मुंबई ४ नोव्हेंबर, २०१९ : मराठी माणसाचं पुलंशी एक वेगळच नातं आहे... पुलंच्या कथा वाचूनच वाचकांना आपल्या व्यथांचा विसर पडतो, शब्दातील व्यंगातुन बहुरंग साकारून प्रेक्षकांना पुलंनी खळखळून हसविले. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके पु.ल.देशपांडे... ज्यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटक, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले... वायाकॉम18 स्टुडिओजने मागील वर्षी खुद्द त्यांच्याच आयुष्यावर आधारित भाई – व्यक्ती की वल्ली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला. आता पु.ल. देशपांडे यांच्या पहिल्या शतकोत्तर जन्मदिनानिमित्त कलर्स मराठी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे ‘भाई – व्यक्ती की वल्ली’- पूर्वार्ध रविवार १० नोव्हेंबर रात्री ८ वा.
व्यक्तिचित्रण किती खुशखुशीत असू शकतं, कथेतील प्रत्येक पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे त्यांच्या लिखाण शैलीतून कळते. लिखाणाची शैली अशी अतरंगी की त्या व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडतो, हास्य आणि व्यंग यांचा अलौकिक ताळमेळ म्हणजे ही व्यक्ती... पु.लंच्या आयुष्याचे टप्पे, त्यांचे ऐकलेले किस्से, त्यांच्या जवळची माणस, त्यांच्या कलाकृती या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना या सिनेमाद्वारे बघायला मिळणार आहे. सागर देशमुख या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे, तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत, संगीत अजित परब यांचे आहे... चित्रपटामध्ये इरावती हर्षे यांनी सुनीता बाईंची भूमिका साकारली आहे ...
तेंव्हा नक्की बघा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमियर ‘भाई – व्यक्ती की वल्ली’- पूर्वार्ध रविवार १० नोव्हेंबर रात्री ८ वा.
No comments:
Post a Comment