Wednesday 13 November 2019

नो किडिंग!- नवीन ''वूट किड्स''सोबत बालदिन ख-या अर्थाने साजरा होत आहे



~ पाहा, वाचा, ऐका आणि शिका सर्व एकाच ठिकाणी ~
~  सर्वाधिक लोकप्रिय २०००० पेक्षा अधिक कार्टून्स, ऑडिओ स्टोरीज, सर्वोत्तम इ बुक्स आणि मजेशीर प्रश्नमंजुषांसह वूट किड्स इंडिया हे भारताचे सर्वाधिक मजेचे आणि शिकण्याचे अॅप होणार आहे ~

मुंबई, १२ नोव्हेंबर २०१९: भारताला आपले पहिले मल्टी फॉर्मेट, कुठेही उपलब्ध असलेले आणि सर्वांत मोठ्या व वैविध्यपूर्ण साहित्य लायब्ररींपैकी एक मजेचे आणि अध्ययन अॅप वूट किड्स मिळणार आहे. त्याला अर्ली चाइल्डहूड असोसिएशनचे (ईसीए) प्रमाणपत्र मिळाले असून या अॅपची निर्मिती डिजिटल युगात वावरणाऱ्या आजच्या मुलांसाठी केली गेली आहे. वैविध्यपूर्ण मुलांच्या साहित्याच्या २०००० पेक्षा अधिक विषयांचे केंद्र असलेले वूट किड्स हे मुलांचे लोकप्रिय आणि प्रीमियम टून्स, इ-बुक्स, ऑडिओ स्टोरीज, नर्सरी ऱ्हाइम्स आणि मौजमजेच्या प्रश्नमंजुषांचे जग एकत्र आणून त्यांच्यासाठी स्क्रीन टाइम अर्थपूर्ण बनवण्यासाठी सज्ज झाले आहे. यामुळे २ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी एक वन स्टॉप स्थान ठरणार आहे, जे सुरक्षित, उत्तम आणि जाहिरातींपासून मुक्त असेल.
वूट किड्स आपल्या ४ विविध वर्गवारींमध्ये मस्ती आणि अच्छाईचे वचन पूर्ण करण्यासाठी तयार आहे.
·        जगभरातील विविध प्रकारांमधील कार्टून व्यक्तिरेखांचे उत्तम कलेक्शन पाहा. लोकप्रिय भारतीय संकल्पनांपासून ते जपानी अॅनिमेशन आणि पाश्चिमात्य क्लासिकपासून ते सध्याच्या जागतिक आवडीच्या व्यक्तिरेखा अगदी शाळापूर्व वयोगटापासून ते मोठ्या मुलांनाही आवडतील, अशा वूट किड्सवर पाहता येतील. मोटू पतलू, शिवा, लिटिल कृष्णा, छोटा भीम आणि रोल नं. २१ ते ऑडबॉड्स, डोरा दि एक्स्प्लोरर, पॉव पेट्रोल, थॉमस अँड फ्रेंड्स, पेप्पा पिग, माशा आणि दि बिअर. बेन १०, लेगो निंजागो, निंजा हत्तोरी, पोकेमॉन ते जुने आवडते क्लासिक्स जसे जॉनी ब्रावो, स्पाँजबॉब स्क्वेअरपँट्स, डेक्स्टर्स लॅब ही एक खूप मोठी यादी आहे आणि ती प्रत्येक मुलाला आवडेल. ही लायब्ररी काही निवडक मजेच्या आणि शिकण्याच्या लाइव्ह अॅक्शन शोजनी सजलेली आहे. त्यात कला-कृती, विज्ञान आणि अध्ययनाच्या विविध घटकांचा समावेश आहे. हा खऱ्या अर्थाने १३००० पेक्षा अधिक व्हिडिओंचा सर्वांगीण आणि व्यापक प्लॅटफॉर्म आहे, जो विविध प्रकारच्या लोकप्रिय कार्टून्स तसेच प्रतिष्ठेच्या जागतिक साहित्य भागीदारांना समाविष्ट करतो.
·        प्लेटाइम टू बेडटाइमच्या विविध प्रकारच्या लोकप्रिय गोष्टी वाचा कारण आम्हाला याची खात्री आहे की, वाचन हा अध्ययनाला चालना देणाऱ्या घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे. ही सर्व इ-पुस्तके आंतरराष्‍ट्रीयसाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस आणि जिम हेन्सन फॉर ते भारतीय कथांसाठी कराडी टेल्सपर्यंत अशा मोठ्या प्रकाशन संस्थांकडून आलेली आहेत आणि ती आपल्याला पुन्हा-पुन्हा वाचायला आवडतात.
