जबाबदार प्राजक्ता
झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय असून वेळोवेळी या मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. या मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरले. या मालिकेत येसूबाईंचे पात्र हे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत आहे. या मालिकेसाठी प्राजक्ताने बरीच मेहनत घेतली तसेच तिने घोडेस्वारीचं आणि तालवारबाजीचं प्रशिक्षण देखील घेतलं.
शालेय जीवनापासूनच प्राजक्ताने अनेक सांस्कृतिक उपक्रमांमधून हिरीरीने सहभाग घेतला. अनेक एकांकिका स्पर्धांमधून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. संस्कृत आणि मराठी भाषेच्या बोर्डाच्या परीक्षेत पहिला नंबर पटकावून तिनं शिक्षकांची मनं देखील जिंकली. जेव्हा 'महाराणी येसूबाईंची' भूमिका तिला देण्यात आली तेव्हा ती गव्हर्नमेंटच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तीन वर्षाचा पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करत होती. जेव्हा या भूमिकेबद्दल तिला विचारण्यात आले, तेव्हा तिला हे हि माहित होते कि हा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे ही तितकेच महत्वाचे आहे. आपले पुढील वेळापत्रक किती व्यस्त असणार याचे पूर्ण भान ठेवूनच तिने ही ऑफर स्वीकारली आणि ही दोन्ही आव्हानं लीलया पेलली. काही दिवसांपूर्वीच महाराणी येसूबाईची वेशभूषा करून लॅपटॉपवर नोट्स वाचत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. जे आपल्या वेळेचं कारण देत कामामध्ये चालढकल करतात अशा लोकांसाठी प्राजक्ताचे उदाहरण आदर्श आहे. हे सगळे करताना ती फिटनेसकडेही योग्य लक्ष देते.
No comments:
Post a Comment