Thursday, 11 February 2021

23 of 2,612 Zee Yuva - Almost Suphal Sampurna

 तुम्हाला कशी वाटली ही कांगारू फॅमिली?

झी युवा वरील लोकप्रिय मालिका 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण'ने नुकताच ४०० भागांचा टप्पा गाठला. या मालिकेतील व्यक्तिरेखांची प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे आणि म्हणूनच प्रेक्षक या मालिकेवर आणि त्यातील कलाकारांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. मालिकेसोबतच सोशल मिडीयावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय. सोशल मीडियावर देखील यातील प्रमुख कलाकारांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
नुकतंच या मालिकेत नचिकेतच्या आईची म्हणजेच अभिनेत्री प्रिया मराठेची एंट्री झाली. त्यांच्या एन्ट्रीमुळे मालिकेला एक वेगळंच वळण आलं. मालिकेत सईचं कुटुंब खूप मोठं आहे आणि दुसरीकडे नचिकेत हा एकटाच असून आता त्याची आई त्याच्याकडे भारतात आली आहे. नचिकेत म्हणजेच अभिनेता निखिल दामले याने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या ऑन-स्क्रीन कुटुंबाचा म्हणजेच त्याचा आणि त्याची आई इरावतीचा एक मस्त फोटो त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. अप्पा मालिकेत नचिकेतला कांगारू म्हणत असल्यामुळे त्याने त्याच्या आणि त्याच्या आईच्या फोटोला 'द कांगारू फॅमिली' असं कॅप्शन दिलंय. त्याच्या आणि प्रिया मराठेच्या या सुपरकूल फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ही सुपरकूल कांगारू फॅमिली प्रेक्षक आणि चाहत्यांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. तुम्हाला कशी वाटली ही कांगारू फॅमिली? 

No comments:

Post a Comment