Tuesday, 9 June 2020

Zee Marathi - Ratris Khel Chale 2

शेवंताची भूमिका अंगात भिनली आहे - अपूर्वा नेमळेकर
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात जवळपास अडीच महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू देश पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहेतसंच मालिकांच्या चित्रीकरणाला देखील परवानगी मिळाली आहेत्यामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आता लवकरच त्यांच्या भेटीला येतीलपण या अडीच महिन्यांच्या मोठ्या सुट्टी नंतर भूमिकेपासून लांब असलेले कलाकार चित्रीकरणाची तयारी कशी करत आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहेरात्रीस खेळ चाले  या मालिकेतील सर्वांची आवडती शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हि देखील या सुट्टीमध्ये तिच्या भूमिकेपासून लांब गेली आहे का असं विचारलं असताना ती म्हणाली, "मी माझ्या भूमिके पासून कधी वेगळी नव्हतेचप्रेक्षकांच्या आग्रहास्तव मी माझ्या भूमिकेतील फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेशिवाय जेव्हा मी इंस्टाग्रामवर लाईव्ह गेले तेव्हा देखील मी शेवंताचा लुक केला होतालॉकडाऊनमध्ये मी प्रेक्षकांना माझ्या पात्राशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहेशेवंताचं पात्र हे माझ्या अंगात इतकं भिनलंयत्यामुळे हि भूमिका पुन्हा साकारताना निश्चितच मजा येईल."

No comments:

Post a Comment