Tuesday, 28 March 2023

रंगभूमीवरील योगदानाबद्दल प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज शेख यांना 'रंगकर्मी सन्मान' तर सांस्कृतिक - सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी 'चतुरंग संस्थे'चे संस्थापक विद्याधर निमकर यांना 'ध्यास सन्मान' ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त आणि न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान.

 

अॅड फिझ ही संस्था गेली १५ वर्षे 'चैत्रचाहूलहा मनोरंजनाचा कार्यक्रम करते. त्याचबरोबर सांस्कृतिक - सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केलेल्या व्यक्तीला 'ध्यास सन्मानदेऊन आणि रंगभूमीवरील मोलाच्या योगदानाबद्दल 'रंगकर्मी सन्मानप्रदान करून समाजभानही जपते या वर्षी हे सन्मान चतुरंग संस्थेचे संस्थापक विद्याधर निमकर आणि प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज शेख यांना ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त आणि न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

हा पुरस्कार स्वीकारल्यावर प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज शेख म्हणाल्या, "चैत्रचाहूलच्या परिवाराने मला हा 'रंगकर्मी सन्मानपुरस्कार दिलाहे पाहून खूप बरं वाटलं. आपण जे काही केलं आहे त्याची लोकांना जाणीव आहेहे पाहून आनंद होतो.  'चैत्र चाहूल'ला पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेतया पुरस्काराच्या निमित्तानं मी प्रथमच या व्यासपीठावर आली आहे. मला यानिमित्तानं आपल्यासमोर रसिकांच्या आवडीचे गाणे सादर करण्याचा योग आला आहे. मी आपल्यासर्वांना या यानिमित्त शुभेच्छा आणि धन्यवाद देऊ इच्छिते." तर ध्यास सन्मानस्वीकारल्यावर विद्याधर निमकर म्हणाले, "हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही. एक व्यक्ती कुठल्यातरी गोष्टीचा 'ध्यासडोळ्यासमोर धरते. मात्र त्यासाठी अनेकांची 'आससोबत असावी लागते. हा सन्मान 'चतुरंग'च्या असंख्य कार्यकर्त्यांचास्नेहींचा आहे."

शिवाजीमंदिर येथे रंगलेला हा कार्यक्रम पत्रकार आणि संगीत रंगभूमीला पुनरुज्जीवन देणारे नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना समर्पित होता. त्यांच्या नाटकातील पदे वैशाली भडकमकर व सहकारी यांनी भरतनाट्यम या माध्यमातूनपेंढारकर व सुवर्णा कागल यांनी 'स्वरसम्राज्ञीया नाटकातील प्रसंग सादर करून आणि गोखले यांचे नातू ओमकार दादरकर व संपदा माने यांच्या गायनातून सादर झाली. विवेक व्यासपीठाच्या सहकार्याने झालेल्या कार्यक्रमाचे औचित्य साधत अजित दांडेकर यांनी पोडियमला दिलेले ऑर्गनचे रूप कौतुकास्पद आणि लक्षणीय होते. अरुण जोशी यांची संहिता जुन्या संदर्भांचे दाखले देणारीमाहितीपूर्ण होती. ती संपदा कुळकर्णी व प्रमोद पवार यांच्या उत्कृष्ट निवेदनातून सादर झाली. कार्यक्रमाची भैरवी फैयाजजी यांनी गायल्याने

 कार्यक्रमाला वेगळीच उंची लाभली. महेंद्र पवार यांच्या संयोजनात एक उत्तम कार्यक्रम घडल्याची प्रतिक्रिया रसिक देत होते.

No comments:

Post a Comment