गॅरी करतोय बेकिंग
करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. या सुट्टीमध्ये कलाकारांना त्यांची आवड-निवड जपण्यासाठी मोकळा वेळ मिळाला आहे. हे कलाकार घरी आपल्या वेळ कसा घालवत आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.
माझ्या नवऱ्याची बायको मधील प्रेक्षकांचा लाडका गॅरी म्हणजेच अभिनेता अभिजित खांडकेकर सध्या किचनमध्ये बेकिंग करण्यात मग्न आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अभिजीत नवनवीन रेसिपीज ट्राय करतोय. त्याने केक आणि कुकीज बेक केल्या. इतकंच नव्हे तर अभिजीतने पहिल्यांदाच बेकिंग केलं असून त्याने केलेल्या केक आणि कुकीजचे फोटोज सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसाठी शेअर देखील केले आहेत. घरी राहून सगळ्यांनी अशा प्रकारे काहीतरी करून वेळ घालवावा असं अभिजीतने चाहते प्रेक्षकांना आवाहन केलं आहे.

No comments:
Post a Comment