Wednesday 10 March 2021

Mahashivratri ki Shubkamnaye say &TV artists, Gracy Singh and Tanvi Dogra

 


एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार ग्रेसी सिंग व तन्‍वी डोग्रा यांच्‍याकडून महाशिवरात्रीच्‍या शुभेच्‍छा

'भगवान शिवची महान रात्र' म्‍हणून ओळखला जाणारा महाशिवरात्री सण देशभरात उत्‍साह व भक्‍तीभावाने साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्‍या शुभप्रसंगी भक्‍त उपवास करत, शिव देवाचे प्रतिरूप असलेल्‍या शिवलिंगाची प्रार्थना व आराधना करत शिव देवाला प्रसन्‍न करतात. पारंपारिकरित्‍या हा दिवस देव शिव व देवी पार्वती यांच्‍या विवाहाचा दिन म्‍हणून साजरा केला जात असला तरी या सणाचे अधिक महत्त्व देखील आहे. एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'मध्‍ये संतोषी माँची भूमिका साकारणा-या ग्रेसी सिंग म्‍हणाल्‍या, ''पुराणानुसार महाशिवरात्रीच्‍या दिवशी भगवान शिवने समुद्र मंथनमधून बाहेर पडलेल्‍या अनेक गोष्‍टींपैकी एक असलेल्‍या विषाचे प्राशन केले होते. भोलेनाथजींनी त्‍यांच्‍या घशामध्‍ये विष साठवून ठेवत जगाला वाचवले आणि म्‍हणूनच त्‍यांना नीलकंठ देखील म्हटले जाते. आणखी एका सिद्धांतानुसार भगवान शिव यांनी रात्रीच्‍या वेळी निर्मिती, संवर्धन व विध्‍वंस करणारे दैवी नृत्‍य केले, म्‍हणूनच या रात्रीला 'महाशिवरात्री' म्‍हणतात.'' साजरीकरणाबाबत बोलताना तन्‍वी डोग्रा ऊर्फ स्‍वाती म्‍हणाल्‍या, ''सणाच्‍या दिवशी भक्‍त भल्या पहाटे लवकर उठतात, स्‍नान करतात आणि नवीन पोशाख परिधान करतात. ते मंदिर परिसर स्‍वच्‍छ करतात आणि शिवलिंगावर फळे व दूधासह फुले, बेलपत्र व धतुरा अर्पण करतात. त्‍यानंतर शिव चालिसा मंत्र, आरती आणि महामृत्‍यूंजय मंत्र पठण केले जाते. यानंतर हलवा किंवा खीरच्‍या रूपात भगवान शिव यांना प्रसादाचा भोग दिला जातो. भक्‍त उपवास करतात आणि दिवसभर फक्‍त फळे खातात. सूर्यास्‍त होण्‍यापूर्वी पूजा केली जाते, ज्‍यानंतर सात्त्विक पदार्थांचे सेवन करता येऊ शकते. माझ्याकडून उपवास करणा-या व हा सण साजरा करणा-या सर्वांना महाशिवरात्रीच्‍या आनंदमय शुभेच्‍छा!''

पहा 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर

No comments:

Post a Comment