Tuesday 29 November 2022

'गामा फाऊंडेशन फिल्म्स' आणि 'छाया प्रॉडक्शन'च्या ‘फ्रेंच फ़्राईस’, ‘पँडेमिक द ब्राइट साइड’, ‘स्पेशल पेन्टिंग’ आणि ‘लुडो क्वीन’ लघुपटांचे गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव "एनएफडीसी फिल्म बाजार" स्पेशल स्क्रिनिंग.

भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या "गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव" आणि  "एनएफडीसी फिल्म बाजार" २०२२ मध्ये पहिल्यांदाच लघुपट निर्मितीत उतरलेल्या गामा फाऊंडेशन फिल्म्सने बाजी मारली आहे. त्यांच्या चारही मराठी लघुपट चित्रपट या विभागात यावर्षीच्या "मार्केट स्क्रीनिंग" आणि "विव्हिंग रूम" या विभागात स्क्रीनिंग संपन्न झाले आहे. या चारही लघुपटांसाठी गामा फाऊंडेशन फिल्म्ससोबत 'छाया प्रॉडक्शन'ने सहनिर्मिती केली आहे. या महोत्सवात या लघुपटाचे सिलेक्शन झाल्याने यातील आशय वैश्विक स्तरावर पोहचण्यास विशेष मदत झाली असून देश विदेशातील अनेक मान्यवरांनी या लघुपटांचे कौतुक केले आहे.

एन.एफ.डी.सी फिल्म बाजार हे एक प्रकारचे संपूर्ण चित्रपटसृष्टी करता लागणारी आर्थिक सहाय्य व्यवस्था आणि सहनिर्मिती त्याच बरोबर फिल्म्स रिलीझ व  डिस्ट्रिब्युशन यांचा दुवा जोडणारे व्यासपीठ आहे. विविध दर्जेदार कलाकृतींना भक्कम पाठबळ देण्याचे काम एन.एफ.डी.सी फिल्म बाजार सातत्याने करीत आहे.

'गामा फाऊंडेशन फिल्म्सनिर्मित आणि 'छाया प्रॉडक्शनसहनिर्मित एकूण ४ लघुपटांचे प्रदर्शन करण्यात या महोत्सवात करण्यात आले.[ (फ्रेंच फ़्राईस (हॉरर) /पँडेमिक द ब्राइट साइड( फॅमिली ड्रामा)/स्पेशल पेन्टिंग (हॉरर) /लुडो क्वीन (हॉरर) ] लघुपटांचे दिग्दर्शन अनुक्रमे अमृता देवधर आणि नंदू धुरंधर यांनी केले आहे. या लघुपटांचे कथा लेखन अमृता देवधर आणि कल्पना राणे यांनी केले आहे.

गोव्यातील महोत्सवाला दिग्दर्शिका अमृता देवधरदिग्दर्शक नंदू धुरंधर,  सहनिर्माते संदीप कामत उपस्थित होते.  भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI), आशियातील सर्वात जुना व भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असून दरवर्षी या महोत्सवात दर्जेदार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांची निवड होते. चित्रपट रसिकांसाठी ही एक पर्वणी असते.

No comments:

Post a Comment