Showing posts with label “कागर”. Show all posts
Showing posts with label “कागर”. Show all posts

Thursday, 22 August 2019

वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर “कागर” कलर्स मराठीवर ! राजकारण आणि प्रेम यात गुरफटलेली त्या दोघांची कहाणी...

A group of people standing in front of a sign

Description automatically generated
कलर्स मराठीवर २५ ऑगस्ट संध्या. ७.०० वा.
मुंबई २२ ऑगस्ट, २०१९ : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण राजकारणाच वास्तवादी चित्र घेऊन वायाकॉम१८ स्टुडीओजने मागील वर्षी “कागर” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला... प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला... वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत आणि वायाकॉम१८ स्टुडीओज - उदाहरणार्थ निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आपल्या आवडत्या वाहिनीवर म्हणजेच कलर्स मराठीवर २५ ऑगस्ट संध्या. ७.०० वा. पहिल्याच चित्रपटातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली प्रसिध्द अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल तीन वर्षानंतर या चित्रपटाद्वारे रसिकांच्या भेटीला आली. तळपत्या उन्हात झळाळून निघणारतिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणारजुना जाणार तेंव्हाच नवा येणार” या आरोळ्या प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहेत. चित्रपटामध्ये शशांक शेंडे, सुहास पळशीकर, भारती पाटील, विठ्ठल काळे, या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेला शुभंकर तावडे यांचा दमदार अभिनय बघायला मिळणार आहे. ग्रामीण राजकारणमहिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसली... तेंव्हा नक्की बघा राजकारण आणि प्रेम यात गुरफटलेली राणी आणि युवराजची कहाणी “कागर” कलर्स मराठीवर. 

वेगवेगळ्या कसोट्यांवर नात्यांना सांभाळून घेत ते प्रेम आणि विश्वासाला वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोगात आणतं ते राजकारण. हळूवार प्रेम आणि राजकारणाचा पट मांडणारा “कागर” हा सिनेमा प्रेक्षकांच्या नक्कीच पंसतीस पडेल... 

Thursday, 18 April 2019

कलर्स मराठीवरील एकदम कडक कार्यक्रमामध्ये रंगणार “कागर” विशेष भाग !


