Tuesday, 19 May 2020

Zee Marathi - 25 years of Sa Re Ga Ma Pa

२५ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणी होणार ताज्या - अभिजीत खांडकेकर
सा रे    या लोकप्रिय कार्यक्रमाचा यशस्वी रौप्यमहोत्सव आपल्या लाडक्या प्रेक्षकांसोबत साजरा करण्यासाठी झी मराठी येत्या रविवारी 'सारेगमप एक देश एक रागहा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेविशेष म्हणजे हा कार्यक्रम कलाकारांनी घरून शूट केला आहेया सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिजित खांडकेकर निभावणार आहे त्याबद्दल अभिजित सोबत साधलेला हा खास संवा
सा रे    च्या २५ वर्षांच्या प्रवासाचा तू एक भाग होतो आहेस याबद्दल काय सांगशील?
सा रे    हा कार्यक्रम २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करतोय हि खरंच खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहेफक्त महाराष्ट्रच नाही तर भारत आणि भारताबाहेर देखील हा कार्यक्रम तितकाच लोकप्रिय आहे आणि या कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव साजरा होणार असून मी पण त्याच्या एक भाग आहे याचा मला अभिमान आहे.  
हा कार्यक्रम तुझ्या किती जवळचा आहे?
-   सा रे    या लोकप्रिय कार्यक्रमाच्या  पर्वांचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद आहेत्यामुळे या २५ वर्षांच्या प्रवासाचा मी देखील एक साक्षीदार आहे असं मी म्हणू शकतो
प्रेक्षकांसाठी सुरांची मेजवानी असणार आहे रविवारीत्याबद्दल काय सांगशील (थोडक्यात स्वरूप काय असेल कॉन्सर्टचं?)
एक देश एक राग हे कॉन्सर्ट रविवारी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेहा कार्यक्रम खरंच खूप युनिक आणि स्पेशल आहेकुठलेही कलाकार एकत्र  येताएकमेकांना  भेटताडिजिटल मंचावर एकत्र येऊन एकमेकांशी गप्पा मारणार आहेतगेम्स खेळणार आहेतया २५ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणी ताज्या करणार आहेतहा खरंचं वाखाणण्याजोगा प्रयोग आहे.
तू या कार्यक्रमासाठी घरातून शूट केलंहा अनुभव कसा होता?
मी या संपूर्ण कार्यक्रमाचं शूटिंग माझ्या मोबाईलवर केलंयएरवी शूट करताना सेटवर सर्व गोष्टी उपलब्ध असतात त्यामुळे आपल्याला ते सोपं वाटतं पण घरी शूट करणं तितकं सोपं नाहीयेखूप मोठी प्रोसेस होतीत्यात जर काही चुका झाल्यातर पुन्हा परत शूट करून ते टीम कडून बरोबर आहे कि नाही ते बघणंआणि लॉकडाऊन असल्यामुळे घरातील सर्व कामं सांभाळून शूटिंग करणं हा खरंच एक मोठा टास्क होतापण यात मला सुखदाची खूप मदत झालीतिने कॅमेराच्या मागून मला खूप मदत केली तसंच झी मराठीच्या टीमने वेळोवेळी योग्य सूचना देऊन मला सहकार्य केलं त्यामुळे मला हा वेगळा प्रयोग करताना खरंच खूप मजा आली.

No comments:

Post a Comment