मुंबई 10 मे, २०२२ : कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस एक नवी जोडी आली राजवर्धन आणि कावेरी म्हणजेच विवेक सांगळे आणि तन्वी मुंडले. राजवर्धन आणि कावेरीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. राजवर्धन आणि कावेरी आता प्रेक्षकांना आपल्या घरातील सदस्य वाटू लागले आहेत. कावेरीच्या लूकची देखील बरीच चर्चा आहे.कावेरीच्या हटके लूकची देखिल बरीच चर्चा आहे. मग कावेरी हातात घालत असलेले घुंगरूंचे ब्रेसलेट असो वा कावेरीची पर्स असो वा तिचे पैंजण असो वा साडी असो... कावेरी मालिकेमध्ये साडी मध्येच दिसते. कारण, मुळातच तिला साडी नेसायला आवडतं, तिच्या आईला साडी नेसायला आवडायची त्यामुळे कुठेतरी तिला असं वाटतं कि, साडी नसल्याने ती आईच्या जवळ आहे. राजवर्धन जरा आधूनिक विचाराँचा असल्याने कावेरी पार्टीमध्ये जाताना देखील साडी नेसते हे त्याला खटकतं. सतत दुसऱ्याचा विचार करणारी, मदतीला धावून जाणारी, प्रत्येक गोष्ट समजावून सांगणारी कावेरी... तिला राजवर्धन "ओ काकू" अशी हाक मारतो. खरंतर एखाद्या मुलीला काकू असं बोलावलेलं आवडतं नाही पण, आता हेच तरुण मुलांमध्ये खूप व्हायरल होऊ लागलं आहे. कधी कधी विवेक तन्वीला सेटवर देखील काकू अशीच हाक मारतो.
No comments:
Post a Comment