मुंबई २२ जुलै, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य बराच काळ एकत्र असल्याने त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते तयार होते... जे बऱ्याचदा घराबाहेर पडल्यावर देखील तसेच रहाते... असेच नाते विणा आणि शिवमध्ये देखील तयार झाले आहे. त्यांच्यातील मैत्री घरातील सदस्य आणि प्रेक्षकांपासून काही लपलेली नाही... शिव विणासाठी कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतो... मर्डर मिस्ट्री हा टास्क करण्यास नकार दिला कारण, त्यामध्ये विणाचा टॉप नष्ट करायचा होता... पण त्यावरूनWEEKEND चा डावमध्ये महेश मांजरेकरांनी त्याला खडे बोल सुनावले... तर अभिजीत केळकरने देखील त्याला समजवण्याचा प्रयत्न केला...कधी कधी विणाला मदत करण्याच्या प्रयत्नात विणाचेच नुकसान होईल असे देखील सांगितले... कारण असे झाल्यास ती शिववर अवलंबून आहे असे दिसते... तर शिवचे खेळण्यावर लक्ष कमी झाले आहे असे प्रेक्षकांना देखील दिसत आहे असे म्हणणे पडले. शिवने महेश मांजरेकरांना शब्द दिला कि, या आठवड्यापासून त्याच्यामध्ये बदल नक्कीच दिसेल... आता बघूया शिव आणि विणा त्यांच्यामध्ये काय बदल करतील ?
याच विषयावरून शिव आणि विणामध्ये आज चर्चा रंगणार आहे. शिवचे म्हणणे आहे, महेश मांजरेकरांना असे वाटते आहे कि, आपण एकमेकांच्या मध्ये येतो आहे आणि आपण त्या गोष्टीवर आता लक्ष देऊ. पण त्याचा अर्थ असा नाही कि आपण बोलायचं नाही... एक तर आपण जसे बोलतो आहे तसेच बोलू फक्त लक्ष देऊ कुठे काय करायचे आहे. पण जस होत तसच ठेऊ आणि तस नाहीतर पूर्ण बंद याच्यासाठी जर मी तुझ्याकडे आलो आणि खोट हसलो तर ते नाटकी बोलण होईल, ते मी नाही करू शकत. तुझ्याशी नाही बोलो तर मी कमजोर पडेन असे मला वाटते... सरांनी जे सांगितलं ते आपण सकारात्मक पद्धतीने घेऊया, चुका बरोबर करु, टास्क मध्ये लक्ष देऊ, आणि आपण टास्कच्या वेळेस एकमेकांच्या मध्ये नाही येणार याची काळजी घेऊ.
आता शिवच्या या म्हणण्यावर विणाचे काय म्हणणे आहे कळेलच ? तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ च्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment