Thursday, 22 August 2019

वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर “कागर” कलर्स मराठीवर ! राजकारण आणि प्रेम यात गुरफटलेली त्या दोघांची कहाणी...

A group of people standing in front of a sign

Description automatically generated
कलर्स मराठीवर २५ ऑगस्ट संध्या. ७.०० वा.
मुंबई २२ ऑगस्ट, २०१९ : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण राजकारणाच वास्तवादी चित्र घेऊन वायाकॉम१८ स्टुडीओजने मागील वर्षी “कागर” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला... प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला... वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत आणि वायाकॉम१८ स्टुडीओज - उदाहरणार्थ निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आपल्या आवडत्या वाहिनीवर म्हणजेच कलर्स मराठीवर २५ ऑगस्ट संध्या. ७.०० वा. पहिल्याच चित्रपटातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली प्रसिध्द अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल तीन वर्षानंतर या चित्रपटाद्वारे रसिकांच्या भेटीला आली. तळपत्या उन्हात झळाळून निघणारतिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणारजुना जाणार तेंव्हाच नवा येणार” या आरोळ्या प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहेत. चित्रपटामध्ये शशांक शेंडे, सुहास पळशीकर, भारती पाटील, विठ्ठल काळे, या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेला शुभंकर तावडे यांचा दमदार अभिनय बघायला मिळणार आहे. ग्रामीण राजकारणमहिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसली... तेंव्हा नक्की बघा राजकारण आणि प्रेम यात गुरफटलेली राणी आणि युवराजची कहाणी “कागर” कलर्स मराठीवर. 

वेगवेगळ्या कसोट्यांवर नात्यांना सांभाळून घेत ते प्रेम आणि विश्वासाला वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोगात आणतं ते राजकारण. हळूवार प्रेम आणि राजकारणाचा पट मांडणारा “कागर” हा सिनेमा प्रेक्षकांच्या नक्कीच पंसतीस पडेल... 

No comments:

Post a Comment