Wednesday 13 May 2020

Zee Marathi - Zee Marathi celebrates 25 glorious years of Sa Re Ga Ma Pa

सारेगमप नॉनस्टॉप २५
\
सारेगमप रौप्यमहोत्सवी सोहळा
\
एक देश एक राग महासोहोळा - सारेगमप ची २५ वर्ष
 

मराठी माणसाची संगीताशी नाळ एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने जोडलेली आहेकाहीजण सकाळची सुरुवात आकाशवाणीवरील भक्ती संगीताने तर काही जण मन:शांती अनुभवण्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकतातउपनगरी रेल्वेने किंवा ‘बेस्ट’ बसने प्रवास करणारे नोकरदारवाहतूक कोंडीत अडकलेला प्रवासी कानात हेडफोन घालून गाणी ऐकत असतातसंगीतप्रेमी मराठीजनांसाठी 'सा रे   हा कार्यक्रम नेहमीच अग्रस्थानी राहिला असून गेली २५ वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सुरांची मेहफिल सादर करत आहे.
हा यशस्वी रौप्यमहोत्सव आपल्या लाडक्या प्रेक्षकांसोबत साजरा करण्यासाठी झी मराठी सादर करत आहे 'सारेगमप एक देश एक राग'. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिजित खांडकेकर निभावणार आहेतसेच सारेगमपच्या सेलिब्रिटी गेस्ट म्हणून ‘पल्लवी जोशी’ देखील उपस्थित असणार आहेतया कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना लिटिल चॅम्प्स मधील पंचरत्न ‘कार्तिकी गायकवाडमुग्धा वैशंपायनआर्या आंबेकरप्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत’ यांच्या सुरांची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळेलतसेच सेलिब्रिटी पर्वातील गायक सुमित राघवनरेणुका शहाणेअमृता सुभाषप्रिया बापटपुष्कर श्रोत्रीप्रसाद ओक यांचे देखील धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेतसोबत स्वानंद किरकिरेबेला शेंडेसलील कुलकर्णीवैशाली सामंतरवी जाधवस्वप्नील बांदोडकर ह्या दिग्गज्यांमध्ये देखील मजेशीर स्पर्धा रंगणार आहेतसेच पल्लवी जोशी कमलेश भडकमकर आणि टीम सोबत सारेगमपच्या प्रवासाला उजाळा देतील.
या कॉन्सर्टमध्ये फक्त आवाजाचे सूरच नाही लागणार तर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्यांचे आवडते विनोदवीर आणि मालिकांमधील कलाकार देखील असणार आहेतत्यामुळे ‘सारेगमप एक देश एक रागचा हा मंच लॉकडाउन मध्ये प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करेल यात शंकाच नाहीएक विशेष सोहळा जिथे असतील गाणीकिस्से आणि २५ वर्षांची धमालत्यामुळे चला गाऊया आणि टेन्शन अनलॉक करूयापाहायला विसरू नका 'सा रे    एक देश एक रागचा हा विशेष सोहळा रविवार २४ मे संध्याकाळी  वाजता फक्त झी मराठीवर.  घरी राहा सुरक्षित राहा.

No comments:

Post a Comment