मुंबई २४ जुलै, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या एकला चलो रे या नॉमिनेशन टास्कमध्ये पहिली नॉमिनेट झालेली सदस्य हीना पांचाळ होती आणि त्याचबाबतीत काल अभिजीत केळकर हीना सल्ला देताना दिसला... कालच्या टास्क मध्ये हीनाची चूक झाली... जर ती नीट खेळली असती तर नॉमिनेट नसती झाली असे अभिजीतचे म्हणणे होते... या सगळ्यावर अभिजीत काल हीनाशी बोलताना दिसला... अभिजीतचे म्हणणे होते, तू फोकस करायला हवा जर तू ते केलसं ना, तू चांगली खेळाडू आहेस विश्वास ठेव माझ्यावर... नॉमिनेशन टास्कमध्ये तू सगळ्यांशी तू एकाच वेळेला पंगा घेतला त्यामुळे प्रोब्लेम झाला सगळेच तुझ्या विरोधात झाले... तुझं जे खेळण होत ना ते सगळ्यात वेगळ होत कोणा सारखच नव्हत, तू मजा आणलीस खेळात. पण प्रत्येक फेरीचं तू टार्गेट ठरवलं असतस ना तर चांगल झाल असत, तू राहली असतीस. विणाने पण तुझ पाणी फेकलं ते पण भीतीने कि तू तीच पाडशील... तिथे चुकलीस तू हीना... आता बघूया अभिजीतच्या सांगण्यानंतर तरी हीना फोकस रहाते का ?
काल विणाची हीनावर चिडचिड झाली,आणि याबद्दल तिने शिवला देखील सांगितले. विणाचे म्हणणे पडले ती क्रेडीट घ्यायला बघते. तिचे म्हणणे होते प्रत्येक गोष्टीचे क्रेडीट आणि ब्लेम्स घ्यायची तिला काहीच गरज नव्हती... शिव, हीना, अभिजीत आणि विणा मध्ये देखील चर्चा रंगली असताना विणाने हीनाला सांगितले तू आलीस तेंव्हा खूप strong होतीस पण त्यानंतर आतापर्यंत तू त्यातून बाहेर पडत नाहीयेस... आता बाहेर पड... आता मी चुकू नाही शकत... मी आता स्वत:वर लक्ष देणार आहे असे तिने अभिजीतला संगितले...
No comments:
Post a Comment