Showing posts with label Chala Hawa Yeu Dya. Show all posts
Showing posts with label Chala Hawa Yeu Dya. Show all posts

Monday, 1 June 2020

Zee Marathi - Chala Hawa Yeu Dya fame Sagar Karande is taking guitar


सागर घेतोय ऑनलाईन गिटार शिकायचे धडे

लॉकडाऊनमुळे मालिकांचं चित्रीकरण बंद असून सर्व कलाकार देखील घरी त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेतचित्रीकरणाच्या त्यांच्या बिझी शेड्युल मधून त्यांना मिळालेली हि मोठी सुट्टीच आहेत्यात अनेक कलाकार त्यांची आवड-निवड जपत आहेतचला हवा येऊ द्या या प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमातील त्यांचा लाडका विनोदवीर सागर कारंडे सध्या त्याच्या कुटुंबाला मनसोक्त वेळ देतोयचला हवा येऊ द्या च्या चित्रीकरणामुळे एरवी घरी इतका वेळ देता येत नसल्यामुळे आता सागर मुलीसोबत खेळण्याततिच्यासोबत मस्ती करण्यात व्यस्त आहे.
या मिळालेल्या मोकळ्या वेळात सागर अजून काय करतोय हे विचारल्यावर तो म्हणाला, "मी नवनवीन गोष्टी शिकतोयपहिलं म्हणजे स्वयंपाकसुरुवातीला मला फक्त ऑमलेट बनवता येत होतं पण आता मी बऱ्यापैकी स्वयंपाक करू शकतोहळद-मिठाचं प्रमाण देखील आता मला कळू लागलं आहेआधी माझे खूप सारे प्रयोग फसले पण आता हळू-हळू मला अंदाज येऊ लागला आहेशिवाय मी गिटारचे ऑनलाईन धडे गिरवतोयआधीपासून मी गिटार शिकत होतो पण नंतर वेळ  मिळाल्यामुळे गॅप पडला होतागिटार देखील बरेच दिवस धूळ खात पडली होतीसध्या माझा एक मित्र मला ऑनलाईन गिटार शिकवतोयतसेच दुसरीकडे माझं लिखाण देखील चालू आहेयाशिवाय काही सिनेमे जे वेळेअभावी बघायला नाही मिळाले त्या चित्रपटांचा मी आस्वाद घेतोय."   

Wednesday, 27 May 2020

Zee Marathi - Chala Hawa Yeu Dya

विनोद जमणं सोपं नाही - सागर कारंडे

झी मराठी वरील 'चला हवा येऊ द्याया कार्यक्रमाची हवा नव्हे तर वादळ गेली  वर्ष महाराष्ट्राचं नव्हे तर भारत आणि संपूर्ण जगभरात पसरलं आहेया कार्यक्रमातील विनोदवीर हे प्रेक्षकांचे आवडते तर आहेच पण त्या सगळ्यांनी लोकांच्या मनात एक स्थळ स्थान निर्माण केलं आहेत्यातील एक विनोदवीर म्हणजे सागर कारंडेत्याने साकारलेली पुणेरी बाई किंवा पोस्टमन काका हे कोणी विसरूच शकत नाहीहसता हसता चटकन डोळ्यात पाणी आणणाऱ्या या विनोदवीरासोबत साधलेला हा खास संवाद.
आपल्याला विनोद जमू शकतो किंवा आपण एक विनोदी कलाकार व्हावं असं केव्हा वाटलं?
विनोद जमणं सोपं नाहीआपल्याला विनोद जमायला लागला आहे असं समजणं कलाकार म्हणून चुकीचं आहेकारण आपलं शोधकार्य तिथेच संपतंमी बालमोहन शाळेचा विद्यार्थी असताना सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचोमग गणेशोत्सव नवरात्र यातल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन अभिनय करू लागलोतो प्रवास आजही सुरूच आहेप्रेक्षकांच्या कौतुकाने माझी वाट सुकर केली.
अभिनयाची आणि विनोदवीर म्हणून सुरुवात कधी झाली?
मी २००२ साली पूर्णपणे अभिनय क्षेत्रात उडी घ्यायचं ठरवलंसुरुवातीला मिळालेली नाटकं विनोदी होतीमग 'फु बाई फु'मुळे घराघरात पोहोचण्याची संधी मिळालीआता 'चला हवा येऊ द्या'मुळे रोज काहीना काही प्रयोग करण्याची संधी मिळते.
विनोदी कलाकार म्हणून प्रेक्षकांना हसवण्याचा मोठी जबाबदारी कलाकारावर असतेत्याबाबदल काय सांगशील?
आताच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळ्याच वेळी हसत राहणं शक्य आहे असं नाहीम्हणून माझं म्हणणं आहे किसगळ्यांनी कायम प्रसन्न राहाहसू आपोआप चेहऱ्यावर येईलआम्ही तुम्हाला हसवायला सज्ज आहोतच फक्त तुम्ही कायम सकारात्मक आणि प्रसन्न राहा.
विनोदी कलाकार म्हणून कोणती आव्हानं जाणवतात?
आव्हानं स्वीकारण्याची माझी वृत्ती आहेआपण नवं करण्याचा धोकाच पत्करला नाहीतर आपल्याला ते जमतंय कि नाही ते कसं कळणारनटांवर एका प्रकारची कामं केल्यावर शिक्का हा बसतोचकारण लोकांनी त्या नटाला इतर प्रकारची कामं करताना पाहिलेलं नसतंआपल्याला येतं तेच करत राहण्यात मजा नाहीनवे प्रयोग करून पाहिले पाहिजेत.  