·        विविध प्रकारच्या ऑडिओ कथांच्या लायब्ररीचा आपल्याला येथे आनंद घेता येतील. यात विनोद, मूल्य, शौर्य आणि मानवी उद्दिष्टे अशा बिरबल आणि तेनाली रामनच्या कथांपासून ते शूर भारतीयांच्या महागाथा आणि प्राण्यांच्या आवडत्या कथा आहेत. प्रत्येक गोष्ट मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याच्या दृष्टीने सांगण्यात आली आहे. त्यातील अनेक सेलिब्रिटी कथाकार आहेत, जसे विद्या बालन इराणी, नसरूद्दीन शाह इत्यादी आणि त्यांना शिवासारख्या मुलांच्या लाडक्या कार्टून व्यक्तिरेखांनीही आवाज दिला आहे. आपल्याकडे सर्वाधिक लोकप्रिय नर्सरी ऱ्हाइम्सही आहेत आणि त्याचबरोबर अनेराच्या प्रिन्सेस स्टोरीज आणि रॉब्स जातका कथा या डिजिटल जगातील अत्यंत आवडत्या कथांचाही समावेश आहे.
·        अध्ययन आनंददायी बनवणाऱ्या ५००० पेक्षा अधिक प्रश्नमंजुषांसोबत एक खास प्रश्नमंजुषा खेळ खेळा आणि त्यासोबत शिका. एक बहुपातळी, बहुनिवड खेळ हा मुलांसाठी मजेचा आहे- आणि त्यांच्यासाठी चांगलाही आहे. अध्ययन आणि विकास तज्ञांसोबत शिकताना या प्रश्नमंजुषा पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे जातात आणि मुलांची कौशल्ये ५ निश्चित विभागांमध्ये विकसित करण्यास मदत करतात. त्यात न्यूमरसी, इंग्लिश साहित्य, तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक विचारसरणी, सामाजिक आणि भावनिक विकास आणि कलात्मक विकास यांचा समावेश आहे. हा संपूर्ण प्रवास बॅचेस, ट्रॉफीज, स्टिकर्स या वैशिष्टयांनी गेमच्या स्वरूपात बनवण्यात आला आहे आणि त्यामुळे तो स्वारस्यपूर्ण तसेच आनंददायी झाला आहे. यात मुले आणि पालक या दोघांसाठीही एकही क्षण कंटाळवाणा नाही.
लहान मुलांना सामावून घेण्‍यासोबत त्‍यांना संपन्‍न व मनोरंजन करणारी व्‍यापक कन्‍टेन्‍ट लायब्ररी वूट किड्स सेफ डिजिटल प्‍लेग्राऊण्‍डच्‍या माध्‍यमातून पालक आपल्‍या मुलांसाठी मनोरंजन पाहण्‍याचा कालावधी निश्‍चित करु शकतात. या प्रभावी वैशिष्‍ट्यासह ते त्‍यावर देखरेख ठेवू शकतात. प्रमुख मजकूर, शब्‍दकोश, आवाज कथन, मुलाच्‍या अॅप वापरावर देखरेख अशी प्रगतीशील वैशिष्‍ट्ये आणि संबंधित विकास क्षेत्रांमधील प्रगतीमुळे वूट किड्स ही भारतीयांमधील यशस्‍वी सेवा ठरते. ही सेवा सध्‍या फ्री व्‍युईंग ट्रायल पॅकेजेससाठी उपलब्‍ध आहे. त्‍यानंतर ही सेवा प्रतिवर्ष ७९९ रूपये आणि प्रति महिना ९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल.
व्‍हायकॉम१८ मीडिया प्रायव्‍हेट लिमिटेडचे ग्रुप मुख्‍य कार्यकारी अधिकारी व व्‍यवस्‍थापकीय संचालक सुधांषू वत्‍स, व्‍हायकॉम१८ डिजिटल व्‍हेन्‍चर्सचे सीओओ गौरव रक्षित आणि वूट किड्सचे व्‍यवसाय प्रमुख सौगतो भौमिक हे सादरीकरणाप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी बॉलिवुड अभिनेत्री सोहा अली खान, अत्‍यंत पुरोगामी शिक्षणतज्ञ, लेखिका व अर्ली चाइल्‍डहूड असोसिएशनच्‍या (ईसीए) अध्‍यक्षा स्‍वाती पोपट आणि भारतीय टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आशिष चौधरी हे देखील उपस्थित होते. या सर्वांनी आधुनिक अध्‍ययन, पुरोगामी पालकत्‍व आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर सखोल चर्चा करत सकारात्‍मक परिणाम निर्माण केले.
