मुंबई २१ जुलै, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये रंगलेल्या मर्डर मिस्ट्री कार्यामध्ये सदस्यांनी ज्या चुका केल्या त्याबद्दल त्यांची महेश मांजरेकरांनी चांगलीच कानउघडणी केली... वूट आरोपी कोण यामध्ये एका प्रेक्षकाला भागामध्ये त्यांच्या नजरेमधील आरोपी सदस्याला शिक्षा देण्याची संधी मिळते. शिवने नियमांचे उल्लंघन केले यासाठी तेजश्रीने शिवला आरोपी ठरवले, आणि शिवने प्रेक्षकांची माफी मागावी ती पण मराठीमध्ये... हि सगळी गंमत होत असताना आठवड्यामध्ये सगळ्यात कठीण कार्य म्हणजे घराबाहेर कोण जाणार ? हे सांगणे ... प्रत्येक आठवड्यामध्ये घरामधून एक सदस्य बाहेर जातो तसेच या आठवड्यामध्ये देखील शिव ठाकरे, किशोरी शहाणे, माधव देवचके, हीना पांचाळ, विणा जगताप, वैशाली म्हाडे, नेहा शितोळे नॉमिनेटेड होते. किशोरी शहाणे आणि वैशाली म्हाडे डेंजर झोनमध्ये आले आणि वैशाली म्हाडेला या आठवड्यामध्ये घरातून बाहेर जावे लागले असे महेश मांजरेकर सांगितले... वैशालीच्या बाहेर जाण्याने अभिजीत, शिव आणि विणाला खुप दु:ख झाले... वैशाली, अभिजीत आणि शिव यांचे नाते पहिल्यापासूनच खूप खास होते, ते एकमेकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते... त्यामुळे त्यांना वाईट वाटणे अगदीच सहाजिकच होते. वैशालीने अभिजीतला सांगितले मला तुझ्या हातात ट्रॉफी बघायची आहे आणि शिवला सांगितले दादाला म्हणजेच अभिजीतला नाही सोडायचे... आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोण घराचा नवा कॅप्टन बनेल ? सदस्यांना कोणते टास्क मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
महेश मांजरेकर यांनी त्यांच्या घरातील दोन आवडत्या सदस्या डेंजर झोनमध्ये आल्या आहेत असे सांगितले...पण हा गेमच असा आहे कि कोणाला तरी जावे लागतेच...वैशाली बाहेर पडताना महेश मांजरेकरांनी सांगितले तुझा सेन्स ऑफ ह्युमर, स्पष्टवक्तेपणा, गाणी खूप एन्जोय केले... बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर तिला आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर AV दाखविण्यात आली... वैशालीने तिचे मत मांडले, या घरामध्ये मला खूप चांगली माणसे मिळाली, खूप काही या घराने मला दिले, आठवणी दिल्या, मी खूप मस्ती केली, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्याचा माझा निर्णय बरोबर होता असे ती म्हणाली... या घरातून जाताना तिने एक शेवटचे गाणे ऐकवले “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या” आणि सगळ्यांनाच रडवले.
आरोहला महेश मांजरेकर यांनी प्रत्येक सदस्याबद्दल त्याचे मत दोन शब्दांमध्ये विचारले आणि Top ५ मध्ये कोण दिसते हे विचारले त्याने अभिजीत, नेहा, शिवानी, विणा आणि हीना यांची नावे सांगितली... तर महेश मांजरेकर म्हणाले माझ्या Top ५ मध्ये अजूनही शिव आहे... आता बघूया कोण असेल top ५ मध्ये. आजच्या भागामध्ये इमोजी ओळखून त्यावर डान्स करण्याचा खेळण्याचा गेम चांगलाच रंगला... किशोरीताईंनी शिवसोबत काटे नही कटते या गाण्यावर डान्स केला आणि हे गाणे वैशालीने म्हंटले. तर चुगली बूथमध्ये रुपालीला चाहत्याने चुगली केली कि, वैशालीने विणा आणि अभिजीतला सांगितल कि रडण हि रुपालीची स्ट्रॅटेजि आहे... रुपालीने आणि वैशालीमध्ये यावरून बराच वाद झाला. तर किशोरी शहाणे यांना देखील चाहत्याने चुगली केली कि रुपालीने त्यांना बिंडोक म्हंटलं...
बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment