1 नोव्हेंबर 2022: लता मंगेशकर यांचा आवाज ही त्यांची ओळख होती आणि कायमच राहिल. ह्या वर्षाच्या सुरूवातीला फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला. संगीत क्षेत्रात अनेक वर्षे महत्त्वपूर्ण योगदान देऊन त्यांनी ह्या क्षेत्राला आकार दिला. ह्या महान गायिकेचा समृद्ध वारसा साजरा करण्यासाठी करण्यासाठी दि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स एनसीपीए सादर करत आहे ‘मेरी आवाज ही पहचान है.’
सुरूवातीला आपल्या वडिलांकडून प्रशिक्षण घेतलेल्या लता मंगेशकर यांनी पुढे अमान अली खान यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. नावाजलेले संगीत दिग्दर्शक गुलाम हैदर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. 1000 हूनही अधिक हिंदी चित्रपटांसाठी आणि 36 हून अधिक भारतीय क्षेत्रीय आणि विदेशी भाषांमध्ये गायलेल्या मंगेशकर यांचा मंजुळ आवाज आणि अजरामर गीते पुढील अनेक वर्षे स्मरणात राहतील. त्यांच्या गैर–फिल्मी गीतांची यादीही तेवढीच प्रभावी आहे.
शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या युवा गायिका मधुरा कुंभार, शरयू दाते आणि सुस्मिता डावलकर ह्या मंगेशकर यांनी अजरामर केलेली रागांवर आधारित गाणी सादर करतील. ह्या गाण्यांना तेवढ्याच गुणी वादकांची साथसंगत लाभेल. ह्या संध्येचे सूत्रसंचालन भारतीय संगीत दिग्दर्शक आणि मराठी व हिंदी चित्रपटांसाठीचे गायक कौशल एस.इनामदार करतील.
एका विशिष्ट सूर रागाला त्या संबंधित सूर रागावर आधारित चित्रपटाच्या गाण्याशी जोडून त्यातून श्रोत्यांनी हिंदुस्थानी संगीताच्या समृद्ध सूर राग वारशाचा आनंद घ्यावा आणि त्याचे कौतुक करावे यासाठी ही संकल्पनात्मक प्रस्तुती खास विकसित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाबद्दल माहितीः
दिनांकः 5 नोव्हेंबर 2022
स्थळः टाटा थिएटर
वेळः संध्याकाळी 6:30 वाजता
तिकीटेः सदस्य – रू. 360 आणि 270/- आणि अन्य – रू. 400 आणि 300
तिकीटे NCPA ची वेबसाईट आणि BookMyShow वर उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment