लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाने मंत्रमुग्ध करण्यासाठी झी टॉकीज ने आणलेल्या टॉकीज प्रीमियर लीग ची दमदार सुरुवात, तुंबाड या सुपरहिट चित्रपटाने झाली. आता येत्या रविवारी म्हणजेच 12 एप्रिल रोजी दुपारी 12.00 वा आणि संध्या 6.00 वाजता प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी झी टॉकीज घेऊन येत आहे "बोला अलख निरंजन". महाराष्ट्राचे लाडके अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांची लक्षवेधी आणि एक वेगळी भूमिका त्यांच्या चाहत्यांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असलेल्या झी टॉकीज प्रीमियर लीग मध्ये या रविवारी म्हणजेच 12 एप्रिल दुपारी 12.00 वा. आणि संध्या 6.00 वाजता एक खास मेजवानी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असणार आहे.
व्ही एफ क्स टेक्नॉलॉजी चा अफलातून प्रयोग हे या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने घराघरात पोहोचलेल्या डॉ अमोल कोल्हे आणि अभिनेत्री सिया पाटील यांच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर नागेश भोसले, दीपक शिर्के, दिपाली सैय्यद, मिलिंद दास्ताने यांच्या विशेष भूमिका झी टॉकीज च्या प्रेक्षकांना "बोला अलख निरंजन" या चित्रपटामार्फत बघायला मिळणार आहेत. चित्रपटात अमोल कोल्हे नास्तिक असल्याचे दाखविण्यात आले आहे, तर सिया पाटील (अदिती ) हिची देवावर प्रचंड श्रद्धा आहे. नवनाथांच्या महतीचे यथार्थ दर्शन करणारा घन:श्याम येडे दिग्दर्शित ‘बोला अलखनिरंजन’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाचे संगीत विशाल बोरूळकर तर सुरेश वाडकर, रविंद्र साठे, नेहा राजपाल, बेला शेंडे यांनी भक्तीमय गिते गायली आहेत .
या चित्रपटाचा संदर्भ नवनाथ भक्तिसार या धार्मिक पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. नवनाथांन पैकी एक असलेल्या मच्छिंद्र नाथ यांच्या जीवनावर आधारित पहिल्यांदाच असा भव्यदिव्य चित्रपट येत आहे. हा चित्रपट फक्त पौराणिक नसून सद्यस्थिती चीही जोड त्याला देण्यात आली आहे... त्यामुळे तुंबाड या चित्रपटाच्या प्रदर्शना नंतर "बोला अलख निरंजन" हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री वाटते.
HOMEPAGE
ReplyDeleteHOMEPAGE4
HOMEPAGE
HOMEPAGE2
HOMEPAGE