Friday, 8 November 2019

तुम्हाला तुमच्या आसपास किंवा तुमच्या स्वतःतच हा लकी दिसेल - अभय महाजन

१० नोव्हेंबरला 'झी टॉकीजवाहिनीवर 'लकीया चित्रपटाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरहोत हेनिरनिराळ्या वेबसिरीज, हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप पाडणारा अभिनेता अभय महाजन यात मुख्य भूमिकेत पाहायला मिळेलत्याच्याशी या चित्रपटाच्या निमित्ताने गप्पा मारल्या
चित्रपटातील भूमिकेचे तुझ्याशी काही साधर्म्य आहे का?
या भूमिकेशी अभयचं काही साम्य हेअसं म्हणता येणार नाहीलकी या भूमिकेपेक्षा मी खऱ्या आयुष्यात फारच वेगळा आहेपणआपण भाग्यवान असणं किंवा कमनशिबी असणं हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असतोआयुष्यात नशिबाची साथ मिळणं या गोष्टीशी मात्र मी सहमत आहेया एका गोष्टीचा विचार केलातर अनेकांच्या युष्याशी ही भूमिका साधर्म्य साधते.
मराठी सिनेसृष्टीतील अप्रतिम दिग्दर्शक संजय जाधव याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
संजय दादा ज्याप्रकारचा सिनेमा करतोत्याप्रकारचे चित्रपट सगळेजण करू शकत नाहीतदोन वेगवेगळ्या पिढ्यांमधील काम संजय दादाने पाहिलं आहेसिनेसृष्टीत तांत्रिकरित्या होत गेलेले बदल त्याने अनुभवलेले आहेतत्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होतातो कुणाशीही टकन मैत्री करू शकतोत्यामुळे त्याच्यासोबत काम करत असतानादिग्दर्शक आणि कलाकार एवढंच नातं उरत नाहीसाहजिकपणे काम अतिशय चांगल्याप्रकारे होतं
सहकलाकारांसोबत काम करत असतानाचे काही अनुभव आम्हाला सांगशी का?
मुख्य भूमिकेत असलेली दीप्ती ही दक्षिणेतील गुणी अभेनेत्री आहेपणआम्ही एकत्र काम केलेलं व्हतंतिच्यासोबत काम करण्याचा अनुभव वेगळा ठरलामाझ्या मित्राची भूमिका साकारणारा मयूर मोरे हा माझा खूप चांगला मित्र आहेत्यामुळे काम करताना फारच मजा आलीकाही कलाकार हे विशिष्ट प्रसंगांसाठीच या चित्रपटात होतेपण त्यांच्या कामाची भट्टी सुद्धा उत्तम जमून आलीत्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना सुद्धा निश्चितपणे मजा आली
चित्रीकरणादरम्यानचा एखादा जेदार किस्सा किंवा आठवण आम्हाला सांग.
सिनेमाच्या पोस्टरवरच मी टायरमध्ये पळताना दिसत आहेत्या प्रसंगाचं चित्रीकरण हाच माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव आहेगोव्यातपणजीसारख्या ठिकाणीऑक्टोबर महिन्यात भर उन्हात मी रस्त्यावरून टायर लावून पळत होतोचित्रपटात एकही असा प्रसंग नाहीज्यात लकी नाहीत्यामुळे खूप दमछाक झालीपाळायचे खूप प्रसं या सिनेमात आहेतत्यामुळे उन्हा पाळायची वेळ अनेकवेळा आलीएकाबाजूला दमछाक करणाऱ्या या गोष्टी मजेदार आठवणी सुद्धा ठरल्या आहेतकारण काम खूपच मनापासून न्जॉय करायला मिळालं आहे.
हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा प्रेक्षकांनी का पाहावा असं तुला वाटतं?
तुम्हाला तुमच्या आसपास किंवा धीकधी तुमच्या स्वतःतच हा लकी दिसेलहा एक अत्यंत मजेदार आणि रपूर करमणूक करणारा चित्रपट आहेरविवारी १० नोव्हेंबरला 'झी टॉकीज'वर दुअप्री १२ आणि संध्याकाळी  वाजता हा चित्रपट बघायला मिळेलहा चित्रपट प्रेक्षकांना रपूर हसवणार असल्यानेदिवसातून दोनदा सुद्धा सगळेजण एकत्र बसू या चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकताअधिकाधिक लोकांनीही संधी साधून हा सिनेमा अवश्य पहा.

No comments:

Post a Comment