 
मुंबई १८ एप्रिल२०१९ : कलर्स मराठीवरील एकदम कडक या कार्यक्रमाचा येत्या आठवड्यातील भाग विशेष असणार आहे. कारण कार्यक्रमाच्या मंचावर गप्पा रंगणार आहेत प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकरांसोबत. अवघ्या महाराष्ट्राच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक म्हणजेच नागराज मंजुळे आणि मकरंद माने तसेच संपूर्ण महाराष्ट्राची मने ज्या दोन कलाकरांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटामध्ये जिंकली असे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे एकदम कडकच्या मंचावर येणार आहेत. तसेच वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत आणि मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा नवा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यानिमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम देखील (म्हणजेच चित्रपटाचे निर्माते सुधीर कोलतेविकास हांडेशशांक शेंडेरिंकू राजगुरूचित्रपटाचा नायक शुभंकर तावडे) या कार्यक्रमामध्ये आली होती. या दरम्यान या सगळ्यांनीच बऱ्याच गंमतीजमतीकिस्सेआठवणी सांगितल्या. कागर विशेष भागाचे सूत्रसंचालन आदर्श शिंदे यांनी केले आहे. तर एकदम कडक या कार्यक्रमाच्या विशेष भागाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशी यांनी केले आहे. या भागामध्ये नागराज मंजुळेरिंकू राजगुरूआकाश ठोसरसोमनाथ अवघडे आणि अरबाज शेख यांनी बरीच धम्माल मस्ती केली आहे आणि कागर चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. तेंव्हा नक्की बघा “एकदम कडक” कार्यक्रमाचे येत्या आठवड्याचे भाग सोम ते बुध रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर. 
कार्यक्रमामध्ये नागराज मंजुळे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली तसेच वाचनाची आवड कशी लागली याबद्दल देखील सांगितले. आकाश ठोसर याला त्याची आवडती सहकलाकार कोण विचारण्यात आले - राधिका आपटे कि रिंकू राजगुरू... यावर त्याने रिंकूचे नाव घेतले. आवडता दिग्दर्शक अनुराग कश्यप कि नागराज मंजुळे यावर त्याने नागराज मंजुळे असे उत्तर दिले. रिंकूला आवडता अभिनेता कोण असे विचारण्यात आले स्वप्नील जोशी कि अंकुश चौधरी तिने अंकुश चौधरी सांगितले तर आयुष्यात कोणासोबत एक दिवस डेट वर जायला आवडेल रीतेश देशमुख कि विकी कौशल रिंकूने लगेच उत्तर दिले विकी कौशल. याचबरोबर नागराज मंजुळे यांना देखील काही प्रश्न विचारण्यात आले त्यांचा आवडता दिग्दर्शक कोण महेश मांजरेकर कि सचिन पिळगावकरआवडता अभिनेता कोण आकाश ठोसर कि सोमनाथ अवघडे याची उत्तरं त्यांनी काय दिली हे जाणून घेण्यसाठी तुम्ही हा विशेष भाग नक्की बघा. तसेच चक्रव्यूह राउंड मध्ये त्यांना अजय – अतुलरामदास आठवलेआकाश ठोसर, जितेंद्र जोशीरिंकू राजगुरू यांच्याबद्दल आवडणारी आणि खटकणारी गोष्ट विचारली याची त्यांनी काय उत्तर दिली हे जरूर बघा.
एकदम कडक कार्यक्रमामध्ये रिंकू आणि शुभंकर यांनी कागर या चित्रपटातील लागलीया गोडी तुझी या गाण्यावर  सुंदर डान्स सादर केला आहे. कागर या चित्रपटातील संपूर्ण टीमने त्यांचा चित्रिकरणा दरम्यानचा अनुभव, किस्सेत्यांच्या भुमिकेबद्दल आणि कथेबद्दल सांगितले. रिंकूने सांगितले कागर सारखा सिनेमा येण्याची मी वाट बघत होते कारण यातली माझी भूमिका वेगळी आहे आणि चित्रपटाचा विषय देखील वेगळा आहे. याच बरोबर कागर चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी कागर चित्रपटाच्या कथेबद्दल सांगितले.
तेंव्हा नक्की बघा “एकदम कडक” कार्यक्रमाचे येत्या आठवड्याचे भाग सोम ते बुध रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर. 

Monday, 15 April 2019

वायाकॉम18 स्टुडीओज प्रस्तुत “कागर” चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित ! रिंकू राजगुरु कागर चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतणार ...


मुंबई, १ एप्रिल२०१९ : सर्वत्र निवडणुकांचे वारे जोरात वाहात आहेत... जुनं बुलंद नेतृत्व थोडं बाजूला राहून नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी धुरंधर राजकारणी या निवडणुकीत कंबर कसताना दिसतायत. निवडणुकीच्या याच पार्श्वभूमीवर ग्रामीण राजकारणाच वास्तवादी चित्र घेऊन वायाकॉम१८ स्टुडीओज आपल्या भेटीला घेऊन येत आहे नवा चित्रपट. वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत आणि वायाकॉम१८ स्टुडीओज - उदाहरणार्थ निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा चित्रपट येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. पहिल्याच चित्रपटातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली प्रसिध्द अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल तीन वर्षानंतर रसिकांच्या भेटीला येतेय. ‘तळपत्या उन्हात झळाळून निघणारतिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणारजुना जाणार तेव्हाच नवा येणार’ किंवा जुना जाणार तेंव्हाच नवा येणार” अशा आरोळ्या देत रिंकू राजगुरू “कागर” च्या या प्रचारच्या रनधुमाकीत नव्या जोशात उतरलीय. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
ग्रामीण राजकारणमहिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. तर शुभंकर तावडे हा नवोदित अभिनेता या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे. परिस्थितीच्या वेगवेगळ्या कसोट्यांवर नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवतं ते प्रेम आणि नात्यातल्या विश्वासाला वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोगात आणतं ते राजकारण. एककीडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणारा हा “कागर” २६ एप्रिलपासून रुपेरी पडद्यावर दाखल होतोय.