Tuesday, 14 April 2020

एयरटेल थँक्स अँप आणि अपोलो २४/७ एआय तोडणार कोव्हिड-१९ साखळी


अपोलो २४/७ आणि एयरटेल ग्राहकांना कोव्हिड-१९ इंडिया हीट मॅप द्वारे जाणून घेता येईल त्यांच्या परिसराची रिस्क प्रोफाइल
मुंबई, १४ एप्रिल २०२० – समाजाच्या हितासाठी आपले नेटवर्क आणि डिजिटल तंत्रज्ञान वापरण्याचे ध्येय आखलेल्या भारती एयरटेल (एयरटेल) कंपनीने आज अपोलो हॉस्पिटलचे डिजिटल व्यवसाय युनिट असलेल्या अपोलो २४/७ बरोबर एक अनोखी भागिदारी केली असून त्याद्वारे कोव्हिड- १९ विरोधातील भारताच्या लढ्याला मदत केली जाणार आहे. एयरटेलचे पॅन भारतातील नेटवर्क आणि अपोलो हॉस्पिटलचा आघाडीचा डिजिटल हेल्थकेयर प्लॅटफॉर्म – अपोलो २४/७ एकत्रित करून कोव्हिड-१९ विषयी जागरूकता निर्माण करणे या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने ही भागिदारी करण्यात आली आहे.
अपोलो २४/७ ने एयरटेल थँक्स अँपवर मोफत डिजिटल स्वयं-विश्लेषण लाँच केले आहे, ज्याच्या मदतीने ग्राहकांना त्यांची कोव्हिड- १९ रिस्क प्रोफाइल जाणून घेता येईल. ही चाचणी अपोलो २४/७ ने विकसित केली असून त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या एआय आधारित तंत्रज्ञानामुळे वापरकर्त्यांना काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांची कोव्हिड- १९ रिस्क प्रोफाइल जाणून घेता येईल.
हे टुल ग्राहकाला ‘इंडिया वाइड कोव्हिड- १९ हीट मॅप’द्वारे आपल्या परिसराची, त्या ठिकाणाहून मिळालेल्या एकत्रित प्रतिसादानुसार कमी-उच्च श्रेणीमधील रिस्क प्रोफाइल जाणून घेण्यासाठी मदत करेल. यामुळे वापरकर्त्याला देशातील स्थिती स्पष्टपणे जाणून घेण्यासाठी आणि कोव्हिड-१९ ची साखळी तोडत सामाजिक अंतर राखण्याचा नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी उपयुक्त ठरेल. ज्या रुग्णांना धोका आहे आणि जे आयसीएमआर प्रमाणित चाचणी मापदंडाअंतर्गत येतात, त्यांना कोव्हिड-१९ च्या चाचणीसाठी अधिकृत चाचणी केंद्राकडे मार्गदर्शित केले जाईल. हे स्कॅन डॉक्टरांची जागा घेणारे नाही, तर तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. यावर पुरवण्यात आलेली माहिती गुप्त राखली जाईल. असलेल्या धोक्याची जलद चाचणी मोबाइल स्मार्टफोन, लॅपटॉप्स आणि डेस्कटॉपवर घेता येईल.
अपोलो हॉस्पिटल्स समूहाच्या कार्यकारी उपाध्यक्ष श्रीमती शोबना कमिनेनी म्हणाल्या, ‘’अपोलो २४/७ खऱ्या अर्थाने आपले आरोग्य जपण्यासाठी मदत करणारे आहे. मोफत कोव्हिड- १९ स्कॅन एआय टुलमुळे भारतभरातील एयरटेल ग्राहकांना अधिकृत माहिती तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अपोलोचे स्त्रोत उपलब्ध होतील. एयरटेबरोबरची ही भागिदारी आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत करेल.’’
श्री गोपाल विठ्ठल, व्यवस्थापकीय संचालक-मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत-दक्षिण आशिया),भारती एयरटेल म्हणाले, ‘’हा अनपेक्षित काळ आहे आणि तंत्रज्ञानाचा देशाला फायदा करून देण्यासाठी आम्ही अपोलो २४/७ सारख्या भागिदाराबरोबर अथक प्रयत्न करत आहोत. भारतात एयरटेल थँक्सचा प्लॅटफॉर्म लाखो लोकांपर्यंत पोहोचणारा आहे आणि आम्हाला खात्री आहे, की कोव्हिड- १९ चा प्रसार रोखण्यास मदत करेल. या अवघड समयी देशाची सेवा करण्यासाठी आणि सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एयरटेल बांधील आहे.‘’
सध्याच्या परिस्थितीत रुग्णांना नेहमीच्या सल्लासेवेसाठी दवाखाना किंवा हॉस्पिटलमध्ये जाणे अवघड झाले असताना अपोलो रुग्णांना हॉस्पिटलमध्ये न येता २४/७ रुग्णांना टेलि- कन्सल्ट करण्याची मुभा देत आहे.

No comments:

Post a Comment