Showing posts with label Sa Re Ga Ma Pa. Show all posts
Showing posts with label Sa Re Ga Ma Pa. Show all posts

Wednesday, 20 May 2020

Zee Marathi - 25 years of Sa Re Ga Ma Pa

‘सा रे ग म प’ चे लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
झी मराठीवरील सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. हा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष झाली असली तरी या कार्यक्रमातील पंचरत्न म्हणजेच प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. या कार्यक्रमाने महाराष्ट्राला यांसारखे नवीन गायक दिले ज्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षक कधीच विसरले नाहीत. आता हेच लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. निमित्त आहे सा रे ग म प या अभुदपूर्व कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव. प्रेक्षकांचं प्रेम आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे या लोकप्रिय कार्यक्रमाने २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. हे सगळं प्रेक्षकांच्या भरगोस प्रतिसादामुळेच शक्य झालं आणि म्हणून या २५ वर्षाच्या प्रवासातील साथीदार असलेल्या प्रेक्षकांसाठी झी मराठी सादर करणार आहे 'एक देश एक राग' कॉन्सर्ट.
या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना लोकप्रिय लिटिल चॅम्प्स मधील पंचरत्न ‘कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत’ यांच्या सुरांची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल. तसेच सेलिब्रिटी पर्वातील गायक सुमित राघवन, रेणुका शहाणे, अमृता सुभाष, प्रिया बापट, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक यांचे देखील धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेत, सोबत स्वानंद किरकिरे, बेला शेंडे, सलील कुलकर्णी, वैशाली सामंत, रवी जाधव, स्वप्नील बांदोडकर ह्या दिग्गज्यांमध्ये देखील मजेशीर स्पर्धा रंगणार आहे
एक विशेष सोहळा जिथे असतील गाणी, किस्से आणि २५ वर्षांची धमाल, त्यामुळे चला गाऊया आणि टेन्शन अनलॉक करूया. पाहायला विसरू नका 'सा रे ग म प एक देश एक राग’चा हा विशेष सोहळा रविवार २४ मे संध्याकाळी ७ वाजता फक्त झी मराठीवर. 

Tuesday, 19 May 2020

Zee Marathi - 25 years of Sa Re Ga Ma Pa

२५ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणी होणार ताज्या - अभिजीत खांडकेकर
सा रे ग म प या लोकप्रिय कार्यक्रमाचा यशस्वी रौप्यमहोत्सव आपल्या लाडक्या प्रेक्षकांसोबत साजरा करण्यासाठी झी मराठी येत्या रविवारी 'सारेगमप एक देश एक राग' हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम कलाकारांनी घरून शूट केला आहे. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिजित खांडकेकर निभावणार आहे त्याबद्दल अभिजित सोबत साधलेला हा खास संवा
१. सा रे ग म प च्या २५ वर्षांच्या प्रवासाचा तू एक भाग होतो आहेस याबद्दल काय सांगशील?
- सा रे ग म प हा कार्यक्रम २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करतोय हि खरंच खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर भारत आणि भारताबाहेर देखील हा कार्यक्रम तितकाच लोकप्रिय आहे आणि या कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव साजरा होणार असून मी पण त्याच्या एक भाग आहे याचा मला अभिमान आहे.  
२. हा कार्यक्रम तुझ्या किती जवळचा आहे?
-   सा रे ग म प या लोकप्रिय कार्यक्रमाच्या २ पर्वांचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळे या २५ वर्षांच्या प्रवासाचा मी देखील एक साक्षीदार आहे असं मी म्हणू शकतो. 
३. प्रेक्षकांसाठी सुरांची मेजवानी असणार आहे रविवारी, त्याबद्दल काय सांगशील (थोडक्यात स्वरूप काय असेल कॉन्सर्टचं?)
- एक देश एक राग हे कॉन्सर्ट रविवारी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा कार्यक्रम खरंच खूप युनिक आणि स्पेशल आहे. कुठलेही कलाकार एकत्र न येता, एकमेकांना न भेटता, डिजिटल मंचावर एकत्र येऊन एकमेकांशी गप्पा मारणार आहेत, गेम्स खेळणार आहेत, या २५ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणी ताज्या करणार आहेत. हा खरंचं वाखाणण्याजोगा प्रयोग आहे.
४. तू या कार्यक्रमासाठी घरातून शूट केलं, हा अनुभव कसा होता?
- मी या संपूर्ण कार्यक्रमाचं शूटिंग माझ्या मोबाईलवर केलंय. एरवी शूट करताना सेटवर सर्व गोष्टी उपलब्ध असतात त्यामुळे आपल्याला ते सोपं वाटतं पण घरी शूट करणं तितकं सोपं नाहीये. खूप मोठी प्रोसेस होती. त्यात जर काही चुका झाल्यातर पुन्हा परत शूट करून ते टीम कडून बरोबर आहे कि नाही ते बघणं. आणि लॉकडाऊन असल्यामुळे घरातील सर्व कामं सांभाळून शूटिंग करणं हा खरंच एक मोठा टास्क होता. पण यात मला सुखदाची खूप मदत झाली. तिने कॅमेराच्या मागून मला खूप मदत केली तसंच झी मराठीच्या टीमने वेळोवेळी योग्य सूचना देऊन मला सहकार्य केलं त्यामुळे मला हा वेगळा प्रयोग करताना खरंच खूप मजा आली.

