Saturday, 23 November 2019

म्हणून दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांना बसला सुखद धक्का !!!

आज १२ वर्षांहून अधिक काळ 'झी टॉकीजवाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेनिरनिराळे सदाबहार चित्रपटविविध कथाबाह्य कार्यक्रमनाटकं अशा दर्जेदार कलाकृतींची पेशकश झी टॉकीज करत आले आहेयाशिवाय नवनवीन चित्रपटांचे 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरसुद्धा या वाहिनीवर पाहायला मिळतात. 'झी टॉकीजवाहिनीवर कुठल्या सिनेमाचा प्रीमियर होणारयाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतातउत्साही प्रेक्षकांचा रसभंग होणार नाही याची काळजी नेहमीच ही वाहिनी घेत असतेयेत्या रविवारीम्हणजेच २४ नोव्हेंबर रोजी, 'पळशीची पीटीया सिनेमाचा वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर वाहिनीवर होणार आहे
'पळशीची पीटीहा वेगळ्या विषयावरील आणि सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहेअनेक राज्य  राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार मिळवण्यात या चित्रपटाला यश मिळाले आहेमहाराष्ट्र शासनाचे उत्तमोत्तम पुरस्कार या सिनेमाला मिळालेधोंडिबा कारंडे यांना पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्का देण्यात आलामुख्य भूमिकेत सलेली किरण ढाणे हिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा सुद्धा पुरस्कार मिळाला आहेया चित्रपटासाठी आणखी एक मानाची बाब होतीती म्हणजे 'कान्स'साठी झालेली निवडहा क्ष फारच नाट्यमय ठरला. 'पळशीची पीटी'ची कान्ससाठी निवड झाली आहे असा फोन आला त्यावेळी दिग्दर्शक कारंडे रिक्षात होतेअशावेळी फोन आल्यावरसुरुवातीला खरंतर त्यांचा या बातमीवर विश्वासच बसला नाहीत्यातचहा फोन  एप्रिलला आलेला असल्यानेही 'एप्रिल फूल'साठी करण्यात येणारी मस्करी तर नाही नाअशी शंका सुद्धा त्यांना येत होतीअर्थातखरोखरच 'पळशीची पीटी'ची निवड झालेली होतीही बातमी ऐकू सगळ्यांनाच आनंद झालाभरपूर पुरस्कारप्राप्त असा हा दर्जेदा चित्रपट 'झी टॉकीज'वर पाहायला मिळणार आहेयेत्या रविवारी दुपारी १२ आणि संध्याकाळी  वाजता पाहायला विसरू नका, 'पळशीची पीटी'!!! 

No comments:

Post a Comment