Monday 8 March 2021

Zee Yuva - Almost Suphal Sampurna

 नचिकेत आणि सई घेणार कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय...

झी युवा वरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेने प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे नुकताच ४०० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील प्रमुख पात्र सई, नचिकेत आणि अप्पा यांच्यावर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. नुकतंच मालिकेत नचिकेतची आई म्हणजेच अभिनेत्री प्रिया मराठेची एंट्री झाली आणि मालिकेने वेगळच वळण घेतलं. याआधी नचिकेत आणि सईच्या नात्याला फक्त अप्पांचा विरोध होता पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियात स्थायिक आणि मॉडर्न विचार असलेली नचिकेतची आई जेव्हा टिपिकल मराठी कुटुंबात वाढलेल्या सईला पाहते तेव्हा तिचाही नचिकेत आणि सईच्या नात्याला नकार ठाम होतो. 
नचिकेतच्या आईला इम्प्रेस करण्यासाठी सई आणि अप्पांचं मन जिंकण्यासाठी नचिकेत खूप प्रयत्न करतात पण शेवटी दोघांचाही नकार मात्र कायमच आहे. आता नाईलाज असलेले सई नचिकेत आपापल्या घरच्यांना २४ तासांची मुदत देतात. या २४ तासात जर अप्पा आणि नचिकेतच्या आईने नचिकेत आणि सईच नातं मान्य करून त्यांच्या लग्नाला परवानगी नाही दिली तर ते दोघं कोर्टात जाऊन लग्न करतील अशी चेतावणी नचिकेत त्यांना देतो. आता अप्पा आणि नचिकेतची आई आपला हट्ट सोडून त्या दोघांना लग्नाची परवानगी देतील का? त्या दोघांचा नकार कायम राहिला तर नचिकेत आणि सई खरंच कोर्ट मॅरेज करतील का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.   

No comments:

Post a Comment