लॉकडाऊन मध्ये प्रेक्षकांच्या म नोरंजनासाठी झी टॉकीज ५ एप्रिल पासून टॉकीज प्रीमियर लीग सादर करत आहे. यामध्ये प्रेक्षकांना प्रत्येक रविवारी दर्जेदार चित् रपटांचा आस्वाद घेता येईल. टॉकी ज प्रीमियर लीगची दमदार सुरुवात ‘तुंबाड’ या भयपटाने होणार असू न हा चित्रपट पाहताना प्रेक्षकां च्या मनात भीतची लहर उठेल. महा राष्ट्रातील एका छोट्या गावात घ डणाऱ्या या चित्रपटाच्या कथेत वि नायक राव (सोहम शहा) हा हस्तर या शापित देवतेचे गूढ उकलताना दि सेल. लोककथा, भीती आणि कल्पना रम्यता यांचा सुंदर मिलाफ झाले ला हा चित्रपट पाहताना प्रेक् षकांना काही वेगळाच अनुभव येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन राही अनिल बर्वे आणि आदेश प्रसाद यां नी केले असून बर्वे यांचा दिग् दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. २०१८ मधील सर्वोत्कृष्ट चि त्रपटांपैकी एक मानल्या गेलेल् या या चित्रपटाचे प्रसारण रविवा री, ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वा जता आणि संध्याकाळी ६ वाजता ‘झी टॉकीज’ वाहिनीवर केले जाईल.
उत्कृष्ट कथानकाला लाभलेल्या उच्च निर्मितीमूल्यांमुळे भारतीय चि त्रपटांतील भयपटांना या चित् रपटाने एका वरच्या स्तरावर नेले असून चित्रपटातील भीतीचे प्रसं ग पाहताना बरेचदा प्रेक्षकांना आपले हात डोळ्यंवर न्यावेसे वा टतील, इतका त्यात भीतीचा परिणाम साधण्यात आला आहे. 75 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झा लेला हा पहिला भारतीय चित्रपट ठ रला असून भारतीयंसाठी ही निश्चि तच एक अभिमानाची बाब म्हणावी ला गेल. सोहम शहाशिवाय चित्रपटात ज्यो ती मालशे, मोहम्मद सामद आणि अनि ता दाते हे कलकारही महत्त्वपूर् ण भूमिकांमध्ये पाहायला मिळतील.
अभिनेता आणि निर्माता सोहम शाह म्हणतात, “तुंबाडने मला शिकवले की जर तुमच्यात स्वप्ने पाहण्याची हिंमत असेल तर काहीच अशक्य नाही. ६ वर्षांचे कठोर परिश्रम, ६ वर्षांचे धैर्य आणि ६ वर्षांची उत्कटता तेव्हा वास्तवात उतरले जेव्हा अखेर तुंबाड मोठ्या पडद्यावर रीलीज झाला. मला आजही आठवतंय जेव्हा दिग्दर्शक राही अनिल बर्वे माझ्याकडे या चित्रपटाचं कथानक घेऊन आले तेव्हा ते जे कथानक सादर करतील ते अद्वितीय असेल याची मला खात्री होती आणि आम्हांला हा चित्रपट ब नवण्याचा मार्गही शोधायचा होता. ह्या चित्रपटाचे प्रॉडक्शन करणे सोपे नव्हते आणि अभिनयाच्या दृ ष्टीनेही हे कठीणच होते. मला शा रीरिक रूपाने स्वतःला बदलायचे हो ते आणि माझ्या शैलीवर मेहनत घ् यायची होती. आपल्या कौशल्यावर ल क्ष केंद्रित करायचे होते आणि प्रॉ डक्शनच्या दैनिक गोष्टीही सांभा ळायच्या होत्या. पण आम्हांला मि ळालेला अफलातून प्रतिसाद आणि मह त्त्वपूर्ण प्रशंसा जी तुंबाडला मिळाली आणि आत्ताही मिळत आहे, त्यामुळे आमच्या कठोर परिश्रमा चे चीज झाले आहे.”
चित्रपटाची कथा १९४७ मध्ये तुं बाड या गावात घडते. छोट्या विना यकाला आपल्या कुटुंबाच्या मालकी च्या प्रचंड धनदौलतीची माहिती मि ळते. पण ती प्राप्त करण्याचा प् रयत्न केल्यास त्या संपत्तीचे र क्षण करणाऱ्या सैतानाला बळी पडा वे लागेल, अशी ताकीदही त्याला दि ली जाते. विनायक आपल्य पणजीची से वा करीत असे. तिला सदैव बसत्या स्थितीत ठेवणे गरजेचे असते. ति चा मृत्यू झाल्यावर त्याला आपल् या दौलतीचा भाग म्हणून एक घर मि ळते. हस्तर नावाचा एक शापित दे वता त्यातील संपत्तीचे रक्षण करी त असल्याचे त्याला सांगण्यात ये त. अनेक वर्षांनंतर विनायक आपली दौलत प्राप्त करण्यासाठी पुन् हा एकदा तुंबाडला येतो.
अमाप संपत्ती प्राप्त करण्याचे विनायकचे स्वप्न हे भयस्वप्न ठरे ल की काय?
रविवार, ५ एप्रिल रोजी 'टॉकीज प्री मियर लीग'मध्ये पाहा ‘तुंबाड’ दु पारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या ‘झी टॉकीज’ वर!
No comments:
Post a Comment