लिंक: https://www.youtube.com/watch?
राष्ट्रीय, 24 जानेवारी, 2023: किम्बर्ली क्लार्क या मासिकपाळीदरम्यान स्वच्छतेसाठीची उत्पादने सादर करणाऱ्या, जगातील आघाडीच्या ब्रँडने कोटेक्स प्रोहेल्थ+ सॅनिटरी पॅड्स हे आपले सर्वोत्तम, प्रीमियम अभिनव उत्पादन भारतात सादर केले आहे. ओव्हरनाईट पिरियड पॅन्टीजच्या नाविन्यपूर्ण श्रेणीसह कोटेक्स इंडियाने मे २०२२मध्ये भारतात पुनःपदार्पण केले. त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत या ब्रँडने कोटेक्स प्रोहेल्थ+ हे नवे उत्पादन सादर करत आपली आगेकूच सुरु ठेवली आहे. कशातही माघार घेऊ नका, सॅनिटरी संरक्षणाच्या बाबतीत तडजोड करू नका, #ChooseItAll अर्थात तुम्हाला हवे ते सर्व निवडा असा प्रोत्साहक संदेश यामधून देण्यात आला आहे.
किम्बर्ली-क्लार्क इंडियाच्या मार्केटिंग डायरेक्टर श्रीमती साक्षी वर्मा मेनन यांनी सांगितले, "स्त्रियांच्या शारीरिक स्वच्छतेच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रवर्तक ब्रँड म्हणून आम्ही नेहमीच महिलांना मासिकपाळीबद्दलच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. कोटेक्समध्ये आम्ही फक्त पॅड्स बनवत नाही. महिलांना मासिकपाळीच्या संदर्भात ज्या-ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या सर्व आम्ही बारकाईने समजून घेतो आणि क्रांतिकारी उपाययोजना करून त्या दूर करतो. आमच्या असे लक्षात आले की आजच्या काळातील महिला लीक-फ्री पॅड्स निवडतात पण मग त्यांना रॅशेस सहन करावे लागतात किंवा काहीजणी सॉफ्ट रॅश फ्री पॅड्स निवडतात पण मग त्यांना ओलसरपणा सहन करावा लागतो. आपण २०२३ मध्ये येऊन पोचलोय मग महिला सर्वकाही का निवडू शकत नाहीत? म्हणूनच आम्ही भारतात दाखल करत आहोत कोटेक्स प्रोहेल्थ+. आमचे हे क्रांतिकारी नवे उत्पादन दोन टोकाच्या फायद्यांपैकी फक्त काहीतरी एक निवडता येण्याचे जुने चक्र संपवून टाकेल आणि युवा महिलांना मासिकपाळीच्या काळात निरोगी संरक्षण मिळवून देईल व त्यांचे समाधान द्विगुणित करेल. आम्हाला आशा आहे की, कोटेक्स प्रोहेल्थ+ भारतीय ग्राहकांची मने जिंकेल. या उत्पादनाचे व्यावसायिक यश पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."
नव्या उत्पादनाच्या शुभारंभाच्या निमित्ताने कोटेक्सने #ChooseItAll हे ३६० डिग्री मार्केटिंग कॅम्पेन विविध डिजिटल व ऑफलाईन प्लॅटफॉर्म्सवर सुरु केले आहे. ऑगिल्वी इंडियाने याची संकल्पना रचली असून या कॅम्पेनमध्ये युवा महिलांना त्या मासिकपाळीच्या काळात सध्या वापरत असलेल्या संरक्षणाबाबत पुनर्विचार करून निरोगी संरक्षण निवडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.
कॅम्पेनच्या संकल्पनेबाबत ऑगिल्वी इंडियाच्या सिनियर एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डायरेक्टर श्रीमती तनुजा भट यांनी सांगितले, "मासिकपाळीच्या काळात वापरावयाच्या संरक्षणामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आणि मासिकपाळीदरम्यानच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी कोटेक्स सतत प्रयत्नशील असतो. हा ब्रँड असे मानतो की, ज्यामध्ये तडजोड करावी लागते अशा पर्यायांमधून निवड करण्याची वेळ मुलींवर येऊच नये, मग ते आयुष्य असो किंवा सॅनिटरी पॅड्स. त्यांना मुक्तपणे वावरता आले पाहिजे आणि आरोग्याला अपायकारक गोष्टी व परिस्थितीला दूर ठेवता आले पाहिजे. 'आय चूज इट ऑल, आय एम द चेंज' (I Choose It All, I Am The Change) हे या कॅम्पेनचे घोषवाक्य आहे आणि त्यामध्ये याच भावनेचा सन्मान करण्यात आला आहे. हे असे क्रांतिकारी उत्पादन आहे जे आपला दावा खरा करून दाखवते, त्यासाठी आमचा उद्देश होता की असे कॅम्पेन निर्माण केले जावे जे टार्गेटिंग, टचपॉइंट्स आणि माध्यमांमध्ये देखील तशीच क्रांती घडवून आणेल. डिजिटल नेटिव्ह्जसाठीच्या कोणत्याही उत्पादनामध्ये सोशल मीडिया सेट करण्यावर भर दिला जातो, आम्ही याठिकाणी 'चूज इट ऑल' (Choose It All) हे घोषवाक्य एकीकृत दृष्टिकोनासह सर्व आधुनिक प्लॅटफॉर्म्सवर प्रस्तुत केले आहे."
डिजिटलचा सर्वाधिक वापर करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तयार करण्यात आलेले हे कॅम्पेन जनरेशन झेडशी संबंधित सर्व टचपॉइंट्सवर प्रसारित करण्यात आले आहे. वेवमेकर साऊथ एशियाचे चीफ क्लायन्ट ऑफिसर आणि वेस्टचे ऑफिस हेड श्री. शेखर यांनी सांगितले, "अनेक वेगवेगळ्या उत्पादनांनी भरलेल्या या बाजारपेठेत आमचे वेगळेपण ग्राहकांच्या मनावर ठसवणे आणि त्याचवेळी नेमका संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवणे खूप महत्त्वाचे होते. हे क्रांतिकारी कॅम्पेन उभे करण्यासाठी भरपूर संशोधन, अनोख्या भागीदारी आणि भरपूर चर्चा करण्यात आल्या. जनरेशन झेड ग्राहकांच्या मीडिया सवयी डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांच्या आवडीच्या विविध टचपॉइंट्सना टार्गेट करण्यासाठी एक मीडिया प्लॅन तयार करण्यात आला आहे. या कॅम्पेनमध्ये पारंपरिक मीडिया प्लॅटफॉर्म्सना मागे सारून अत्याधुनिक चॅनेल्समार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे."
कोटेक्स प्रोहेल्थ+ हे ऑल-इन-वन अर्थात सर्वगुणसंपन्न उत्पादन
No comments:
Post a Comment