Tuesday, 9 June 2020

Zee Yuva | Dr.Don | देवदत्तचा तरुणपणीचा फोटो बघून, युवकांना मिळतेय प्रेरणा!!

देवदत्तचा फोटो बघून, तरुण झाले अवाक!!
/
देवदत्तचा तरुणपणीचा फोटो बघून, युवकांना मिळतेय प्रेरणा!! 

हिरो म्हटलं, की पिळदार शरीर असलेली व्यक्ती डोळ्यासमोर येते. केवळ बॉलीवूडच नाही, तर मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी सुद्धा असे पिळदार शरीर राखण्यात मागे नाहीत. विविध प्रकारच्या भूमिका करणारा अभिनेता देवदत्त नागे, म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका 'डॉक्टर डॉन' याची व्यायामाची आवड सगळ्यांनाच ठाऊक आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांच्या तोडीसतोड शरीर त्याने कमावले आहे. 'झी युवा' वाहिनीवरील, 'डॉक्टर डॉन' या मालिकेत, त्याची आखीवरेखीव आणि मजबूत शरीरयष्टी आपण सर्वांनीच पाहिली आहे. त्यासाठी तो घेत असलेली मेहनत, सर्व तरुणांच्या चर्चेचा आणि प्रेरणेचा विषय ठरते. देवदत्तचा एक फोटो सध्या इन्स्टाग्रामवर खूपच व्हायरल झाला आहे. देवदत्त सतरा वर्षांचा असतानाचा एक फोटो यात पाहायला मिळत आहे. त्याचबरोबरीने, पिळदार शरीर असलेला सध्याचा फोटो सुद्धा पाहायला मिळतो आहे. मेहनत घेतल्यामुळे त्याच्या सुदृढ शरीराला मिळालेलं पिळदार स्वरूप, ही तरुणांसाठी नवी प्रेरणा ठरली आहे. जर, देवदत्त हे करू शकतो, तर आपण का नाही, असा सकारात्मक विचार त्याचे चाहते करू लागले आहेत. सतराव्या वर्षी, उंच आणि काहीसा सडपातळ असलेला देवदत्त नागे, याचा सध्याचा शारीरिक बांधा बघून, भलेभले आश्चर्यचकित होतात. त्याच्या छातीची रुंदी, दंडाचा घेर हे त्याने कमावलेल्या शरीराचे उत्तम पुरावे आहेत. त्यामुळेच, मराठी तरुण देवदत्तकडे आदर्श म्हणून पाहतात. त्यातच, त्याचा तरुणपणीचा फोटो सुद्धा पाहायला मिळाल्यामुळे, आपण सुद्धा पिळदार शरीरयष्टीचे होऊ शकतो, असे अनेक तरुणांना वाटू लागले आहे.
या व्हायरल झालेल्या फोटोचा असाही परिणाम पाहायला मिळाला आहे.

No comments:

Post a Comment