Friday 19 March 2021

आगामी मराठी चित्रपट "लाव" चा गाने रेकॉर्ड करुन महूर्त. चित्रपटात दिसणार नामवंत कलाकार.

नारीसहारा बहुउदेशिय सामाजिक संस्था व व्ही.आ.के.फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत मराठी चित्रपट "लाव"ह्या चित्रपटाचे गाणे रेकाॅर्डींग करुन चित्रपटाचा मुहुर्त संपन्न झाला.
चित्रपटाची कथा एक प्रेम कहानी च्या भोवताली असून चित्रपटा मध्ये मुलींच शिक्षण का होत  नाही, त्यांच्यामध्ये असलेला शिक्षणा चा आभाव, बाल विवाह, बाल माता ह्या गंभीर विषयांवर हा सिनेमा भाष्य करणारा आहे  . लाव ह्या मराठी चित्रपटा पासून अभिनेत्री सुहानी निंबाळकर चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.तसेच चित्रपटामध्ये अभिनेता तन्मय सांडवे सोबत चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता मिलींद शिंदे,अनिल नगरकर आणि अभिनेत्री विना जामकर महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत , सोबतच बाल कलाकार क्षितीजा भालेराव ही असेल. 
चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल राजकुमार कांबळे करत असून लेखन श्रीकांत शिंदे ह्यांचे आहे तर चित्रपटाला संगीत मिलिंद मोरे ह्यांचे आहे. गायक शिध्दार्थ जाधव ,गितकार सुबोध पवार,आकाश पवार,नृत्य दिग्दर्शक राजेश पडवळे,सिनेमॅटोग्राफर गणेश पवार आणि कार्यकारी निर्माता पोपट जी.कांबळे ही संपूर्ण टीम आप आपली जबाबदारी पार पाडणार आहेत.
मुहूर्ता वेळी आक्का भालेराव कांबळे तसेच मुहूर्तास नारीसहारा बहुउदेशिय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वैशाली पवार,संतोष पवार सचिव योगेश विधाते त्यांचे सहकारी महीला पदाधीकारी उपस्थित होते तसेच .व्ही.आर.के.फिल्म प्रोडक्शन चे राजकुमार कांबळे,संजय मोहीते,संग्राम सरवदे आवर्जून उपस्थित होते.
.चित्रपटाचा मुहूर्त झाला असून आता लवकरच चित्रपटाच्या शुटींगला नासिक जिल्ह्यातील दिंडोरी व निफाड तालुक्यात सुरवात होणार आहे.

No comments:

Post a Comment