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रख्‍यात बॉलिवुड अभिनेत्री सोहा अली खान म्‍हणाल्‍या, ''वाढत्‍या डिजिटायझेशनसह लहान मुले देखील स्क्रिनेजर्स बनत आहेत आणि सर्व सुविधा सहजपणे उपलब्‍ध होत आहेत. एक माता म्‍हणून मला माझ्या मुलीचे मनोरंजन करण्‍यासाठी कविता व कथांमध्‍ये सतत बदल करण्‍याचा त्रास होतो. जमेची बाजू म्‍हणजे अध्‍ययन व मौजमजा देणारे उत्‍पादन. यामधून सुरक्षित व्‍युईंगचा अनुभव मिळतो, जे आजच्‍या काळात गरजेचे आहे. वूट किड्स सारख्‍या अॅपसह माझा कन्‍टेन्‍टच्‍या दर्जावर विश्‍वास राहू शकतो. हे कन्‍टेन्‍ट मनोरंजनपूर्ण व सर्वांगीण आहेत. मला या अनोख्‍या डिजिटल अॅपचा भाग असण्‍याचा आणि त्‍यामधील प्रचंड कन्‍टेन्‍ट लायब्ररीमध्‍ये योगदान देण्‍याचा आनंद होत आहे.''
''आज तंत्रज्ञान अध्‍ययनाची पद्धत बदलत आहे. अध्‍ययनाला आनंदमय करणा-या व्‍यापक व लोकप्रिय उत्‍पादनाची गरज आहे. ज्‍यामधून दर्जात्‍मक व्‍युईंगची खात्री देखील मिळेल. वूट किड्स या महत्‍त्‍वपूर्ण गरजेसाठी योग्‍य आहे. यामधून मुलांना पारंपारिक व आधुनिक अध्‍ययन मिळण्‍यासोबत कन्‍टेन्‍टवर देखरेख असण्‍याची खात्री मिळते. हे अॅप वाढत्‍या मुलांसाठी लाभदायी ठरेल. हे अॅप मनोरंजन करण्‍यासोबतच अध्‍ययन देखील करते,'' असे अर्ली चाइल्‍डहूड असोसिएशनच्‍या अध्‍यक्षा डॉ. स्‍वाती पोपट म्‍हणाल्‍या.
भारतीय टेलिव्हिजन अभिनेता व तीन मुलांचे वडिल आशिष चौधरी म्‍हणाले, ''तीन मुलांचा वडिल असणे सोपे नाही. त्‍यांचे मनोरंजन होण्‍यासोबत काही गोष्‍टींचे ज्ञान मिळणे अत्‍यंत अवघड होऊन जाते. यासारखे अॅप आम्‍हा पालकांना आमच्‍या मुलांसाठी मौजमजेचा क्षण वाया न घालवता कन्‍टेन्‍टचा प्रकार, मनोरंजन पाहण्‍याचा कालावधी व व्‍युईंग सवयींवर देखरेख ठेवता येते. म्‍हणूनच वूट किड्स हे विभागातील अग्रणी अॅप ठरते. मला विभागांमधील सर्वसमावेशक व जुडता येण्‍याजोगा कन्‍टेन्‍ट देणा-या या क्रांतिकारी व्‍यासपीठासोबत सहयोगी असण्‍याचा अत्‍यंत आनंद होत आहे.''
आनंदित होत वूट किड्सचे व्‍यवसाय प्रमुख सौगतो भौमिक म्‍हणाले, ''वूट किड्स हे डिजिटल मौजमजेने परिपूर्ण अध्‍ययनाच्‍या क्षेत्रामधील अग्रणी उत्‍पादन आहे. हे उत्‍पादन अर्थपूर्ण स्क्रिन-टाइम व्‍यतित करू पाहणा-या सूक्ष्‍मदर्शी भारतीय पालकांच्‍या गरजांची पूर्तता करते आणि मुलाच्‍या मानसिक, भावनिक व सामाजिक अशा सर्वांगीण विकासामध्‍ये मदत करते. अॅपमध्‍ये टून व्हिडिओज, ई-बुक्‍स, ऑडिओ कथा व मजेशीर कोडी अशा क्षेत्रातील सर्वात मोठ्या व वैविध्‍यपूर्ण ऑफरिंग्‍ज आहेत. यामधून मुलांना पालकांच्‍या देखरेखीअंतर्गत सुरक्षित व मनोरंजनपूर्ण कन्‍टेन्‍टचा आनंद मिळतो.'' ते पुढे म्‍हणाले, ''चांगल्‍या कृत्‍यांसह मस्‍तीला योग्‍य वळण देण्‍यावर विश्‍वास आहे आणि हीच गोष्‍ट विरूद्ध बाजूस देखील लागू आहे. वूट किड्समधील आमचे हे मार्गदर्शन तत्‍त्‍व आहे.''