Wednesday, 13 May 2020

Zee Marathi - Zee Marathi celebrates 25 glorious years of Sa Re Ga Ma Pa

सारेगमप नॉनस्टॉप २५
\
सारेगमप रौप्यमहोत्सवी सोहळा
\
‘एक देश एक राग महासोहोळा’ - सारेगमप ची २५ वर्ष
 

मराठी माणसाची संगीताशी नाळ एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने जोडलेली आहे. काहीजण सकाळची सुरुवात आकाशवाणीवरील भक्ती संगीताने तर काही जण मन:शांती अनुभवण्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकतात. उपनगरी रेल्वेने किंवा ‘बेस्ट’ बसने प्रवास करणारे नोकरदार, वाहतूक कोंडीत अडकलेला प्रवासी कानात हेडफोन घालून गाणी ऐकत असतात. संगीतप्रेमी मराठीजनांसाठी 'सा रे ग म प' हा कार्यक्रम नेहमीच अग्रस्थानी राहिला असून गेली २५ वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सुरांची मेहफिल सादर करत आहे.
हा यशस्वी रौप्यमहोत्सव आपल्या लाडक्या प्रेक्षकांसोबत साजरा करण्यासाठी झी मराठी सादर करत आहे 'सारेगमप एक देश एक राग'. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिजित खांडकेकर निभावणार आहे. तसेच सारेगमपच्या सेलिब्रिटी गेस्ट म्हणून ‘पल्लवी जोशी’ देखील उपस्थित असणार आहेत. या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना लिटिल चॅम्प्स मधील पंचरत्न ‘कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत’ यांच्या सुरांची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल. तसेच सेलिब्रिटी पर्वातील गायक सुमित राघवन, रेणुका शहाणे, अमृता सुभाष, प्रिया बापट, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक यांचे देखील धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेत, सोबत स्वानंद किरकिरे, बेला शेंडे, सलील कुलकर्णी, वैशाली सामंत, रवी जाधव, स्वप्नील बांदोडकर ह्या दिग्गज्यांमध्ये देखील मजेशीर स्पर्धा रंगणार आहे, तसेच पल्लवी जोशी कमलेश भडकमकर आणि टीम सोबत सारेगमपच्या प्रवासाला उजाळा देतील.
या कॉन्सर्टमध्ये फक्त आवाजाचे सूरच नाही लागणार तर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्यांचे आवडते विनोदवीर आणि मालिकांमधील कलाकार देखील असणार आहेत. त्यामुळे ‘सारेगमप एक देश एक राग’चा हा मंच लॉकडाउन मध्ये प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करेल यात शंकाच नाही. एक विशेष सोहळा जिथे असतील गाणी, किस्से आणि २५ वर्षांची धमाल, त्यामुळे चला गाऊया आणि टेन्शन अनलॉक करूया. पाहायला विसरू नका 'सा रे ग म प एक देश एक राग’चा हा विशेष सोहळा रविवार २४ मे संध्याकाळी ७ वाजता फक्त झी मराठीवर.  घरी राहा सुरक्षित राहा.