Wednesday, 24 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ५९ ! घरामध्ये रंगणार “सात बारा” हे साप्ताहिक कार्य का थांबवावे लागले बिग बॉसना साप्ताहिक कार्य ?


 
मुंबई २४ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन कार्य रंगले... ज्यामध्ये पहिल्याच फेरीमध्ये हीना नॉमिनेट झाली... आणि मग, विणा जगताप,नियमांचे उल्लंघन केल्याने किशोरी शहाणे आणि माधव देवचके आणि नेहा शितोळे... वाईल्ड कार्ड एन्ट्री असल्याने आरोह वेलणकर आणि घराची कॅप्टन असल्याने शिवानी सुर्वे या नॉमिनेशन कार्यापासून सुरक्षित होते... कार्या दरम्यान नेहा आणि शिवानीमध्ये बरीच बाचाबाची झाली... आज घरामध्ये “सात बारा” हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे...टीम A आणि टीम B अशा दोन टीम्स मध्ये हे कार्य पार पडेल... अभिजीतविणा, हीना, आरोह आणि किशोरी एका टीममध्ये तर शिवानी, नेहा,रुपाली, शिव आणि माधव दुसऱ्या टीम मध्ये असणार आहेत... आता बघूया या कार्यामध्ये कोण बाजी मारणार आणि कोणती टीम हरणार पण टास्कमध्ये असे काय झाले कि बिग बॉस यांनी घोषणा केली, हे कार्य याच ठिकाणी थांबवण्यात येत आहे”. जे नाणून घेण्यासाठी नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
कार्या दरम्यान प्रत्येक टीम आपापली योजना आखताना दिसणार आहे... ज्यामध्ये माधवचे म्हणणे आहे, “मला आवडेल... पण मुकादमच्या अजून काय काय गोष्टी आहेत त्या मला सांगा नाहीतर अस नको व्हायला मी तिकडे जास्तच काही केले”. अभिजीतचे त्याच्या टीमला म्हणणे आहे, “जे कीटक आहेत आता कसे हि जा आपण आधी पलीकडे जायचे आणि तिथून सुरु करायचे... विणाचे म्हणणे आहे ते काढा आणि फेका मुकादम पकडेल ते”. नेहाचे तिच्या टीमला म्हणणे आहेसगळे मधले बांबू आधी हातामध्ये घ्या, त्यांना बांबू मिळू देऊ नका”.
टास्क सुरु झाल्यावर किशोरीताईना खारूताई असे सदस्य म्हणू लागले... तरहीना आणि शिवमध्ये पुन्हाएकदा वाद विवाद सुरु झाला... हीना शिवच्या अंगावर येत होती... आणि हीनचे म्हणणे होते बळाचा वापर करू नकोस... त्यावर शिव म्हणाला “तू अंगावर येते आहेस माझ्यामला डोक्याने हलका समजतेस का शिवानीचे म्हणणे होते ती मुद्दाम येते आहे. अभिजीत माधवला ढकलतो आहेत्यावर अभिजीतचे म्हणणे होते ढकलणारच ना... शिवानीचे यावर म्हणणे होते दादा काय बोलला ऐकलस का शिव ढकल तू पण... त्यावर अभिजीत म्हणाला ती मुद्दाम बोलते आहे शिव... शिवचे यावर सगळ्यांनाच म्हणणे होते “मला गेम समजतो सगळे शांत बसा”.  बघूया आता कार्यामध्ये पुढे काय काय होईल ?

No comments:

Post a Comment