फुलवाच्या आठवणींना मिळतोय उजाळा!!!
/
फुलवा खामकर रमली आठवणींच्या खजिन्यात!!!
'डान्स महाराष्ट्र डान्स' ही एक धमाकेदार नृत्यस्पर्धा होती. 'एकसे बढकर एक' स्पर्धक आणि त्यांचे अप्रतिम डान्स परफॉर्मन्स यामुळे ही स्पर्धा अत्यंत रंजक ठरली आहे. फुलवा खामकर, सिद्धार्थ जाधव आणि आदित्य सरपोतदार असे उत्तम परीक्षक लाभल्यामुळे कार्यक्रमाचा आगळा साज होता. आता लॉकडाऊनच्या निमित्ताने हाच कार्यक्रम 'झी युवा' वाहिनीवर पुन्हा पाहायला मिळणार आहे. उत्कृष्ट डान्सर असलेली फुलवा खामकर, यानिमित्ताने पुन्हा एकदा 'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या आठवणीत रमली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा, एक भव्यदिव्य कार्यक्रम 'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या रूपात उभा राहिला होता. त्यामुळे त्या आठवणींमध्ये रमून जाणे साहजिक आहे. 'झी युवा' वाहिनीवरील 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या कार्यक्रमात तिने आपल्या अभिनयाची झलक सुद्धा दाखवली आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा दुग्धशर्करा योग ठरला आहे.
अनेक नृत्यस्पर्धांचे परीक्षण फुलवाने केले आहे. परंतु, 'डान्स महाराष्ट्र डान्स'चा अनुभव तिच्यासाठी खूपच खास आणि वेगळा होता. सेटवर तिने केलेली धमाल आजही सर्वच चाहत्यांच्या लक्षात आहे. फेरप्रक्षेपणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम पुन्हा पाहता येणार असल्याने, सगळी धमाल आणि मजा मस्ती पुन्हा अनुभवण्याची संधी फुलवाला सुद्धा मिळाली आहे. वायके ग्रुप, ओम डान्स अकॅडमी, चेतन, हे सगळेच फुलवाचे लाडके डान्सर होते. त्यांचे भन्नाट परफॉर्मन्स पुन्हा बघायला मिळणार आहेत म्हणून फुलवा खूपच खुश आहे. सिद्धार्थ आणि आदित्य या जवळच्या मित्रांसोबत केलेली मजा, सुव्रतला दिलेली अनेक टोपणनावं, अशा अनेक आठवणींना पुन्हा उजाळा देण्याची संधी दवडणार नसल्याचे फुलवा सांगते. या दर्जेदार कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राची ती मनापासून वाट पाहते आहे. स्पर्धक, परीक्षक आणि कोरिओग्राफर या तिन्ही भूमिकांमधे अनेकदा काम केलेली फुलवा खामकर, या फेरप्रक्षेपणाबद्दल सांगताना ती म्हणाली;
"मी अनेक स्पर्धांचे परीक्षण केले आहे. 'डान्स महाराष्ट्र डान्स'चा अनुभव मात्र खूपच छान होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाविन्यपूर्ण कोरिओग्राफी पाहण्याची संधी मिळाली. हा एक आंतरराष्ट्रीय पातळीचा, भव्यदिव्य शो होता, असं मी आवर्जून सांगेन. 'झी युवा' वाहिनीच्या निमित्ताने पुन्हा एकदा 'झी'च्या वाहिनीवर मी दिसणार आहे, ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. यानिमित्ताने सेटवरच्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळेल. 'झी युवा' वाहिनीवरच मला अभिनयाची संधी सुद्धा मिळाली होती. या फेरप्रक्षेपणामुळे, हे नाते अधिक दृढ होणार आहे."
No comments:
Post a Comment