आयसीएसई, सीबीएसई बोर्डांच्या अभ्यासक्रमांसाठी अनुकूल, खेळांच्या माध्यमातून गणितीय कौशल्ये मुलांना शिकवा
मुंबई, १५ एप्रिल २०२०: प्राथमिक ते इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने गणित शिकवण्याचा सोर्स असलेल्या मॅटिफिकने भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या एड-टेक बाजारपेठेत पदार्पण केले आहे. सध्याच्या कोविड-१९ साथीच्या काळात मॅटिफिकने उचललेले हे पाऊल अतिशय महत्त्वाचे आहे. जोवर लॉकडाउन कालावधी संपत नाही तोवर होम-स्कूलिंग अर्थात घरामध्ये शिक्षणाची पारंपरिक सुविधा उपलब्ध करवून देणे आणि मुले भविष्यासाठी योग्य तऱ्हेने व योग्य गतीने तयार होतील हा मॅटिफिकच्या होम प्रोडक्ट्चा उद्देश आहे. ही सुविधा गणिताचे प्राध्यापक आणि अभ्यासक्रम तज्ञांनी अशा पालकांसाठी खास तयार केले आहे.
मॅटिफिकमध्ये अनेक खेळ आणि गणितीय कौशल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. यातील प्रत्येक खेळ आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटी इतके रोचक आहे की मुले या खेळांमध्ये स्वयंप्रेरणेने गणित शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये तासनतास मग्न होतात. मुलांसोबत संवाद साधण्याच्या मनोरंजक पद्धती, रंगीबेरंगी पात्रे आणि खेळ यामुळे गणितांविषयीची जिज्ञासा आणि गणिते सोडवण्याचा मुलांचा आत्मविश्वास वाढतो. विविध संशोधन आणि अभ्यासातून निष्कर्षांती तयार करण्यात आलेल्या मॅटिफिकच्या कन्टेन्टमुळे विद्यार्थ्यांची गणिताची परीक्षेतील कामगिरी ३४% सुधारते हे सिद्ध झाले आहे. पालकांना डॅशबोर्डला ऍक्सेस दिला जातो, याठिकाणी पालक आपल्या मुलांच्या गणितातील प्रगतीवर लक्ष ठेऊ शकतात. यामध्ये ऑनलाईन खेळांच्या स्वरूपात गणिताच्या अभ्यासाचे रिसोर्सेस आणि मुलांना गुंतवून ठेवतील अशा ऍक्टिव्हिटीज आहेत ज्यामुळे नर्सरी ते सहाव्या इयत्तेतील मुलांची आकलन आणि गणिते सोडवण्याच्या क्षमतांना प्रोत्साहन मिळते.
श्रीमती विभा महाजन, वाईस प्रेसिडेंट, मॅटिफिक इंडिया यांनी सांगितले, "सध्याच्या काळात भारतातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना आपला अभ्यास सुरु ठेवण्याची संधी मिळावी असे आम्हाला वाटते. यातील उच्च दर्जाचा कन्टेन्ट आणि शिक्षण क्षेत्रात उपलब्ध असलेल्या महागड्या सुविधा यांची तुलना करता मॅटिफिक गॅलॅक्सी ही नक्कीच व्यवहार्य निवड ठरू शकते. मॅटिफिकने विद्यार्थ्यांसाठी ७ दिवसांच्या फ्री ट्रायलची देखील सोय दिली आहे. सर्वात अनुकूल कन्टेन्ट उपलब्ध करवून देण्याबरोबरीनेच मॅटिफिक गॅलॅक्सी हे ऑफलाईन मोडमध्ये चालवण्याची सोय देखील यामध्ये आहे. यामुळे डेटा वापराच्या खर्चात देखील मोठी बचत करता येऊ शकेल.
मॅटिफिक ४५ पेक्षा जास्त देशांमध्ये असून जगभरातील २६ भाषांमध्ये ते वापरले जाऊ शकते. दरदिवशी हजारांहून विद्यार्थी आणि शिक्षक ऑनलाईन अभ्यासासाठी आणि शिकवण्यासाठी यावर लॉग इन करतात. गूगल प्ले आणि ऍप स्टोर या दोन्ही ठिकाणी उपलब्ध असलेला मॅटिफिक गॅलॅक्सी हा प्रोग्रॅम डेस्कटॉप, टॅब्लेट्स आणि मोबाईल डिव्हायसेसवर वापरता येऊ शकतो.
No comments:
Post a Comment