तो त्याच्यापण कारणामुळे गेला असावा बाहेर पण, काय होत एखादा माणूस चुकीचा दिसायला लागतो, तो मूर्ख होता बोलायचो.नेहाने शिवानीला सांगितले, "मी एकादिवसात दोन माणसं नाही गमावू शकतं".
आता बघूया पुढे घरामध्ये काय होईल ? शिवानी आणि नेहाची मैत्री अशीच टिकून राहील का घरामध्ये ? कि अजून गैरसमज होऊन भांडण होतील ... तेंव्हाबघायला विसरू बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment