Wednesday, 24 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – शिवानी आणि नेहामध्ये अबोला… “नेहा आणि माझी मैत्री या घराच्या बाहेर” – शिवानी


 
मुंबई २४ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही नाती नक्की कशी आहेतती कधी बदलतील हे सांगता येत नाही. जस रुपाली आणि विणाच नात... त्यांच्या मैत्रीमध्ये काही गैरसमज आणि छोट्या छोट्या कारणामुळे आता दुरावा आला आहे... पण परत जुळू देखील शकेलहि शक्यता नाकारता येत नाही.. शिवानीच्या घरामधून जाण्याने नेहा खूप दुखावली होती पण तिच्या परत येण्याने ती तितकीच आनंदी देखील झाली होती... तिच्यासोबत माधवला देखील आनंद झाला होता... शिवानीच्या परत येण्याने जणू माधव आणि नेहाला त्यांची ताकद परत मिळाली असे वाटत होते. पण आता मात्र त्या मैत्रीमध्ये कुठेतरी दुरावा आला आहे असे दिसू लागले आहे... घरामध्ये राहताना एक दुसऱ्याला समजून घेणे खूप महत्वाचे असते... आणि या घरामध्ये प्रत्येक वळणावर नात्याची कसोटी लागते...
शिवानी आज माधवला सांगताना दिसणार आहेआता मी नेहाशी बोलणार नाही... कारण तिला मस्ती कळत नाही, तिने केलेली मस्ती आपण सहन करायची आणि आपण केलेली मस्ती तिला सहन होत नाही... यावर माधवने देखील दुजोरा दिला. तिने पुढे असे देखील सांगितले, नेहा आणि माझी मैत्री या घराच्या बाहेर ... तिची माझी मैत्री टिकायची असेल तर या घराबाहेर टिकेल पण आता मला तिच्याशी अजिबात बोलायचे नाही. एकही वाक्य मी तिच्याशी यापुढे बोलणार नाहीये. माधवचे म्हणणे आहे, नाही बोलणार असे का करायचेमैत्री नको करूसओव्हर फ्रेंडली नको होऊस... रुपाली करते तस कर...
बघूया आता हा दुरावा कधी मिटेल शिवानी आणि नेहा एकमेकींना समजून घेतील का तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

No comments:

Post a Comment