Sunday, 3 May 2020

Zee Marathi - Chala Hawa Yeu Dya

कुशल बद्रिकेचा गॉन केस लुक
लॉकडाऊनमध्ये मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ मधील लोकप्रिय विनोदवीर कुशल बद्रिके सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे.त्याने त्याच्या कुटुंबाबरोबर सादर केलेले ‘गो करोनिया’ हे गाणे व्हायरल झालंया गाण्याबरोबरच आणखी एक भारुडही कुशलनेपत्नी आणि मुलांबरोबर सादर केलंआता कुशलने लॉकडाऊनमध्ये हेअर कट केलाय आणि त्याच्या चाहत्यांसाठी त्याचा फोटो देखील शेअर केला आहे.

कुशलने चक्क टक्कल केलं असून सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोला हे कॅप्शन दिलय, "माझ्या घरचे नेहमी म्हणायचेमी म्हणजे गेलेली केस आहे !! (एकदाच माझ डोकं सटकलं आता डोक्यावरून काहीही सटकतं.) लॉकडाऊन हेअरकट." लॉकडाऊनमध्ये बरेच जण हि सेम स्टाईल करत आहेत आणि कुशलने देखील हा ट्रेंड फॉलो केलात्याचा हा गॉन केस लुक चाहत्यांना मात्र प्रचंड आवडलेला आहे.

Monday, 13 April 2020

Zee Marathi - Chala Hawa Yeu Dya


कुशलने मानले पोलिसांचे आभार

लोकडाऊन सुरु झाल्यापासून सर्व कलाकार देखील घरी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ मधील लोकप्रिय विनोदवीर कुशल बद्रिके सोशल मीडियावर बराच सक्रिय आहेत्याने त्याच्या कुटुंबाबरोबर सादर केलेले ‘गो करोनिया’ हे गाणे सध्या व्हायरल झालंया गाण्याबरोबरच आणखी एक भारुडही कुशलनेपत्नी आणि मुलांबरोबर सादर केलंघरातल्या घरात आपल्या आवडत्या कलाकाराने सादर के लेले हे प्रयोग लोकांच्या भलतेच पसंतीस उतरले आहेतलोकांच्या मनोरंजनासोबतच सध्याच्या परिस्थितीत लोकांनी काय काळजी घ्यायला हवीसरकार-प्रशासनातर्फे  सुरू असलेले प्रयत्न आणि त्याला नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी कशाप्रकारे साथ दिली पाहिजेयावर प्रबोधन करण्याचा कुशलचा उद्देश प्रामुख्याने दिसून येतोनुकतंच कुशलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाज्यामध्ये त्याने पोलिसांचा गणवेश परिधान केला असून त्याच्या हातामध्ये एका कार्डबोर्डवर थँक यु लिहिलेलं आहेकुशल सोशल मिडीयाच्या माध्यमाने पोलिसांचे मनापासून आभार मानतोयकठीण परिस्थितीत स्वतःचा विचार  करता पोलीस बांधव अहोरात्र काम करून आपली सेवा करतात आहेतत्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी कुशलने हा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी भरगोस प्रतिसाद दिला आहेचला हवा येऊ द्या चे विनोदवीर जितके विनोदी आहेत तितकेच संवेदनशीलदेखील आहेत हे यावरून स्पष्ट होतं.