Thursday 11 February 2021

&TV || Sneha Mangal roped in to play 'Jijabai' in &TV's Ek Mahanayak Dr B R Ambedkar

 

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'मध्‍ये 'जिजाबाई'ची भूमिका साकारण्‍यासाठी स्‍नेहा मंगलची निवड

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'च्‍या नुकतेच सादर करण्‍यात आलेल्‍या एपिसोड्समध्‍ये प्रेक्षकांना भीमाबाईचा (नेहा जोशी) मृत्‍यू पाहायला मिळाला, ज्‍यामुळे भीमरावांच्‍या कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले. रामजी (जगन्‍नाथ निवंगुणे) यांनी एकटे वडिल म्‍हणून त्‍यांच्‍या मुलांची काळजी घेण्‍याची अतिरिक्‍त जबाबदारी स्‍वीकारली आहे. मीराबाईची (फाल्‍गुनी दवे) त्‍यांचा दुसरा विवाह करण्‍याची इच्‍छा आहे. रामजी यांनी दुसरा विवाह करण्‍याला स्‍पष्‍टपणे नकार दिला असला तरी त्‍यांना समजले की दुसरा विवाह केल्‍यास त्‍यांच्‍या कुटुंबाला प्रबळ आधार मिळेल, तसेच विधवा महिलेला नवीन जीवन मिळेल. ते मुंबईमध्‍ये राहणारी विधवा महिला जिजाबाईसोबत विवाह करण्‍यास होकार देतात. लवकरच, स्‍नेहा मंगल मालिकेमध्‍ये जिजाबाईची भूमिका साकारण्‍यासाठी प्रवेश करणार आहे. जिजाबाईच्‍या भूमिकेबाबत सांगताना स्‍नेहा मंगल म्‍हणाली, ''मला मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'मध्‍ये जिजाबाईची भूमिका साकारण्‍याची संधी मिळाल्‍याने आनंद झाला आहे. जिजाबाई या रामजी सकपाळ यांच्‍या दुस-या पत्‍नी होत्‍या. त्‍या विधवा होत्‍या आणि मुंबईमध्‍ये त्‍यांच्‍या वडिलांसोबत राहिल्‍या. विवाहानंतर त्‍या गोरेगावला स्‍थलांतरित झाल्‍या. हे स्‍थळ रामजी यांच्‍या कार्यस्‍थळापासून जवळ होते. त्‍या त्‍यांच्‍या मृत्‍यूपर्यंत त्‍यांच्‍यासोबत होत्‍या. जिजाबाईच्‍या प्रवेशासह रामजी व भीमराव यांच्‍या जीवनातील नवीन अध्‍याय पाहायला मिळेल. तसेच याचा कुटुंबावर काय परिणाम होईल, हे देखील आगामी एपिसोड्समध्‍ये पाहायला मिळेल.''

अधिक जाणण्‍यासाठी पाहत राहा 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

 

No comments:

Post a Comment