~ पुढच्या टप्प्यात पोहोचलेला पार्किन्सन्स आजार आणि इतर न्यूरॉलॉजिकल आजारांवरील उपचारांमध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशन ही एक क्रांतिकारी सर्जरी आहे.
~ ही अभिनव न्यूरोसर्जरी आता नवी मुंबईत तुमच्या घराजवळ करून घेणे शक्य आहे.
नवी मुंबई, 6 जुलै 2023: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईने या शहरातील पहिली डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) सर्जरी यशस्वीपणे केल्याची घोषणा केली आहे. नवी मुंबई शहरात उपलब्ध असलेल्या पार्किन्सन्स व इतर न्यूरॉलॉजिकल आजारांवरील उपचारांमध्ये एका नव्या युगाची सुरुवात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने केली आहे.
सर्जिकल टीमचे नेतृत्व करणारे, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट, न्यूरोसर्जरी (स्टिरीओटॅक्टिक व फंक्शनल न्यूरोसर्जरी) डॉ अक्षत कयाल यांनी सांगितले, "पार्किन्सन्स आजार पुढच्या टप्प्यात पोहोचलेल्या रुग्णांसाठी डीबीएस आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते. या क्रांतिकारी उपचार पद्धतीमुळे पार्किन्सन्स आजार वाढण्याचा वेग मंदावू शकतो व रुग्णांच्या जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. या प्रक्रियेमुळे आम्ही आजाराच्या लक्षणांवर अधिक चांगले नियंत्रण ठेवू शकतो व रुग्णांना अधिक चांगली जीवन गुणवत्ता प्रदान करू शकतो. खासकरून असे रुग्ण ज्यांच्यामध्ये पार्किन्सन्स आजारावरील औषधांना प्रतिरोध निर्माण झाला आहे किंवा साईड इफेक्ट्स दिसून येत आहेत अशांसाठी ही डीबीएस खूप उपयुक्त आहे. या प्रक्रियेला मिळालेले यश हा नवी मुंबईमध्ये आरोग्यसेवेत एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे."
ज्यांच्यावर डीबीएस सर्जरी करण्यात आली ते पुरुष रुग्ण ६५ वर्षे वयाचे नवी मुंबईतील घणसोली येथील रहिवासी आहेत. गेली जवळपास दहा वर्षे ते पार्किन्सन्स आजाराने त्रस्त आहेत. जितकी जास्त शक्य होतील तितकी औषधे देऊन देखील त्यांना हालचाली करण्यात खूप त्रास होत होता. प्रदीर्घ काळापासून औषधे घेत असल्याने त्यांच्या शरीरात औषधांसाठी प्रतिरोध निर्माण झाला होता, त्यामुळे त्यांना व्हीलचेयरवर बसून राहावे लागत होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले तेव्हा आधीचे सहा महिने ते अंथरुणाला खिळून होते.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट न्यूरॉलॉजिस्ट डॉ अनिल वेंकीटचलम म्हणाले, "पार्किन्सन्ससारख्या आजाराशी दीर्घकाळापासून सामना करत असलेल्या रुग्णांसाठी ही उपचार पद्धत विशेष लाभदायक ठरते. आजाराच्या सुरुवातीच्या पाच वर्षात रुग्णांवर औषधांचे खूप चांगले परिणाम दिसून येतात, लक्षणांच्या व्यवस्थापनात औषधांचा खूप चांगला उपयोग होतो. पण आजार जसजसा वाढत जातो, तसतसे पुढील पाच वर्षात रुग्णांमध्ये औषधांना प्रतिरोध निर्माण होतो. आजाराच्या दुसऱ्या पाच वर्षांच्या टप्प्यामध्ये डीबीएस खूप लाभदायक ठरते. मेंदूला थेट स्टिम्युलेट केल्याने डीबीएस औषधांच्या प्रतिरोधाला बायपास करण्यात मदत करू शकते, आजार वाढण्याचा वेग मंदावू शकते, लक्षणे कमी करते, परिणामी रुग्णाच्या जीवन गुणवत्तेमध्ये लक्षणीय वाढ होते."
डॉ अक्षत कयाल यांनी प्रक्रियेबद्दल अधिक तपशीलवार माहिती देताना सांगितले, "डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) ही प्रगत न्यूरोसर्जिकल प्रक्रिया पार्किन्सन्स आणि गंभीर कंप, डिस्टोनिया आणि एपिलेप्सी यासारख्या इतर न्यूरॉलॉजिकल विकारांच्या व्यवस्थापनात खूप उपयुक्त ठरली आहे. ज्यांच्या स्थितीवर औषधांनी नियंत्रण ठेवता येत नाही किंवा ज्यांना औषधांचे साईड इफेक्ट्स होतात अशा रुग्णांसाठी याची शिफारस केली जाते. डीबीएसमध्ये मेंदूच्या काही विशिष्ट क्षेत्रांना इलेक्ट्रिकल सिग्नल्स पाठवण्यासाठी एक डिव्हाईस प्रत्यारोपित केले जाते. त्यामुळे हालचालींवर तसेच न्यूरॉलॉजिकल विकारांशी संबंधित इतर लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यात मदत होते.
डीबीएस सर्जरीनंतर रुग्णामध्ये लक्षणीय सुधारणा घडून आली. चालणे आणि संतुलनासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रियेनंतरचे रिहॅबिलिटेशन केले जात आहे. पार्किन्सन्स रुग्णांसाठी हे रिहॅबिलिटेशन खूप महत्त्वाचे आहे. हे रुग्ण आता हळूहळू का होईना पण इतर कोणाचीही मदत न घेता चालू शकत आहेत. सर्जरीनंतर त्यांची पार्किन्सन्सवरील औषधे खूप कमी झाली आहेत. तब्येत पूर्णपणे बरी होण्यासाठी सर्जरीनंतर ३ ते ६ महिने नियमितपणे प्रोग्रेसिव्ह थेरपी घेणे आवश्यक आहे.
या रुग्णाच्या मुलाने आभार व्यक्त करताना सांगितले, "सर्जरीनंतर माझ्या वडिलांच्या जीवन गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा घडून आली आहे. हा प्रगत उपचार पर्याय घराच्या इतक्या जवळ उपलब्ध करवून दिल्याबद्दल आम्ही कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई टीमचे खूप आभारी आहोत."
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईचे संचालक व प्रमुख डॉ बिपीन चेवले यांनी सांगितले, "आम्हा सर्वांसाठी हा अतिशय अभिमानस्पद क्षण आहे. हे यश मिळवून आमच्या हॉस्पिटलने एक महत्त्वाचा टप्पा पार
No comments:
Post a Comment