Friday, 20 May 2022

‘झी टीव्ही’ जाहीर करीत आहे ऑडिशन्स मुंबईत 21 मे व 22 मे रोजी ‘डीआयडी सुपर मॉम्स’चे ऑडिशन्स!

गेल्या तीन दशकांत भारतातील रिअॅलिटी कार्यक्रमांचे स्वरूप कसे असेल, ते ठरविण्यात ‘झी टीव्ही’ वाहिनीने मूलभूत भूमिका पार पाडली असून या वाहिनीने भारतीय प्रेक्षकांपुढे अंताक्षरी, सा रे ग म पा, डान्स इंडिया डान्स आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ यासारखे कार्यक्रम सादर केले आहेत. हे सर्व कार्यक्रम टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी कार्यक्रमच ठरले असे नव्हे, तर आजही हे कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. आजच्या काळातही या कार्यक्रमांना स्वत:चा असा भक्कम आणि निष्ठावान प्रेक्षकवर्ग आहे. यंदा वर्षाच्या प्रारंभी डीआयडी लिटल मास्टर्स या कार्यक्रमाची पाचवी आवृत्ती धूमधडाक्यात सुरू करण्यात आली होती आणि तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि आता गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये देशातील मातांना सुपरमॉम होण्याची संधी दिलेला ‘डीआयडी सुपर मॉम्स’ या रिअॅलिटी कार्यक्रमाची तिसरी आवृत्ती सुरू करण्यास ‘झी टीव्ही’ वाहिनी सिध्द झाली आहे. या कार्यक्रमाच्या तीन परीक्षकांमध्ये बॉलीवूडचा लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा याचा समावेश असेल. आपल्या अंगचे गुण सादर करण्याची आणि नृत्याच्या क्षेत्रात त्यांना आपले नाव करण्याची संधी ते देतील.

कोविड-19 साथीची परिस्थिती लक्षात घेऊन डीआयडी सुपर मॉम्ससाठी गुणी स्पर्धकांचा शोध आता प्रत्यक्ष स्थळांवरही ऑडिशन्सद्वारे घेण्यात येणार आहे. मुंबईत 21 मे आणि 22 मे या दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन ऑडिशन्स घेण्यात येतील. त्यात आपल्या नावाची नोंद करण्यासाठी स्पर्धकांना आपले नृत्य करतानाचे एक-दीड मिनिटांचे दोन व्हिडिओ व्हॉटसअॅप या सामाजिक मंचावरील 9137857810/ 9137857830 (तुमचे व शहराचे नाव, वय यासह) या दोन क्रमांकावर अपलोड करावे लागतील. किंवा स्पर्धक 8291829164 या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नोंदणीची लिंक मागवू शकतो.

रेमो डिसुझा म्हणाला, “सर्व सुपर मॉम्स! चला, तयारीला लागा. आम्ही तुमची ऑडिशन घेण्यासाठी तुमच्या शहरात येत आहोत आणि तुम्हाला आपल्या अंगचे नृत्यगुण सादर करण्याची संधी देत आहोत. डीआयडी सुपर मॉमद्वारे तुम्ही आपलं स्वप्न पूर्ण करू शकता!”

त्यामुळे आपण आई असलात, तरी आपण उत्कृष्ट नर्तिकाही आहोत, असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला आपले नृत्यकौशल्य जगापुढे सादर करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही आपल्या शहरातील केंद्रांवर जाऊन आपली ऑडिशन द्यावी.

हा भारतातील टीव्हीवर सर्वाधिक काळ सुरू असलेला नृत्यविषयक स्पर्धा कार्यक्रम असून ‘डीआयडी सुपर मॉम्स’ची नवी आवृत्ती लवकरच प्रसारित होणार फक्त ‘झी टीव्ही’वर!

मुंबई ऑडिशनची तारीख –

दिनांक - 21 मे  22 मे 2022 रोजी

वेळ - सकाळी .०० पासुन रेजिस्ट्रेशन सुरु

स्थळ – नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर्स अमृत शक्ती, चांदिवली फार्म रोड, ऑफ साकी-विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400072.

No comments:

Post a Comment