Friday 29 November 2019

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्यने सांभाळली युवा डान्सिंग क्वीन च्या परीक्षकपदाची धुरा !!


जुन्या काळात सुशिक्षित, पांढरपेशा आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने नृत्य करणे कमीपणाचे मानले जाई आणि घरातूनही परवानगी नसे,  त्यात जर एखाद्या घरातील मुलगा म्हणत असेल की त्याला पायात घुंगरु बांधायचे आहेत आणि नृत्याची आवड जोपासायची आहे तर .. आईचा पाठिंबा पण वडिलांचा पूर्णपणे विरोध .. असेच काहीसे घडले युवा डान्सिंग क्वीन जे परीक्षक मयूर वैद्य यांच्या बरोबर. नृत्य आणि नृत्य हाच माझा श्वास आणि ध्यास आहे सांगणारे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्यने यांनी आता 'युवा डान्सिंग क्वीन' च्या परीक्षकपदाची धुरा सांभाळली आहे . 'युवा डान्सिंग क्वीन' हा सेलिब्रिटी डान्स रिऍलिटी शो ११ डिसेंबर पासून बुधवार ते शुक्रवार  रात्री ९:३० वाजता झी युवा वर पहायला मिळेल .
युवा डान्सिंग क्वीन जे परीक्षक मयूर वैद्य यांना घरातून वडिलांचा सुरुवातीला ठाम विरोध असूनही आईचा खंबीर पाठिंबा होता . मयूर यांची जिद्द, नृत्यकलेप्रती असलेली त्यांची  निष्ठा ही ते करत असलेल्या त्यांच्या मेहनतीतून सगळ्यांनाच दिसत होती . ज्येष्ठ नृत्यगुरू आशाताई जोगळेकर आणि त्यांच्या कन्या अर्चना यांच्या आशीर्वादामुळे नृत्यकलेत मयूर यांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली आणि कथ्थक नृत्याच्या विविध परीक्षा देऊन मयूर यांनी नृत्यकलेतील ‘अलंकार’ ही पदवी मिळविली. नृत्यातील अलंकार पदवी मिळविल्यानंतर खऱ्या अर्थाने मयूरच्या करिअरला सुरुवात झाली.  मयूर यांना अनेक संधी मिळत गेल्या आणि त्याचे चीज त्यांनी केले. मयूर यांनी लोकनृत्य, रशियन बॅले यांचेही शिक्षण घेतले आहे. वेगवेगळ्या नृत्य कार्यशाळेतूनही त्यांनी सहभाग घेतला आहे. ज्येष्ठ नृत्यगुरू पं. बिरजू महाराज यांच्या कार्यक्रमातूनही ते सहभागी झाले आहेत. ‘नटरंगी नार’, ‘इथं हवंय कुणाला प्रेम’, ‘सख्या सजणा’, ‘जादू तेरी नजर’, ‘वन टू का फोर’, ‘दिवसा तू रात्री मी’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘लव्ह स्टोरी’, ‘पुन्हा सही रे सही’ आदी ‘सुयोग’च्या नाटकांसाठी तसेच  ‘संभवामी युगे युगे’या महानाटय़ासाठी, काही गुजराथी आणि इंग्रजी रंगभूमीसाठी आणि ‘सावरिया डॉट कॉम’, ‘रणभूमी’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘बाय गो बाय’ आदी चित्रपटांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. एक कोंकणी आणि एक हिंदूी चित्रपटही त्यांच्या नावावर आहे. विविध पुरस्कार सोहळे, कार्यक्रम, दूरचित्रवाहिन्यांवरील जाहिराती, फॅशन शो, खासगी मराठी, गुजराथी आल्बम आणि ‘माझे जीवन गाणे’, ‘शब्द सुरांची नाती’, ‘स्वर संग्राम’ आदी रिअ‍ॅलिटी शो साठीही नृत्य दिग्दर्शक म्हणून आपली मोहर उमटविली आहे आणि आता ११ डिसेंबर पासून बुधवार ते शुक्रवार  रात्री ९:३० वाजता झी युवा वाहिनीवरील ' युवा डान्सिंग क्वीन' ह्या सेलिब्रिटी डान्स रिऍलिटी मध्ये अप्सरा आली फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बरोबर दुसरे परीक्षक म्हणून आपल्याला पाहायला मिळतील .

3 comments:

  1. Hello Everybody,
    My name is Mrs Sharon Sim. I live in Singapore and i am a happy woman today? and i told my self that any lender that rescue my family from our poor situation, i will refer any person that is looking for loan to him, he gave me happiness to me and my family, i was in need of a loan of $250, 000.00 to start my life all over as i am a single mother with 3 kids I met this honest and GOD fearing man loan lender that help me with a loan of $250, 000.00 SG. Dollar, he is a GOD fearing man, if you are in need of loan and you will pay back the loan please contact him tell him that is Mrs Sharon, that refer you to him. contact Dr Purva Pius, via email:(urgentloan22@gmail.com) Whats App +91-8929509036 Thank you.

    ReplyDelete
  2. Urgent need female for egg donation with the sum of $500,000.00 3 crore,Email: jainhospitalcare@gmail.com
    whatsapp +91 9945317569

    ReplyDelete
  3. Do you need an urgent loan at low interest rate ? if yes.... We offer Loan at 3% rate apply now (financialserviceoffer876@gmail.com)

    ReplyDelete