तर मग जगभरातील तुमच्‍या आवडीचे टून्‍स, युवा विचारांच्‍या जिज्ञासेला चालना देणारे ई-बुक्‍स, कल्‍पनेला जागृत करणा-या ऑडिओ कथा आणि रोचक क्विझ गेम्‍ससह अद्वितीय राइडसाठी तयार राहा. यामधून मुले व पालक अधिकाधिक मागणी करतील. मौजमजा व अध्‍ययन हे वूट किड्सचे वचन आहे आणि ते लवकरच साध्‍य होणार आहे. वूट किड्स अॅप डाऊनलोडसाठी आयओएस आणि अँड्रॉईडवर उपलब्‍ध आहे. लहान मुले मोबाइल, टॅब्‍लेट आणि टीव्‍हीवर वूट किड्सचा आनंद घेऊ शकतात.
वूट किड्स बाबत
वूट किड्सचे चार प्रमुख विभाग आहेत: पाहा, शिका, वाचा आणि ऐका. तसेच ५००० हून अधिक तासांचा भारतीय व आंतरराष्‍ट्रीय कन्‍टेन्‍ट देखील आहे. संपन्‍न कन्‍टेन्‍ट लायब्ररीमध्‍ये ५००० हून अधिक एमसीक्‍यूज (बहुपर्यायी प्रश्‍न), ५ स्किल सेट डोमेन्‍स, कराडी टेल्‍स, जातका टेल्‍समधील १५० हून अधिक ऑडिओ बुक्‍स व ५०० हून अधिक पात्र नेतृत्वित ऑडिओ ओरिजिनल्‍स व सर्वाधिक विक्री होणारी पुस्‍तके यांचा समावेश आहे. वूट किड्सवरील कन्‍टेन्‍ट मुलांना अभ्‍यास व मौजमजेमध्‍ये उत्‍तम ताळमेळ राखण्‍यामध्‍ये मदत करेल. हे अॅप आयओएस व अँड्रॉईड फोन्‍सवर उपलब्‍ध आहे.
वूट बाबत:
वूट ही व्‍हायकॉम१८च्‍या अंतर्गत असलेली भारताची दुसरी सर्वात मोठी डिजिटल व्हिडिओ-ऑन-डिमांड स्ट्रिमिंग सेवा आहे. व्‍हायकॉम१८च्‍या नेटवर्क कन्‍टेन्‍टमध्‍ये ६०,००० तासांहून अधिक कालावधीची कन्‍टेन्‍ट लायब्ररी, नेटवर्क शोजभोवतीचे खास कन्‍टेन्‍ट आणि वूट ओरिजिनल्‍ससह हे व्‍यासपीठ विभागांमधील सूक्ष्‍मदर्शी प्रेक्षकांच्‍या विविध गरजांची पूर्तता करते. सध्‍या भारतात अॅड-सर्पोटेड सेवा म्‍हणून कार्यरत असलेल्‍या वूटचे मासिक ५५ दशलक्षहून अधिक सक्रिय युजर्स आहेत. वूट नाविन्‍यता, कन्‍टेन्‍ट, तंत्रज्ञान आणि विपणन उपक्रमांसंदर्भात अग्रस्‍थान कायम राखत आहे. वूट युजर्सना अनोखा अनुभव देण्‍याचा प्रयत्‍न करते.
व्‍हायकॉम १८ बाबत:
व्हायकॉम १८ मीडिया प्रा. लि. हे भारताच्या जलदगतीने विकसित होणार्‍या मनोरंजन नेटवर्क्सपैकी एक आहे आणि आयकॉनिक ब्रँड्सपैकी एक आहे, जो मल्टी-प्लॅटफॉर्म, मल्टी-जनरेशनल व मल्टीकल्चरल ब्रँड अनुभव देतो. ५१ टक्‍के मालकीहक्‍क असलेला व्हायकॉम इन्क. व ४९ टक्‍के मालकीहक्‍क असलेला नेटवर्क १८ ग्रुप यांचा संयुक्‍त उद्यम असलेला व्हायकॉम १८ एअर, ऑनलाईन, ऑन ग्राऊंड, इन शॉप व सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत भारतात मनोरंजन प्रदान करतो.

No comments:

Post a Comment